प्रेम आणि मैत्री | Jivan Ek Katha | Marathi Katha
जीवन एक कथा । मराठी कथा
प्रेम आणि मैत्री
सूरज नुकताच बारावी ची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. सूरज खुप अभ्यासू होता. आकरावी बारावी फक्त अभ्यास आणी अभ्यास यातच घालवल. कॉलेज च जीवन जगायच त्याच राहुनच गेल होत. सूरज आत्ता पर्यन्त मुलींपासून खुप दूर होता. आकरावी बारावी या वर्षात एक ही मैत्रीण बनवली नाही. मित्र ही मोजकेच होते, अगदी हाताच्या बोटांवर मोजन्या इतके.
त्याला आता पदवी साठी प्रवेश घ्यायचा होता. त्याला आता अभ्यासा सोबत कॉलेजच आयुष्य ही जगायच होत. खुप मित्र-मैत्रिणी बनवायच्या होत्या. त्याने पदवी साठी मोठ्ठ कॉलेज निवडल. अभ्यासात हुशार असल्याने त्याला प्रवेश ही लगेच मीळाला. त्याच्यासोबत त्याचा जुना जिवलग मित्र ही होता. दोघांनी सोबतच एकाच कॉलेज मध्ये प्रवेश घेतला.
त्याच सोबत काही विषयांसाठी दोघांनी शिकवणी ही लावून घेतली. शिकवणी सकाळी असायची व दुपारी कॉलेज असायच. सूरज शिकवणी व कॉलेज दोन्ही नियमित करत असे.
अभ्यासू वृत्ती असल्याने त्याची कॉलेज मध्ये चांगलीच छाप पडली होती. त्याने नविन मित्र बनवायला सुरुवात केली. अभ्यासात हुशार असल्याने मूल स्वतःहुन त्याच्याशी मैत्री करत. सूरजला चांगल्या मैत्रिणी ही बनवायच्या होत्या. तो आता मुलींसोबत बोलायला लाजत नसे. मुलींसोबत ही तो मन-मोकळ्या पनाने बोलू लागला. त्याची अभ्यासातील हुशारी बघून मुलीही त्याच्याशी सहज मैत्री करत होत्या.
शिकवणी मध्ये ही तो सर्वांशी चांगली मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. शिकवणी मध्ये वेग-वेगळ्या कॉलेजची मुले-मुली येत असत. सर्वांची कॉलेज ची वेळ लक्षात घेता शिकवणी सकाळी आणी संध्याकाळी दोन वेळेस चालत असे. सूरज व त्या सोबत आणखी काही इतर कॉलेजचे मूल-मुली हे सकाळी शिकवणी साठी येत असत. बहुतेक मूल ही संध्याकाळीच येत असत. सकाळी मोजके सात-आठ मूल-मुली येत होते. सकाळी येणारे सर्वच मूल-मुली चांगले आभ्यासु होते. त्यामुळ शिकवणीतिल सर्व शिक्षक त्यांच्यावर नेहमी खुश असायचे.
सूरजने शिकवणीतिल मुला-मुलींशी चांगली मैत्री करून घेतली होती. अवघ्या एक ते दोन महिन्यात शिकवणीतिल सर्वच मूलांची एकमेकांसोबत चांगली मैत्री झाली होती. तेथील शिक्षक ही त्यांच्या सोबत शिक्षक कमी व मित्र म्हणून जास्त राहू लागले. त्या सर्वांची मैत्री खुप घट्ट होत चालली होती. शिक्षक ही त्यांच्या मैत्रीचा एक भाग होते. अभ्यासाच्या वेळेस अभ्यास व इतर वेळेत तेथील शिक्षक ही त्यांच्या सोबत मित्र म्हनुनच वावरत असे. त्यांचा एक खुप चांगला ग्रुप तयार झाला होता. अगदी जसा सूरजने कॉलेज सुरु होण्याच्या पूर्वी विचार केला होता तसाच.
सूरज कॉलेज पेक्षा शिकवणीतिल मित्र-मैत्रिणींसोबत जास्त राहत असे. कधी तरी सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जाणे. एखाद्या दिवशी बाहेर जेवायला जाणे हे त्यांच चालूच असायच. कुणाची ही नजर लागेल एवढी घट्ट मैत्री त्या सर्वांमध्ये झालेली होती.
सुट्टीच्या दिवशी सकाळचे विद्यार्थी व संध्याकाळचे विद्यार्थी शिकवणी करता एकत्र बोलवत. संध्याकाळीचे जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थी असायची. एवढ्या सर्वांमध्ये सुद्धा या सात आठ जनांचाच जास्त बोलबाला असायचा. दर सहा महीन्यानी विद्यापीठाच्या परीक्षा असायच्या. त्या परीक्षेत या ग्रुपचे विद्यार्थी आप आपल्या कॉलेज मधून कुणी पहिला येत असे तर कुणी दूसरा.
त्या शिकवणीच्या दोन शाखा होत्या. जी प्रमुख शाखा होती सूरज व त्याचे सर्व मित्र त्या मुख्य शाखा असलेल्या ठीकाणी शिकवणीसाठी जात असे. आठवड्यातुन एक वेळेस शिकवणी मध्ये परीक्षा होत असे. सुट्टीच्या दिवशी परीक्षा घ्यायची ठरल तर सकाळची व संध्याकाळची विद्यार्थी एकत्र बोलवत.
एक दिवस तेथील शिक्षकाने वेगळीच शक्कल लढ़वली. दोन्ही शाखेवरील मुलांच्या एकत्र परीक्षा घेणे. यामुळ वेळ ही वाचेल व सर्व मुलांची ओळख ही होइल. सर्व मूल तयार झाली.
परीक्षेचा दिवस व वेळ ठरली. परीक्षा शिकवणीच्या दूसऱ्या शाखेवर ठेवण्यात आली. इतर मुलांसोबत सूरज व त्याचे मित्र ही परीक्षेसाठी पोहचले. त्या शाखेवर सूरज व त्याचे मीत्र पहिल्यांदाच गेले होते. सूरज व त्याचा ग्रुप मधील सर्व जन नेहमी एकत्रच असायचे. त्यादिवशी मूल जास्त असणार हे त्यांना माहित होत.
सूरज व त्याच्या मित्रानी आधीच जागा पकडून ठेवली व ते सर्व जवळच परीक्षेसाठी बसली. मूल जास्त असल्यानी दोन तिन वर्गामध्ये सूटसुटीत सर्वाना बसवन्यात आले. सूरज व त्याचे सर्व मित्र एकाच वर्गात बसली होती.
सर्वांना पेपर देण्यात आले. दोन तासाचा पपेर होता. सर्वानी शांततेत पेपर लिहिला. पेपर झाल्यावर सर्वांना काही महत्त्वाच्या सुचना देण्यासाठी एकाच वर्गात बोलावण्यात आले. सूरज व त्याचे मित्र बसले होते ती रूम मोठी होती. त्यामुळ इतर वर्गातील सर्व मुलांना तिथे बोलावले.
सूरज व त्याच्या मित्रांना वर्ग सोडण्याची गरज नव्हती. ते बसले त्याच जागेवर बसून होते. सुरजच्या समोरील बाकावर त्याच्या ग्रुप मधील त्याची मैत्रीण बसली होती व बाजुच्या बाकावर त्यांच्याच ग्रुप मधील इतर मित्र-मैत्रिणी बसल्या होत्या.
हळूहळू इतर वर्गातील मूल-मुली येत होते. तितक्यात एक मुलगी सूरज जवळ आली व त्याला दूसऱ्या बाकावर बसन्यास सांगू लागली. ती मुलगी सूरज साठी अनोळखी होती. सुरजने तीच ऐकल नाही. कारण सूरज त्याच्या मित्रांसोबत बसला होता. तो काही केल्या त्या सर्वांना सोडून दुसरीकडे जाऊन बसु शकत नव्हता. तिने परत सूरजला सांगीतले. यावेळेस सूरज ने स्पष्ट नकार दिला. व तिला बोलला "मी परीक्षा झाली तसा इथेच बसलो आहे मी माझी जागा नाही सोडणार" सूरज ची मैत्रीण हे सर्व ऐकत होती.
ती मुलगी नेहमी शिकवणी साठी त्याच शाखेत येत असे. तिने सूरज ला सांगितले की ही जागा मुलींची आहे मला बसु दे. सूरज तरी ही नाही ऐकला. तो बोलला जरी तुमची नेहमीची जागा असेल पण आज सर्व एकत्र बोलावले आहेत. आम्ही आधीपासून इथे बसलो आहे. "मी उठणार नाही" अस स्पष्ट तिला सांगीतले. ती मुलगी सूरजची विनवणी करू लागली. पण सूरज काही केल्या ऐकत नव्हता.
सूरजची मैत्रीण हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होती. सुरजची मैत्रीण त्या मुलीला चांगल्याप्रकारे ओळखत होती. सूरजची मैत्रीण व ती मुलगी एकाच कॉलेज मधील होत्या. सूरज काही केल्या त्या मुलीच ऐकत नव्हता. व ती मुलगी सारख त्याला विनवणी करत आहे हे बघून सूरजच्या मैत्रिणीनेच मध्यस्थी केली. "सूरज जाऊदे बसु दे तिला तिथे" , तिने सूरज ला सांगीतले "इथे खरच नेहमी मुली बसतात बसु दे तिला" आणी "तसही फक्त दहा ते पंधरा मिनिट तर बसायचय", तिला बसन्यासाठी दुसरीकडे जागाही नाहीये. तूच आपल्या ग्रुप मधील एखाद्या मुलाच्या बाकावर बस.
सूरजला त्याच्या मैत्रिणीने सांगितल्यावर तीच त्याला ऐकावच लागल व सूरज उठून दुसरीकडे जाऊन बसला. त्यांच्या शिक्षकांनी त्याना काही सुचना दिल्यात. पुढचे काही दिवस सर्व मुलांची शिकवणी ही याच शाखेवर होइल हे सांगण्यात आले. मुख्य शाखेवर दुसरे काहीतरी काम सुरु करणार होते.
सुचना दिल्यानंतर सर्वांना सोडण्यात आले. बाहेर आल्यावर सुरजने त्याच्या मैत्रिणीला विचारले तू का मला उठायला सांगीतले. त्यावर तिने सांगीतले आरे ती माझ्याच कॉलेज मधील आहे. ती पण माझी मैत्रीण आहे. त्यामुळ मला मध्यस्थी करावी लागली. सूरज ने त्याच्या मैत्रिणीला त्या मुलीच नाव विचारले. तीच नाव "प्रियंका" होते.
आता पुढचे काही दिवस सर्वांची शिकवणी एकाच ठिकाणी एकत्र होणार होती. सहाजीक ती मुलगी आता रोज सूरज च्या समोर येणार होती. कारण तिथे फक्त सूरजचाच ग्रुप असणार नव्हता. इतर मुलेही असणार होती. तिथे सूरज च्या ग्रुप मधील मुलांना व मुलींना वेगळ बसाव लागणार होते. दूसऱ्या शाखेवर नियमित शिकवणी सुरु झाली. त्यांच्या ग्रुप मधील मुली मुलींच्या लाइन मध्ये व मूल मुलांच्या लाइन मध्ये बसत होते. पण त्यांचे बाक एकमेकांच्या जवळ असायचे याच पद्धतीत ते बसायचे. प्रियंका व सूरज ची मैत्रीण या ही माघे पुढेच बसायच्या.
शिकवणी सुरु असताना सूरज व प्रियंका मध्ये खुप वेळेस नजरा-नजर होत असे. सूरज तिच्याकडे रागाने बघायच तर कधी प्रियंका सूरजकड़े रागात बघायची.
असेच दहा ते पंधरा दिवस निघून गेले. एव्हाना सुरजची अभ्यासू वृत्ती प्रियंका ने चांगल्या प्रकारे बघितली होती. सूरज हा एक हुशार मुलगा आहे हे तिला समजले होते. व रिकाम्या वेळेत दंगा मस्ती ही तेवढाच करायचा. हळूहळू दोघांच्या मनातील राग कमी होऊ लागला. पण एकमेकांकड़े बघण्याची त्यांना सवयच झाली होती.
एक दिवस जरी सूरज किंवा प्रियंकाला येण्यास उशीर झाला तर त्यांची नजर एकमेकांचा शोध घेत असे. हळूहळू अशाच प्रकारे महिना निघून गेला.
सूरज व प्रियंका एकमेकांकडे रागात बघता बघता एकमेकांच्या प्रेमात कधी पडले हे समजलेच नाही. अजूनही ते दोघे एकमेकांकडे बघायचे पण आता त्यांच्या नजरेत राग नसून एकमेकांसाठी प्रेम होत. सूरज-प्रियांकाच्या प्रेमात पडला होता हे त्याच्या ग्रुप मधील इतर कुणालाच माहित झाले नाही. पण प्रियंकाला हे चांगलेच कळून चुकले होते. व प्रियांकाही आपल्या प्रेमात पडली आहे हे सूरजला समजले होते. सूरज व प्रियांकाची प्रेमकहानी तर सुरु झाली पण ती फक्त मनातल्या मनातच. अजुन त्यानी त्यांच प्रेम व्यक्त केल नव्हते.
सूरजने ही गोष्ट त्याच्या मित्रांपासून लपवून ठेवण्याचा खुप प्रयत्न केला. पण मित्र हे शेवटी मित्रच असतात. सूरजच्या ग्रुप मधील मुलांना सूरजच्या वागनुकित फरक जाणवत होता. त्यांनी सूरज ला विचारण्याचा प्रयत्न केला पण सूरज काही केल्या त्यांना सांगत नव्हता. कुठ तरी त्यांना संशय होता.
एक दिवस त्यांनी सूरजवर बारीक नजर ठेवली. शिकवणी सुरु असताना प्रियंका व सूरज एकमेकांकडे बघत होते. हे सूरज च्या मित्राने बघितले व सूरज पकडले गेला. शेवटी सूरजला त्याच्या मित्रांसमोर त्याच्या प्रेमाची कबुली द्यावी लागली. पण त्याने त्यांना एक वचन मागीतले. ही गोष्ट मुलींमध्ये कुणालाच नाही सांगायची. कारण प्रियंका त्यांच्या ग्रुप मधील एक मुलीची मैत्रीण होती.
सूरज त्याच प्रेम कधी व्यक्त करेल याची वाट प्रियंका आतुरतेने बघत होती. सूरज पेक्षा प्रियांकाच प्रेमात जास्त बुडाली होती. सूरजच हे पहिल प्रेम होत. सुरजची तिला बोलण्याची हिम्मत होत नव्हती. काही दिवस असेच लोटले गेले. आपल प्रेम व्यक्त करण्यासाठी दोघतुन कुणीही पुढाकार घेत नव्ह्त.
प्रियंका बेचैन झाली होती. आता ती रोज शिकवणीसाठी लवकर येऊ लागली व सूरज च्या बाजुच्या बाकावर येउन बसु लागली, जिथे रोज सुरजची मैत्रीण बसायची!. दोन तिन दिवस गेलेत रोज प्रियंका लवकर येउन सूरजच्या बाजूच्याच बाकावर येउन बसत हा प्रकार सुरु होता.
सूरजच्या मैत्रिणीलाही संशय येऊ लागला. एक दिवस तिनेही या दोघांवर लक्ष ठेवले. त्यादिवशी सूरजच्या मैत्रिणीला ही माहित झाले की या दोघांमध्ये काही तरी दाळ शिजतिये. तिने याबद्दल सूरजला विचारले. सूरज काही केल्या कबूल करत नव्हता. शेवटी त्यांच्या ग्रुप मधील मुलांनी स्पष्ट केले की सूरज आणि प्रियंका मध्ये काही तरी सुरु आहे.
आता ग्रुप मधील सूरज प्रेमात पडला हे सर्वांना माहित झाले होते. सूरजला चिडवने त्याची मजा घेणे हा प्रकार ग्रुप मध्ये सुरु झाला. पण सूरज हळूहळू प्रियंकाच्या प्रेमात अकांठ बुडत चालला होता. एक दिवस जरी प्रियंका दिसली नाही तरी तो बेचैन होत असे. त्याच मन ही शिकवणीत लागत नसे. ही बाब त्याचा ग्रुप मधील मुलांना दिसत होती. ते सूरजची समजूत काढण्याचा प्रयत्न करत असत. ते सूरज ला सांगत असत की तू प्रेम कर. पण अभ्यासाकड़े दुर्लक्ष करू नकोस. तेवढ्या वेळेपुरते हे सूरज ला समजत असे. पण काही वेळानंतर सूरजची गाडी त्याच रस्त्यावर येत असे.
सूरज एक अभ्यासू मुलगा होता. आणी आता एका मुलीच्या प्रेमात एवढा अकांठ बुडाला की आता त्याच अभ्यासात मन सुद्धा लागत नसे. त्यात त्यांच हे पदवीच शेवटच वर्ष होत. एवढे दिवस चांगला अभ्यास केला. सर्वानी मिळून पाहिजे तेवढी मज्जा मस्ती केली खुप धिंगाना घातला. पण कुणीच अभ्यासात कमी पडले नाही. पण एका मुलीच्या प्रेमात पडल्यापासून सूरजच्या अभ्यासावर चांगलाच फरक पडला होता.
सूरज अभ्यासात लक्ष देत नाहीये ही गोष्ट ग्रुप मधील मुलींना अजुन समजली नव्हती. कारण दूसऱ्या शाखेवरील शिकवणीत सर्व एकत्र असल्याने मुला मुलींना जास्त बोलायला जमत नव्हते. तिकडे प्रियंकाही खुप बेचैन झाली होती. मुलगी असल्याने तीही स्वतःहुन प्रेम व्यक्त करण्याचा पुढाकार घेत नव्हती. प्रियंकाने याबद्दल तिच्या इतर मैत्रिणींना सांगीतले होते.
इकडे सूरजची काही केल्या हिम्मत होत नव्हती. काय कराव हेही त्याला सुचत नसे, इकडे शिकवणीत मन लागत नसे, कॉलेज मध्ये ही त्याच लक्ष लागत नसे. सूरज अभ्यासात मागे पडत चालला होता. सूरज च्या मित्रांना सूरज ची ही अवस्था बघवत नव्हती. सूरज ला यातून कसे बाहेर काढावे हे त्यांना समजत नव्हते. अवघ्या दोन महिन्यांवर पदवीची शेवटची परीक्षा येउन पोहचली होती.
एक दिवस सूरज ने त्याच्या मैत्रिणीला सांगीतले. "मी प्रियंकावर खुप प्रेम करतो पण माझी काही केल्या तिला बोलण्याची हिम्मत होत नाहीये, प्रियंका तुझी पण मैत्रीण आहे तूच काही तरी मदत कर मला" ही विनंती त्याने केली. सूरज चांगला मित्र असल्याने त्याला त्याची मैत्रीण नाकारू शकली नाही. तिने त्याला सांगितले की "चालेल मी बोलून बघते प्रियंकाला".
सूरजची मैत्रीण हे सर्व प्रियंका ला सांगण्यापूर्वी तिने हे सर्व सूरजच्या गैरहजेरी मध्ये ग्रुप मधील सर्वांना सांगीतले.
त्यावर त्याच्या मित्रांनी सूरजची अवस्था व्यक्त केली. "सूरज प्रेमात खुप बुडाला आहे, त्याला प्रियंका शिवाय काहीच दिसत नाही, तो अभ्यासात पण लक्ष देत नाहीये" त्यातील एकानी सांगीतले "जर सूरज आणी प्रियंकाचे सूत जूळवले तर सूरज अजीबात अभ्यास करणार नाही. पूर्ण वेळ फक्त प्रियंका सोबत घालवेल, आणी याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर होइल आणी उद्या चालून प्रियंका ही त्याला सोडून गेली तर त्याच पूर्ण आयुष्य वाया जाऊ शकत. आणी शिवाय अभ्यासामुळ ही त्याच भविष्य वाया जाऊ शकत, त्याला यातून वाचवल पाहिजे आणी प्रियंका अभ्यासू मुलगी नव्हती हे सूरजच्या मैत्रिणीला चांगलच ठावुक होत, प्रियंका च्या नादी लागुन सूरज अभ्यासापासून दूर होईल हे ती जानत होती.
सर्वांनी मिळून एकच ठरवले सूरजला खोट बोलायच. सूरजने ज्या मैत्रिणीला मदत करायला सांगीतल होत तिनेच सूरजला खोट सांगायच की "मी प्रियंका सोबत बोलले, तीला तर तू आजीबात आवडत नाही., पहिल्या दिवशी जो बसन्यावरुन वाद झाला होता त्याचा राग आजुन तिच्या मनात आहे., तुझा काहीतरी गैरसमज झाला असावा प्रियंकाच अजीबात प्रेम नाहीये तुझ्यावर. "ठरल्याप्रमाने सूरजच्या मैत्रिणीने हे सर्व सूरजला सांगीतले व सूरजच्या डोक्यातील प्रेमाच भुत उतरवल.
परीक्षा जवळ आली असल्याने सर्वांनी मिळून सूरजला पूर्वी सारख अभ्यास करण्यास भाग पाडले. सूरज आभ्यासात कुठे कमी पडत असला तरी त्याचे मित्र त्याला सर्व समजावून सांगत. पण तिकडे काही केल्या प्रियंकाच प्रेमाच भुत उतरलेल नव्ह्त.
सूरजची परीक्षा सुरु झाली. पूर्वी प्रमाणे सूरजने व्यवस्थित आभ्यास करून सर्व पेपर दिले. आता शिकवणी ही संपली होती. प्रियंका आता कधीच सूरजला दिसणार नव्हती. सूरज ही तिला विसरून गेला होता. नेहमीप्रमाणे सूरज व त्याच्या ग्रुप मधील सर्व मित्र मैत्रिणी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले होते. सूरज चांगला आभ्यास करून उत्तीर्ण झाला त्यामुळ त्याचे सर्व मित्र आनंदी होते.
सूरजचा त्याच्या ग्रुपच्या मुलांशी ही भेट होत नसे. फक्त मोबाइल च्या माध्यमातून संपर्क चालु होता. सूरजला अजुन ही त्याची मैत्रीण त्याला खोट बोलली "की प्रियंकाच तुझ्यावर प्रेम नाही " हे खोट आहे याची अजीबात कल्पना नव्हती.
एक दिवस सूरजचा प्रियंकाच्या एका मैत्रिणी सोबत संपर्क झाला. सहज म्हणून तिनेच सूरजला विचारले "तू प्रियंकावर प्रेम करत होता प्रियंका ही तुझ्यावर खुप प्रेम करत होती, मग तुम्ही तुमच प्रेम का व्यक्त केल नाही. " ,
त्यावर सूरज ने सांगीतले की मी तर माझ्या मैत्रिणीला सांगीतले होते प्रियंकाला विचारायला. तिने मला सांगीतले की "प्रियंका बोलली की माझ सूरज वर प्रेम नाहीये" , प्रियंकाच्या मैत्रिणीने सूरज ला सांगीतले की प्रियंकाला कुणीच काही विचारायला आल नाही. ती तर खुप आतुरतेने वाट बघत होती. प्रियंकाची मैत्रीण सूरज ला बोलली की तूला कुणी तरी खोट सांगीतल आहे. सूरज ने तिच्या जवळ प्रियंकाची विचारणा केली. पण आता वेळ निघून गेलेली होती. प्रियंकाच लग्न झालेल होत.
सूरज त्याच्या मैत्रिणीवर चांगलाच चिडला व लागलीच तिला संपर्क साधला व विचारल की तू तेव्हा खोट का बोलली. त्यावर तिने स्पष्ट सांगीतले. की तू आभ्यासात माघे पडत होता. व आम्हाला ते बघवत नव्ह्त. एका मुलीसाठी तुझ आयुष्य खराब झाल असत म्हणून आपल्या ग्रुप मधील सर्वांनी ठरवून तुला खोट बोलाव लागल.
सूरजच्या मनात मित्रांबद्दल आणखी चांगली भावना निर्माण झाली. त्यांनी सूरजच्या चांगल्याचा विचार केला. व सूरजच भविष्य वाचवल.
आणी शेवटी प्रेमासमोर मैत्रीचं जिंकली !!!!!!!
Jivan Ek Katha हा Marathi Katha blog आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना नक्की share करा
धन्यवाद



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा