प्रेम बालपणातले | Jivan Ek Katha | Marathi Katha
जीवन एक कथा । मराठी कथा प्रेम बालपणातले तसा संदीप त्याच्या परिवारातला सर्वात लहान सदस्य. घरात त्याच्यापेक्षा मोठा एक भाऊ व एक बहीण होती. घरात सर्वात लहान असल्याने सर्वच जन त्याची नेहमी टिंगल उडवत असे. कधी त्याला या गोष्टी सहन होत असे तर कधी त्याला त्याचा राग ही येत असे. पण संदीप अवघा पाच-सहा वर्षांचा होता. तो एकदम गुटगुटित व खुप गोड मूलगा असल्याने तो सर्वांना खुप आवडायचा. पण संदीपचा स्वभाव खुप शांत होता. त्यामुळच सर्व त्याला चिडवत असायचे. परंतु संदीप घरात लहान असल्याने त्याचा लाड ही खुप होत असे. लहानपणी संदीप अभ्यासात ही हुशार होता, संदीप दुसरीत असतानाच चांगल्याप्रकारे लिहायला व वाचायला शिकला होता. संदीप व त्याचा भाऊ आणि बहीण तिघेही एकाच शाळेत होते. संदीपच्या घरा जवळच काही अंतरावर "पूनमच" घर होत. पूनम आणि संदीप एकाच वर्गात होते. पण संदीप खुप लाजाळू असल्याने तो जास्त कुणासोबत बोलत नसायचा. लहानपणी त्याला कुणीच मित्र नव्हते. शाळेतुन आल्यावर तो घरातच खेळत असे. शाळेतही तो इतर मुलांसोबत...