प्रेम बालपणातले | Jivan Ek Katha | Marathi Katha
तो एकदम गुटगुटित व खुप गोड मूलगा असल्याने तो सर्वांना खुप आवडायचा. पण संदीपचा स्वभाव खुप शांत होता. त्यामुळच सर्व त्याला चिडवत असायचे. परंतु संदीप घरात लहान असल्याने त्याचा लाड ही खुप होत असे. लहानपणी संदीप अभ्यासात ही हुशार होता,
संदीप दुसरीत असतानाच चांगल्याप्रकारे लिहायला व वाचायला शिकला होता. संदीप व त्याचा भाऊ आणि बहीण तिघेही एकाच शाळेत होते. संदीपच्या घरा जवळच काही अंतरावर "पूनमच" घर होत. पूनम आणि संदीप एकाच वर्गात होते. पण संदीप खुप लाजाळू असल्याने तो जास्त कुणासोबत बोलत नसायचा. लहानपणी त्याला कुणीच मित्र नव्हते.
शाळेतुन आल्यावर तो घरातच खेळत असे. शाळेतही तो इतर मुलांसोबत जास्त बोलत नव्हता. पूनमलाही एक मोठी बहीण होती. संदीपची बहीण व पूनमची बहीण या दोघी बऱ्यापैकी मैत्रिणी होत्या. कधी तरी घरासमोरून येता-जाताना एकमेकींना बोलत असायच्या.
पण पूनम नावाची कुणी मुलगी संदीपच्या वर्गात आहे व ती संदीपच्या घराजवळ रहाते हे संदीपला माहितही नव्हते. दूसरी-तिसरीत शाळेत असताना मोजक्या दोन-तिन मुलांसोबत संदीपची ओळख होती. बाकी मुलांच त्याला नावही माहित नव्हते. मुलींबद्दल माहिती असण तर खुप दुरची गोष्ट आहे.
संदीप आता तीसरीत गेला होता. पण त्याचा शांत आणि लाजाळू स्वभाव काही बदलला नव्हता. शाळेतील शिक्षक ही संदीपच्या आई-वडिलांना संगत असे "हा खुपच शांत-शांत राहतो कधी कुणाशी जास्त बोलत नाही" त्याचे आई-वडील ही तेच शिक्षकांना सांगत तो घरी ही खुप शांत असतो फक्त आपल्या कमाशी काम ठेवतो. पण संदीप खुप गुणी होता आणि हाच स्वभाव त्याचा सर्वांना आवडत असे.
पूनम ही खुप हुशार मुलगी होती. "हो संदीप पेक्षाही ती खुप हुशार मुलगी होती!" तिचा नेहमी वर्गात नंबर येत असे. आता संदीपची वर्गातील मुलांसोबत बऱ्यापैकी चांगली तोंड ओळख झाली होती. पूनम ही अभ्यासात हुशार असल्याने, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी नेहमी अग्रेसर असायची. त्यामुळ संदीप तिला ही आता ओळखु लागला.
पण अद्याप संदीपला माहित नव्हते की ही मुलगी त्याच्या घराजवळच रहाते !. काही दिवस उलटून गेले. संदीपच नियमित शाळेत जाने व घरी आल्यावर घरातच अभ्यास करणे व घरातच खेळने सुरु होते. तो आता "चौथीत" गेला होता पण अजूनही त्याला घरातून बाहेर जावून इतर मुलांसोबत खेळायला आवडत नसे. फक्त कधीतरी घरातील इतर व्यक्तींसोबत फिरायला बाहेर जायचा तेवढच. इतर वेळेस तो घरातच त्याच्या बहीण भावांसोबत खेळत असायचा.
नेहमीप्रमाणे एक दिवस संदीप त्याच्या बहीनीसोबत काहीतरी सामान घेण्यासाठी बाहेर गेला. तस पूनमच्या घरासमोरूनच त्यांच नेहमी येन जाने असायचे. त्या दिवशी तिकडून परतत असताना, पूनम व तिची बहीण त्यांच्या घराबाहेर उभ्या होत्या. येताना नेहमीप्रमाणे संदीप ची बहीण दोन मिनिट तिथ उभ राहून पूनमच्या बहीनिसोबत बोलत होती.
संदीप ही तिच्या सोबत होताच. त्यावेळी त्याची नजर पूनम कड़े गेली. त्याने तिला ओळखून घेतले होते. "की ही आपल्याच वर्गातील मुलगी आहे". पण त्याने फार जास्त लक्ष दिले नाही. त्याने पूनमकड़े बघून न बघितल्या सारखे केले. व थोडा वेळात त्याच्या बहीनिसोबत घरी निघून आला.
दूसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे शाळेत गेला. पूनम ही शाळेत गेली होती. पण ते दोघ जवळच राहतात या गोष्टीकड़े त्यांनी विशेष काही लक्ष दिले नाही. काही दिवस निघून गेलेत. परत एक वेळेस संदीप व त्याची बहीण बाहेर जात असताना पूनम त्याला घराबाहेर दिसली.
या वेळेस त्याने तिला व्यवस्थित बघीतले. या वेळेस त्याला चांगल्या प्रकारे माहित झाले होते की त्याच्याच वर्गात शिकणारी पूनम ही त्याच्या घराजवळच रहाते. पूनम हे जानत होती की नाही या बद्दल त्याला अजीबात कल्पना नव्हती. शांत स्वभाव असल्याने व कुणाशी जास्त बोलायला ही आवडत नसल्याने, तो ही तिला काही बोलला नाही.
शाळेत ही त्याने कधी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. तस मूल आणि मुली एकमेकांसोबत जास्त बोलत नसायचे. त्यात संदीप आधीच लाजाळू होता. पण आता पूनम सोडली तर वर्गातील इतर मुलींबद्दल तो काहीच जानत नव्हता.
कधी काळी वर्गात पूनमकड़े नजर गेल्यास ही आपल्या घर जवळच रहाते फक्त एवढाच विचार त्याच्या डोक्यात येत असे. पण तो या बद्दल वर्गात कधी कुनालाच बोलला नाही. काही दिवस असेच निघून गेलेत. कधी तरी घराबाहेर पूनम दिसल्यावर त्याची नजर सहज तिच्याकडे जात असे.
एकदम निरागसतेने सहज बोलून गेला तो. आणि त्याच्या बहिणीला संदीपला चिडवन्यासाठी आणखी एक नविन बहाना भेटला. तस ऐन तीसरीत असलेल्या संदीपला प्रेम काय असत हे काहीच कळत नव्हते. त्यामुळ त्याच्या मनात तस कुठलाच उद्देश नव्हता. हे त्याच्या बहिणीला ही ज्ञात होते. पण त्याला चिडवन्यासाठी एक नविन कारण त्याच्या बहिणीला मिळाले होते. त्याची बहीण त्या दिवशी त्याला चिडवायला लागली.
"तुला पूनम आवडती का?" त्याला काहीच समजल नाही की त्याची बहीण त्याला अस का विचारतीये. तो त्यावर काहीच बोलला नाही. व त्याच्या खेळन्याच्या नादात लागुन गेला. दोन तिन दिवस उलटून गेलेत. संदीपची बहीण परत त्याला चिडवायला लागली. "पूनम बाहेर आली बघ, तुलाच बघतीये ती" संदीपला आपली बहीण आपल्याला चिडवत आहे हे त्याला समजलेच नाही.
तो ही बाहेर येवून तिला बघू लागला. अद्यापही त्याला त्याची बहीण काही तरी वेगळ्या कारणाने चिडवत आहे याची कल्पना नव्हती. काही दिवस असेच निघून गेलेत. एक दिवस संध्याकाळी पूनम तिच्या घराबाहेर खेळत होती. संदीप ही त्याच वेळेस घरातन बाहेर पडला. हे त्याच्या बहीनीने बघीतले व परत त्याला चिडवायला लागली. पूनम घरातन बाहेर आली की लगेच तू ही बाहेर येतो.
"तुला पूनम सोबत लग्न तर करायची इच्छा नाहीये ना". त्याची बहीण त्याला चिडवत आहे हे त्याला जाणवत होत. त्याच्या बहिणीच बोलन ऐकून तो लाजुन घरात पळून गेला. त्याच्या भावाला ही याबद्दल माहित झाल. तो ही आता संदीपला नेहमी पूनमच्या नावाने चिडवू लागला.
आता संदीपला कधी कधी या चीडवन्याचा राग ही येत असे. त्यामुळ आता तो पूनम जर घराबाहेर दिसली की लागलीच घरात निघून जात असे. शाळेतही तो पूनम कड़े बघत नव्हता. पण शाळेतुन घरी आल्यावर त्याची बहीण व भाऊनक्की त्याला विचारत असे "आज पूनम आली होती का?" संदीप आता या चिडवन्याला वैतागला होता. त्यामुळ आता तो ही त्यांच्याकड़े लक्ष देत नव्हता.
फक्त पूनम जर दिसली तर तो तिच्या समोर अजीबात थांबत नव्हता. पण पूनमला तिच्या नावाने संदीपला कुणीतरी चिडवत आहे याची जरा ही कल्पना नव्हती. आणि त्या दोघांच ते वय ही नव्ह्त. संदीपला त्याचे बहीण भाऊ चिडवतील म्हणून तो कधीच घराबाहेर पडून इतर मुलांसोबत खेळत नव्हता. शाळेतच त्याचे जे काही मित्र झाले होते त्यांच्या सोबतच तो खेळायचा.
एक दोन वर्ष असेच निघून गेलेत हळूहळू त्याच्या बहीण भावांच त्याला चिडवन्याच प्रमाण कमी होत गेल. कारण आता संदीप सज्ञान होत चालला होता. पण पुनमला बघितल्यावर अजुनही त्याच्या मनात तेच येत असे की परत आपल्याला आपले बहीण भाऊ चिडवतील. त्यामुळ तो नेहमी सावध असायचा. शाळेतही तो पूनम कड़े अजीबात लक्ष देत नसे.
आता संदीप आणि पूनम इयत्ता पाचवी मध्ये गेले होते. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने मूलांचे व मुलींचे वर्ग वेग-वेगळे करण्यात आले होते. अर्थात आता पूनम आणि संदीप एका वर्गात राहणार नव्हते. संदीपला आता वर्गात पूनम दिसणार नव्हती. त्यामुळ तो आता वर्गात लाजत ही नसे. इतर मुलांसोबत त्याची चांगल्याप्रकारे मैत्री ही झाली होती.
आता त्याचे बहिण-भाऊ त्याला पूनम च्या नावाने चिडवण विसरले होते. संदीप ही आता समजदार झाला होता. पण आता त्याला घरात ही कुणी पूनम च्या नावाने चिडवत नसल्याने तो पूनम समोर घरातन बाहेर पडायला लाजत नसे.
बघता बघता सातवीची परीक्षा झाली. नेहेमीप्रमाणे यंदा ही पूनम सर्व मुला-मुलींमध्ये प्रथम आली होती. पूनम शिक्षणात खुप हुशार असल्याने तिला पुढील शिक्षणासाठी आणखी चांगल्या शाळेत दाखल करण्याचा निर्णय तिच्या आई-वडीलांनी घेतला.
आठवी ला पूनम दूसऱ्या शाळेत गेली. संदीप होता त्याचा शाळेत राहिला. आता पूनम संदीपला शाळेत अजीबात दिसत नव्हती. फक्त कधी काळी घरा जवळ दिसली तर दिसली. आता संदीपला प्रेम हे नात थोड थोड समजू लागल होत. वर्गातील इतर काही मूल ही मुली प्रेम या वर गप्प रंगवत असायचे. जनु हळूहळू सर्वजन प्रेम करण्याच्या वयात पदार्पण करीत होते.
संदीप ही इतर मुलांसोबत सर्व गोष्टी व्यवस्थित जानुन घेत होता. नववी मध्ये असताना त्याच्या वर्गातील काही मुलांना शाळेतील इतर मुलींवर प्रेम ही झाले होते. त्यातील काही मूल मुलींना प्रेमासाठी मागणी कशी घालायची यावर चर्चा करायची. काही मुलांनी तर चक्क तसा प्रयत्न ही केला होता.
वर्गातील मुलांच प्रेम प्रकरण बघून संदीप मध्ये ही प्रेमाची ठिणगी कुठ तरी पेटत होती. त्याच्या मनात सुध्दा प्रेमाच्या भावना जाग्या झाल्या होत्या. त्याला लहानपणा पासून पूनमला बघून लाजायची ती दिसली की कुठ तरी लपून जायचे हीच सवय आता त्याच आकर्षण बनली होती.
"होय" संदीप आता पूनमकड़े आकर्षित झाला होता. इतर मुलांप्रमाणे तो ही आता प्रेमात पडला होता. व त्याच प्रेम दुसर तीसर कुणी नसून त्याच्या घराजवळील पूनम होती. आता संदीप पुनमला बघून लाजत नसे किंवा तिला बघून लपत ही नव्हता. उलट ती घरातन बाहेर येण्याची वाट बघत असे.
पण अजुन याबद्दल पूनम काहीही माहित नव्हते. त्यामुळ पूनम संदीपकड़े कधी लक्ष ही देत नव्हती. आता काही दिवसांवर त्यांची दहावीची परीक्षा येवून ठेपली होती. सर्वजण अभ्यासात रमले होते. संदीप ही नियमित अभ्यास करू लागला. दहावीचे पेपर झालेत. यंदाही नेहमी प्रमाणे पूनम खुप चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली होती. तिच्या समोर संदीपचे मार्क नगण्य होते. याची संदीपला कुठेतरी खंत वाटली.
तरी संदीपने पूनम वर असच प्रेम करण्याच ठरवल कारण पूनम हे त्याच पहिले प्रेम होत. आता संदीप आकरावित गेला होता. त्याचे इतर नवनवीन मित्र झाले होते. कधीतरी मित्रांच एकमेकांच्या घरी येन चालू असायच. एक दिवस संदीप त्याच्या मित्रांसोबत घराबाहेर उभा होता. तितक्यात तिकड़न पूनम ही बाहेर आली.
न रहावुन संदीपने त्याच्या मित्रांना त्याच्या प्रेमाची कल्पना दिली. व त्याच पहिल प्रेम असलेली पूनम ही त्याच्या मित्रांना दाखवली. त्याच्या मित्रांनी त्याला पूनमच प्रेम मीळवून देण्यासाठी साथ देण्याच वचन दिल. संदीपला आता थोडी हिम्मत आली होती. पण या सर्व प्रकारात एक-दोन वर्ष निघून गेली होती. त्यांची बारावीची परीक्षा ही झाली होती.
पण आतापर्यन्त पूनमला या बद्दल थोड़ी जाणीव झाली होती. कारण संदीपच नेहमी तिच्याकड बघन. तिच्या मागेमागे कधी तरी तिच्या महाविद्यालयात जाने. ती जर दिसली नाही तर मुद्दाम तिच्या घरासमोरून चक्कर मारने या सर्व गोष्टी पूनमच्या लक्षात आल्या होत्या.
तीचही तेच प्रेम खर प्रेम करण्याच वय होत. शिवाय लहनपना पासून संदीपला ती ओळखत होती. संदीप तसा स्वभावाने खुप चांगला मुलगा होता. त्यामुळ पूनमला संदीपचा या गोष्टीचा अजीबात राग येत नव्हता. उलट पूनम ही संदीपच्या प्रेमात बुडत होती. पूनमलाही संदीप आवडायला लागला होता. पूनमही आता आपल्या प्रेमात पडली आहे याची जाणीव संदीपला झाली. आता संदीप पूनमच्या प्रेमात अकांठ बुडाला होता. संदीप पूनमवर जीवापाड प्रेम करू लागला.
संदीप पूनमला प्रेमाची मागणी घालण्यास खुप प्रयत्न करू लागला. पण तिला बोलण्याच धाडस काही होत नव्ह्त. त्यात पूनम ही शिक्षणात त्याच्यापेक्षा खुप पुढे निघून गेली होती त्यामुळ त्याला कुठे तरी स्वतःमध्ये कमीपणा दिसू लागला. कधी कधी त्याच्या मनात विचार येत की आपल्यामुळे पूनमच आयुष्य खराब नाही झाल पाहिजे.
त्याच्या मित्रांनी त्याला पूनम समोर प्रेमाचा प्रस्ताव मांडन्यासाठी खुप मदत केली. प्रत्येक वेळी त्याच्यासोबत असायचे. पण काही केल्या संदीपने पूनमला बोलण्याच धाडस नाही दाखवल. या सर्व गोष्टी घडत असताना. पूनमच शिक्षणातळ लक्ष काही कमी झालेल नव्ह्त. एव्हाना ती शिक्षणात संदीप पेक्षा खुप पुढे निघून गेली होती. आता संदीपलाही तिच्या समोर जाण्याची लाज वाटू लागली.
त्याचा कमीपणा त्याला जाणवू लागला होता. पण पूनमला याबद्दल काही हरकत नव्हती. ती संदीपला कुठेच कमी समजत नव्हती. पूनम ही संदीप वर जिवापाड प्रेम करत होती. तिलाही वाटत होत संदीपने आपल्याला प्रेमासाठी मागणी घालावी. पण संदीपने शेवटपर्यन्त काही हिम्मत दाखवली नाही. संदीपला आता प्रेमापेक्षा त्याचा कमीपणाजास्त खूनवत होता.
त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. व त्याने शेवटी कठोर निर्णय घेतला. पूनमला मनातून काढून टाकायचे. पूनमला विसरून जायचे त्याने ठरवले. पण पूनम अजूनही त्याच्यावर आतोनात प्रेम करत होती. तिला याची मुळीच कल्पना नव्हती की संदीप आपल्याला विसरण्याचा प्रयत्न करतोय. पूनमला विसरण संदीपसाठी खुप अवघड गोष्ट होती.
कारण तिची सवय त्याला झालेली होती. घरा जवळरहात असल्याने रोज पूनम त्याला दिसत असे. जर कधी पूनमला संदीप दिसला नाही तर ती मुद्दाम त्याच्या घरासमोरून चक्कर मारत असे. संदीपही खुप प्रयत्न करून तिला विसरु शकत नव्हता.
संदीपला रोज घराबाहेर येवून तिला बघण्याची सवय झालेली होती. शेवटी इच्छा नसतानाही त्याला पूनमला विसरायच होत. शेवटी त्याने काही दिवस दूर राहण्याचा निर्णय घेतला. दोन वर्ष संदीप शिक्षणाच्या निमित्ताने घरापासून दूर दूसऱ्या शहरात रहायला गेला. त्याने शिक्षणात चांगल मन रमवले.
दोन वर्षात तोही अभ्यासात चांगला हुशार झाला. पण आता तो पूनमला विसरून गेला होता. व पूनमही त्याला विसरत चालली होती. इकडे घरात आता पूनमच्या लग्नाचा विषय चालू होता त्यामुळ पूनमने ही त्याला विसरण्याच ठरवल.
पण आता संदीपही शिक्षणात पूनमच्या बरोबरीत आला होता. परंतु वेळीच प्रेमाची मागणी घालण्याच धाडस न केल्यामुळे त्याला त्याच्या पहिल्या प्रेमापासून मुकावे लागले.
अशाप्रकारे संदीप आणि पूनम दोघेही एकमेकांवर आतोनात प्रेम करत असताना ही त्यांच प्रेम अधूर राहिले. व एकमेकांच्या प्रेमापासून मुकावे लागले.
"जर संदीपने वेळीच धाडस दाखवले असते तर त्याची पूनम आज त्याच्यासोबत असती त्याच्यासोबत पूनमलाही तिच्या पहिल्या प्रेमापासून मुकावं लागलं"!!!!



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा