विधवेशी प्रेम | Jivan Ek Katha | Marathi Katha

जीवन एक कथा । मराठी कथा

विधवेशी प्रेम


    "ती" आणि "तो" तसे बालपणा पासूनच एकमेकांना खुप चांगल्याप्रकारे ओळखत असे. तस बघितले तर दोघेही जवळच्या नातेसंबंधा मधील होते. दोघांच गाव व दोघे रहान्यास ही वेगवेगळ्या शहरात होते. पण लहानपणी वर्षातून किमान तिन-चार वेळा तरी त्यांची भेट होत असे. कधी कुठल्या कार्यक्रमामध्ये तर कधी कुठे एखाद्या पहुन्याकड़े गेल्यावर. 

    ते दोघे ही लहान असल्याने आई-वडील नेहमी त्यांना सोबत घेवुन जात असे. त्या एक-दोन दिवसांमध्ये ती आणि तो व इतर पहुन्यांची लहान मुले एकत्र खेळत असत. ती त्याच्यापेक्षा वयाने तिन-चार वर्षे तरी लहान असावी. असे लहानपणी पाच-सहा वर्ष चालत राहिले. कालांतराने हळूहळू त्या दोघांच गावाकडे जाने कमी झाल. 

    कधी तो जात असे पण ती तिथे नसायची तर कधी ती गेली तर तो नसायचा. अस भरपूर दिवस सुरु होत. बघता बघता दहा-बारा वर्ष निघून गेली. ते दोघे एकमेकांना सोबत भेटले नव्हते किंवा एकमेकांना बघितले सुध्दा नव्हते. पण जवळील नात्यात असल्याने ते ओळख मात्र विसरले नव्हते. 

    तस त्यांच्या घरात ही कधीतरी विषय निघतच असे. दोघांचही शिक्षण व्यवस्थित चालू होते. तो दहावी पास होउन माहविद्यालयीन शिक्षण घेत होता. तीच अजुन शालेय शिक्षण चालू होते. 

    एक वेळेस ती उन्हाळी सुट्टी मध्ये गावी गेली होती. जवळ जवळ एक महिना ती गावाकडेच होती. त्याच वेळेस योगायोगी एका कार्यक्रमानिमित्त त्याचही त्याच गावी जाण झाल. त्याला अजीबात माहित नव्हते की ती ही तिथेच आली असावी किंवा त्याने तशी कल्पना देखिल केली नव्हती. तो तिथे गेला अचानक त्याला काही मुलींमध्ये गप्पा मारत बसलेली तीही दिसली. 

    त्याने तिला ओळखले होते. जवळ जवळ बारा-तेरा वर्षानंतर त्याने तिला बघितले होते. भरपूर दिवसानंतर बघितल्यामुळ त्याने व्यवस्थित खात्री करून घेतली नेमकी ही तीच आहे का?. काही वेळानंतर तिचीही नजर त्याच्याकड़े गेली. तिलाही तो ओळखितला वाटत होता. थोडा वेळ नित निरखून बघितल्यावर तिनेही खात्रिपुर्वक त्याला ओळखले होते. 

    खुप दिवसानंतर एकमेकांना बघितल्यावर त्यांना आपले लहानपणीचे दिवस आठवू लागले. तीही आता पंधरा-सोळा वर्षांची झाली होती. आणि तोही अठरा-एकोनाविस वर्षांचा झालेला होता. भरपूर वेळ एकमेकांना बघत राहिले पण आता वयाने ही खुप मोठे झाले होते व खुप दिवस झाले भेटले बोलले नव्हते त्यामुळ दोघांना ही बोलायची हिम्मत होत नव्हती. ते दोघेही लाजत होते. 

    तो तिथे त्या गावी दोन-तिन दिवस होता. ती भरपूर वेळा त्याच्या समोर आली पण त्यानेही तिला बोलायची हिम्मत दाखवली नाही. तीही मुलगी असल्याने बोलण्यासाठी लाजत होती. आता त्याला त्याची घरी परतायचे होते. शेवटपर्यन्त त्याने तिच्याशी बोलण्याची हिम्मत केली नाही. शेवटी तो त्याच्या घरी परतला. 

    घरी परतल्यावर त्याला कुठे तरी वाटत होते की आपण तिच्याशी बोलायला हव होत. त्याला कुठे तरी चुकल्यासारख वाटत होत. तीही विचार करत होती हा आपल्याशी बोलला का नाही. पण आता विचार करुनही काही होणार नव्ह्त. कारण आता परत कधी भेट होइल हेही त्यांना माहित नव्ह्त. आता दोघेही माहविद्यालयीन शिक्षण घेत होते. 

    त्यांच आता पूर्वीप्रमाणे गावाकडे जान्याच प्रमाण वाढल होत. तो ही आता मोठा झाला असल्याने कित्येक तरी कार्यक्रमांना तोच हजेरी लावत. तीलाही गावाकडे जावून मज्जा करायला खुप आवडत असे. त्यामुळ तीही नेहमी गावी जात असे. त्याच ही अधून मधून गावी जान चालू झाल होत. काही दिवसांनी तो गावी गेला तीही त्याच गावी आलेली होती. 

    परत ते दोघांनी एकमेकांना बघीतले पण अजूनही बोलण्याची हिम्मत कुणी करत नव्ह्त. दोघांची ही बोलण्याची खुप इच्छा असुनही पुढाकार मात्र कुणी घेत नव्ह्त. ती मुद्दामच त्याच्या समोरून फिरायची तो अशाने तरी जवळ येवून बोलेल पण तो ही बोलायला फार घाबरत होता. तस सध्या तरी त्या दोघांच दूसरा कुठलाच उद्दिष्ट नव्हता. 

    फक्त लहानपणीचे दिवस आठवत होते, लाहानपणी सोबत खेळलो खुप मज्जा केली त्याच गोष्टी त्यांना आठवत होत्या. पण त्यांच वय अस होत त्यामुळ इतर लोकांच गैरसमज नको म्हणून त्यांची बोलन्याची हिम्मत होत नसे. तो परत घरी जाण्यास निघाला यावेळी ही न बोलताच तो परतला होता. तो बोलला नाही याची तिला ही थोडी खंत वाटत होती. 

    पण आता तीही काही करू शकत नव्हती. तिची इच्छा होती पण तीही तेवढीच स्वतःहुन बोलण्यास घाबरत होती. यानंतर ही भरपूर वेळेस असच झाले दोघेही समोर आले तरी काही एकमेकांसोबत अजीबात बोलत नव्हते. आता हळूहळू त्या दोघांची ही एकमेकांसोबत बोलण्याची इच्छा संपत होती. ते आता समोर आले तरी अनोळखी सारखे वावरत होते.

    ती ही आता पूर्वीप्रमाणे त्याची बोलण्याची वाट बघत नसे. कुठल्याही कार्यक्रमात गेले किवा गावी गेले तरी आता पूर्वीप्रमाणे एकमेकांकडे बघणे किवा मुद्दामच समोरुन जाने या सर्व गोष्टी आता बंद झाल्या होत्या. आता तीही एकोणविस-विस वर्षांची झाली होती. तोही तेविस-चोवीस वर्षांचा झाला होता. त्याच आणखी शिक्षण चालु होते. 

    ती आता लग्नाच्या वयात आलेली तरुणी होती. तस तो ही लग्नाच्या वयात आलेला होता पण त्याच शिक्षण अजुन बाकी होत. त्यामुळ त्याने आणखी लग्नाचा विषय घेतला नव्हता. पण तिच्या लग्नाचा विषय आता घरात सुरु झाला होता. तिच्या आई-वडीलांनी तिच्यासाठी योग्य स्थळ शोधण्यास सुरुवात केली. नातेवाईकांना तशी कल्पना हि दिली. 

    तिच्यासाठी स्थळ शोधने सुरु आहे याची कल्पना त्यालाही झाली. पण तिच्याबद्दल त्याच्या मनात तस काही नव्हतेच त्यामुळ त्यानेही फार काही विचार केला नाही. काही काळ तिला वर शोधण्यात निघून एक गेला. एक-दिड वर्षाने तिच्यासाठी योग्य असा वर मिळाला. तसा मुलगा सर्वसाधारण घरातीलच होता. सर्व गोष्टी व्यवस्थित जूळल्या होत्या. 

    मुलगा मुलगी एकमेकांना पसंत होते. काही दिवसांनी साखरपुडा करण्याच ठरवले. त्याच्या आई-वडीलांना ही आमंत्रण होतच. साखरपुडया साठी फक्त त्याचे वडील गेले होते. काही दिवसांनी तीच लग्नाची तारीख पकडली. त्याची तिच्या लग्नाला जाण्याची खुप इच्छा होती. पण काही कारणास्तव तो तिच्या लग्नाला जाऊ शकला नाही. तीच्या लग्नाला त्याचे फक्त आई-वडीलच गेले होते. 

    लग्न तस धूमधाम मध्ये झाले. वयाच्या विस-एकविसाव्या वर्षीच तीच लग्न झाले होते. आता ती तिच्या सासरी गेली होती. तिच्या सासरचे व त्याचे तसे काहीच नाते नव्हते. त्यामुळ आता त्यांची भेट अशक्यच होती. कारण लग्न झाल्यावर तीच गावी येन्याच प्रमाण खुपच कमी होणार होत. 

    तिचा आता तिच्या पती सोबत नविन आयुष्याची सुरुवात झाली होता. सासु सासरे पती यांच्या सोबत ती खुप रमली होती. तीला गवाकड़ील आठवण ही फार कमीच येत होती.  त्याच शिक्षण शेवटच्या टप्प्यात होत. त्याच अजूनही काही कार्यक्रम असला की गावाकडे येण जाने सुरूच होते. पण पूर्वीप्रमाणे ती आता त्याला कधीच गावाकडे व इतर कार्यक्रमात दिसत नव्हती. तस त्याला ही आता तिची आठवण येत नव्हती किवा तो ही कधीच तिचा विचार करत नव्हता.  

    तिचा संसार खुप सुखात सुरु होता. तिच्या पतीसोबत गुन्यागोविंदाने नांदत होती. ती तिच्या आयुष्यात खुप खुश होती. तिचा पती व सासु सासरे तिला खुप जीव लावत असे. कधीच कुठल्या गोष्टीची तिला कमी पडत नव्हती. त्याचही शिक्षण जवळपास पूर्ण होत आले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवस्थित कामाला लागल्यावर लागलीच त्याचही लग्न करायच होत. 

    त्याच शिक्षण पूर्ण होउन तो आता नोकरीच्या शोधात होता. आता त्याच नोकरी शोधने व इतर कारणाने गावाकडे जाण्याचे प्रमाण वाढले होते. पण आता त्यालाही कधी गावाकडे गेल तर तिची आठवण येत नसे. 

    तिच्याही जीवनात सर्व काही अलबेल चालू होते. कुठल्याच गोष्टीच कमी नव्हती. एक दिवस काही कामानिमित्त ती व तिचा पती त्यांच्या गावी गेले. दोन-तिन दिवस गावाकडे खुप मज्जा केली. तिच्या लग्नाला आत्ताच कुठे दोन वर्ष पूर्ण होणार होती. तिला अजुन मूल-बाळ ही झाली नव्हती. 

    तिच्या जीवनात सर्वत्र आनंदी आनंद असताना अचानक तिच्या जीवनात एक काळा दिवस उगवला. गावाकडे ती तिचा पती मस्त रमले होते. त्यादिवशी तिचा पती काही कामानिमित्त बाहेर गेला. जात असताना तिच्या पतीचा वाटेतच अपघात झाला. काळाने तिच्या पतिवर हल्ला केला. तिच्या पतीच त्या अपघातात निधन झाले. तिला ही बातमी कळताच तिच्या पाया खालची जमीनच सरकली. 


    आता कुठे तीच नविन आयुष्य सुरु झाले होते. सर्व काही आनंदात सुरु होते. पण कदाचित नियतीला हे मान्य नव्हते. काही क्षणात होत्याच नव्ह्त झाल होत. ती अवघ्या बावीस-तेविस वर्षांचीच होती.  तीच विधवा होन्याच हे वय ही नव्ह्त. तिच्या वयातील कित्येक मुलिंच तर अजुन लग्न ही झाले नव्हते. ती आवघ्या बाविसाव्या वर्षीच विधवा झाली होती. 

    खुप कमी वयात तिच्यावर एवढा मोठा दुखाचा डोंगर कोसळला होता. हे दुःख तिला पेलावनार नव्ह्त पण नियतीच्या समोर कुनाचच काही चालत नाही. आलेली परिस्थिती तिला स्वीकारुन पुढील जीवन जगायच होत. तिच्या पतीचा अंत्यविधिचा कार्यक्रम आटोपला. दहा दिवस काही नातेवाईक तिच्या सोबतीला होते. पतीच्या दहाव्या पर्यन्त तिचे काही जवळचे नातेवाईक तिच्या जवळच थांबले होते. 

    दहाव्याचा दिवस उजाडला. दुपारपर्यन्त दहव्याचा पूर्ण कार्यक्रम आटपला. आता प्रत्येकाला आपला संसार बघावाच लागतो. तिचे एक-एक नातेवाईक आप-आपल्या घरी परतु लागली. आता घरात ती व तिचे वृध्द सासु सासरे तिघेच राहिले होते. 


    ती अवघ्या बावीस वर्षांची असल्याने तिला अजुन भरपूर आयुष्य लोटायच होत. तिच्या पतीचे निधन होउन काही दिवस उलटून गेले. ती आता तिच्या आई-वडीलांकड़े रहन्यास आली होती. ती आता आई-वडीलांकडेच राहू लागली. आता तीच परत तिच्या गावी येने-जाने सूरू झाले. आता ती पुर्विपेक्षा जास्त दिवस गावाकडे राहू लागली. हळूहळू ती स्वतःला सावरत होती. 

    त्याच ही गावाकडे जाने सुरूच होते. एक वेळी तो गावी गेला असताना त्याला ती दिसली. तिच्यासोबत झालेली दुखत घटना त्याला ज्ञात होती. त्याच्याच वयातील एका मुलाच्या सोबतीने तिची आणि त्याची गाठ पडली. यावेळी मात्र पहिल्या सारखा घाबरला नाही. तो तिच्याशी बोलला. तिची विचारपूस केली. तिही थोडा वेळ त्याच्याशी बोलली. आता तो जेव्हाही गावाकडे जात ती समोर दिसल्यावर आवर्जुन तिच्याशी बोलत असे. तिची विचारपूस करत असे. 

    आता कधी काळी ते दोघे फोन वर ही बोलत असे. त्यांच नेहमीच एकमेकांसोबत बोलन सुरु होते.त्याच अजूनही लग्न झालेले नव्हते तोही आता पंचवीस-सव्विस वर्षांचा झाला होता. त्याच नोकरी शोधण सुरूच होत. त्यामुळ लग्न ही बाकीच होते. त्या दोघांच नेहमीप्रमाणे बोलणे सुरूच होते. नकळत तो तिच्या प्रेमात पडला. ती विधवा आहे हे त्याला माहित होत. त्याने कुठलाही विचार न करता तिला प्रेमाची मागणी घातली. तीही एकट्याने आयुष्य कित्येक दिवस जगणार होती. 


    तिलाही कुणाची तरी साथ हवीच होती. तिनेही त्याला होकार दर्शवला. अशाप्रकारे त्याचा "एका विधवेशी प्रेमसंबंध जूळले" ते दोघे एकमेकांवर अफाट प्रेम करत होती. समाज काय विचार करेल याची त्यांना अजीबात फिकर वाटत नव्हती. आता चोरून लपून एकमेकांना भेटू लागली. कुणालाही संशय येणार नाही याची पूर्ण काळजी घेत असत. 

    त्यांच्या प्रेमसंबंधाला दोन वर्ष होत आली होती. त्या दोघानी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. ती विधवा व तो अविवाहित समाजाला हे लग्न मान्य होणार नाही याची त्यांना चांगली कल्पना होती. तरी ते दोघे या निर्णयावर ठाम होती. लग्न करण्यापूर्वी त्यांनी नातेवाईकातील काही लोकांना याची कल्पना देण्याच ठरवल. व त्यांच मन परिवर्तित करून लग्न करण्याचे ठरवले. 

    त्याला त्याच्या आई-वडीलांच्या सह्मतिनेच लग्न करायचे होते. तस त्याने काही जनांची मत जानुन घेण्याचा प्रयत्न केला. काही थोर समाज सेवकांची उदाहरने ही देऊ केली. पण काहींना हे मान्य होत तर काही हे लग्न चुकिच मानत असत. पण तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. त्याला आता ही कल्पना त्याच्या आई-वडीलांना द्यायची होती. 

    त्याच्या आई-वडिलांची समाजात खुप इज्जत करत व त्यांना खुप मानत असत. आता त्याने त्याच्या काही जवळच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली होती. त्यांचा या लग्नाला विरोध झाला. तू एक अविवाहित कुवारा मुलगा आहेस   तू एका विधवा मुलीसोबत लग्न नाही करू शकत. तुला समाज नाव ठेवेल. तरीही तो माघार घेण्यास तयार नव्हता. 

    त्याला तिच्याशिचलग्न करायचे होते. आता ही माहिती फक्त त्याला आपल्या घरात द्यायची होती. त्याने सर्व प्रथम ही बाब आपल्या लाहाण भावाला देण्याचे ठरवले. एक दिवस तो त्याच्या भावाला फिरन्यासाठी बाहेर घेवुन गेला. व तिकडे त्याने त्याच्या प्रेमासंबंधी पूर्ण माहिती दिली. त्याच्या भावाने ही गोष्ट चुकीची असल्याची कळवले. व त्याने एक वेळेस फक्त जन्मदिलेल्या आई-वडीलांबद्दल विचार करण्यास सांगितला. 

    पण तो काही केल्या ऐकायला तयार नव्हता. त्याच्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्या भावाने त्याची खुप समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण तो काही ऐकला नाही. तो त्याच्या निर्णयावर ठामच राहिला. एव्हाना तिच्याही बऱ्याच नातेवाईकांना याची कल्पना झाली होती त्यांनी ही यासाठी विरोधच दर्शवला. एक दिवस त्याच्या घरी ही गोष्ट माहित झाली. ताच्या वडीलांनी त्याच्याकड़े विचारना केली असता. त्याने आपले त्या विधवेशी असणारे प्रेमसंबंध मान्य केले. 

    या गोष्टी वरुण घरात खुप वाद पेटला. ती विधवा महिला ही नात्यातील असल्याने ही गोष्ट तिच्या आई-वडीलांना ही कळवली. इतर जवळील नातेवाईकांना मध्यस्थी करून तिचीही समजूत घालण्यास सांगीतले. दोघांच्या ही घरी मोठे वाद पेटले. तरी ही त्या दोघांच चोरून बोलन व चोरून एकमेकांना भेट्न सुरूच होत. एक दिवस तो तिला चोरून भेटणार असल्याच समजल. 

    त्या दोघांची भेटण्याची वेळ व ठिकाण याबद्दल त्याच्या घरी माहिती मिळाली. ते दोघेही भेटण्याच्या पुर्वीच त्यांची होणारी भेट उधळून लावली. त्यानंतर ते दोघ भेटणार असल्याची पूर्ण खात्री करून घेतली. त्याच्या वडीलांननी तिच्या वडीलांना फोन करुण याची कल्पना दिली. त्यानंतर त्याला त्याच्या वडीलांनी त्याला मारहान हि केली. 

    तिलाही तिकडे तिच्या बहिणीने मारहान केली. त्यानंतर काही नातेवाईक जमुन तिची समजूत काढून तिला हे सर्व थांबन्यास सांगीतले. तिने ही सर्वांची माफ़ी मागितली व आपली चुक सूधारन्याची तयारी दर्शिवली. 

    समाजाला त्यांचा विवाह अजीबात मान्य नव्हता. समाजाने त्यांच्या विवाहाला कडाडून विरोध केला. अवघ्या काही महिन्यातच घाई-घाईने दूसरा वर शोधला. त्याचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. त्याच्यासोबत तिचा द्वितीय विवाह करण्यात आला. आणि शेवटी त्याचा आई-वडीलांनी सुटकेचा श्वास घेतला. पुढील काही दिवसात त्याच्यासाठी ही एक कुमारिका शोधून त्यालाही लवकरात लवकर विवाह बंधनात अडकवन्यात आले. 


"अजूनही आपला समाज पाहिजे तसा सुधारला नाही, आजुनही एका अविवाहित तरुनाचे एका विधवेशी प्रेमसंबंध व एका विधवेशी विवाह हे समाजाला मान्य नाही" ,

"ती विधवा होण्यामागे तिचा काहीच दोष नसतो","समाजाने तिला स्विकारायला हव"


Jivan Ek Katha हा Marathi Katha blog आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना नक्की share करा .

 धन्यवाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेम आणि मैत्री | Jivan Ek Katha | Marathi Katha

"ती" एक सन्मान | Jivan Ek Katha | Marathi Katha

प्रेम भंग | Jivan Ek Katha | Marathi Katha