धोकेबाज प्रेयसी | Jivan Ek Katha | Marathi Katha
जीवन एक कथा । मराठी कथा
धोकेबाज प्रेयसी
अनिल एक सर्वसाधारण व स्वभावाने अतिशय गरीब मुलगा. अभ्यासात मात्र अतिशय हुशार. अनिलचे आई-वडील दोघेही अशिक्षीत होते. घरात त्याच्या शिक्षणाकड़े लक्ष देणार कुणीही नसताना. अनिल प्रमाणिकपणे नियमित अभ्यास करत असत. घरापासून शाळा फार दूर होती. तरीही रोज शाळेत पायी येने जाने करून तो शाळा पूर्ण करू लागला.
त्याने कधीही शाळेचा कंटाळा केला नाही. त्याला शिक्षणाची खुप आवड होती. शेजारील मुले शाळा फार दूर असल्याने. कुठल्यान कुठल्या कारणाने शाळेला सुट्टी मारत असत. पण अनिल कधीच खोट बोलूण शाळेला दांडी मारत नसे. अनिल शाळेत ही खुप शांत असायचा. कधीच शाळेत इतर मुलांसारखा दंगा मस्ती करत नसे. अनिलने पाचवी-सहावी पर्यंत पाई जावून शाळा पूर्ण केली होती.
आता तो साईकल चालवण्या इतपत मोठा झाला होता. त्याची शाळेत जाण्यासाठी होणारी धडपड त्याच्या वडीलाना बघवत नव्हती. त्याला शिक्षणात आवड असल्याने त्याला कुठलीच गोष्ट कमी पडू द्यायची नाही हे त्यांनी ठरवले. अनिलच्या वाढदिवसच्या दिवशी त्याच्या वडीलांनी त्याला साईकल भेट दिली जेणेकरून त्याला शाळेत येन्या-जान्यासाठी त्रास होणार नाही. आता अनिल साईकल वर शाळेत येने-जाने करू लागला. त्याचा शाळेत येन्याजान्यासाठी लागणार वेळ वाचू लागला.
तेवढाच जास्त वेळ तो अभ्यासाला देवू लागला. जराही वेळ तो वाया जाऊ देत नसत. बघता बघता त्याच शालेय शिक्षण दहावीच्या उंबरठयावर येवून थांबले. त्याने दहावीच्या परीक्षेची जोरदार तयारी सुरु केली. सुरुवातीपासूनच तो तयारीला लागला होता.
अभ्यासात नियमितता असल्याने त्याला कुठलाच विषय अवघड जात नसे. अनिलने त्याच्या अभ्यासाच्या जोरावर दहावीचे पेपर देण्यास सुरुवात केली. त्याची पूर्ण तयारी झालेली असल्याने तो कुठल्याही तनावात नव्हता. त्याने सर्व पेपर खुप छान सोडवले होते.
अनिल दहावीची परीक्षा खुप चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. त्याच्या परिवारात सर्वांना खुप आनंद झाला. आई-वडील अशिक्षीत असतानाही मुलगा शिक्षणात खुप हुशार निघाला. सर्वांनी त्याला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा दिल्यात.
आता त्याने एका चांगल्या महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्याच महाविद्यालय शाळेपेक्षा आणखी जास्त दूर असल्याने त्याला बसने जाने येने करावे लागत होते. महाविद्यालयातिल सुरुवातीचे दोन-तिन महीने खुप छान गेले.
महाविद्यालयीन शिक्षणात ही तो खुप छान रमला होता. पण त्याला महाविद्यालयीन शिक्षणासाठी खर्च खुप लागत होता. त्याचा आता बसने रोज जाण्याचा खर्च ही वाढला होता. व शिक्षणासाठी लागणारा इतर खर्च ही वाढला होता. त्याला आपल्याला शिक्षणासाठी लागणारा खर्च माहित होता. एवढा खर्च त्याचे आई-वडील उचलु शकत नाही याची त्याला जाणीव होती.
त्याने आता स्वतःच्या शिक्षणाचा खर्च स्वतः भागवन्याचे ठरवले. शिक्षण घेता घेता थोड फार काम करून शिक्षनाला लागणारा पैसा मिलळवन्याच ठरवल. तो आता अधुन-मधून सुट्टी मारून कामावर जाऊ लागला. ज्याने शालेय जीवनात कधीही जास्त सुट्टी मारली नाही त्याला आता पैसा मीळवन्यासाठी सुट्टी मारावी लागत असे.
ह्फ्त्यातन किमान दोन-तिन वेळेस तरी कामावर जात असत. मात्र याचा परिणाम त्याच्या शिक्षणावर होऊ लागला. कॉलेज मध्ये तो नियमित नसल्याने त्याचा अभ्यास ही अपूर्ण रहात असे. पण त्याला कामही करावच लागणार होत. अभ्यासात हुशार असणारा. आता तो शिक्षणात माघे पडत चालला होता. कॉलेज मध्ये अनियमितता असल्याने त्याला वर्गात शिकवलेल ही फार समजत नसे.
तो आता जास्त वेळ कामावर जाऊ लागला. त्याला आई-वडीलांना ही थोडा फार हातभार लावायचा होता. पण याचा परिणाम थेट त्याच्या शिक्षणावर होत होता. त्याचे अकरावीचे पेपर सुरु झालेत. त्याने काही दिवस काम बंद केले व परिक्षेवर लक्ष केंद्रित केले. दहावी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होणाऱ्या अनिलला आकरावीची परीक्षा अवघड गेली.
कसाबसा अनिल आकरावी पास झाला. आता बारावी सुरु झाली होती. त्याने परत काम आणि अभ्यास दोन्हीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले. इतर मुलांसारख त्याला अतिरिक्त शिकवणी ही लावता आली नाही. वर्गात जे शिकवत त्यावरच तो अभ्यास करत असत. बारावीच वर्ष असल्याने तो आता कामावर कमी जात असे. त्याला बारावी चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हायचे होते.
त्याने पुर्विप्रमाणे अभ्यास चालू केला. पण त्याच आता पूर्वीप्रमाणे अभ्यासावर लक्ष लागत नसे. त्याला कामावर जाण्याची सवय जडली होती. केलेला अभ्यास ही त्याच्या लक्षात रहात नव्हता. त्याला सर्व अवघड वाटत होते. शिवाय त्याला काम ही सोडता येत नव्हते. कसाबसा अभ्यास करून त्याने बाराविचे पेपर दिलेत. व सुट्टीमध्ये रोज कामावर जाऊ लागला.
जेणेकरून पुढील शिक्षणासाठी लागणारा पैसा आत्ताच साठवून ठेवावा हा त्याचा उद्देश होता. सुट्टीचे दोन महीने त्याने भरपूर मेहनत करून बऱ्यापैकी पैसे कमवले होते. तो चौदा ते पंधरा तास फक्त काम करत असत. आता त्याचा बाराविचा निकाल लागणार होता. पेपर अवघड गेले असल्याने त्याची धाकधुक वाढली होती. अनिल आपला बारावीचा निकाल बघण्यासाठी गेला.
त्याला त्याचा निकाल कळाला. पण यावेळी त्याला त्याच्या नशिबाने साथ दिली नव्हती. कुठेतरी कामाच्या व्यापात त्याचा अभ्यास कमी पडला होता. अनिल बारावीच्या परीक्षेत दोन विषयात अनुत्तीर्ण झाला होता. अनिल खुप नाराज झाला. त्याच शिक्षण आता थांबणार होत. त्याचे आई-वडील ही खुप नाराज झाले. पण परिस्थिती पुढे त्यांच ही काही चालले नाही.
त्याने तरी परत एक वेळेस प्रयत्न करण्याचे ठरविले. अनिल ने पुन:परीक्षेचा फॉर्म भरला. पण आता त्याला कॉलेज न करता पेपर द्यायचा होता. परीक्षेला अजुन वाव होता. तस त्याची ही आता शिकण्याची इच्छा संपली होती. त्याने आता नियमित कामावर जावून कुटुंबाला मदत करण्याचे ठरवले. तो नियमित कामावर जाऊ लागला. आपण शिक्षणात मागे पडल्याची उणीव त्याला भासत होती.
पण त्यावर दुर्लक्ष करून त्याने कामावर लक्ष देण्याचे ठरविले. नियमित कामावर जात असल्याने तेथील त्याच्या बरोबरीचे काही मुलांशी त्याची चांगली ओळख निर्माण झाली. आपल शिक्षणात झालेल नुकसान विसरून आता त्या मुलांसोबत हसून खेळून काम करत असे. कधी तरी सुट्टीच्या दिवशी त्यांच्या सोबत बाहेर फिरायला जाने तर कधी जेवन करण्यास होटेल वर जाने चालू होते.
काही दिवसात अनिलचे बाराविचे पेपर होते. त्याने पुन्हा तयारी सुरु केली. पण अभ्यासापासून दूर झाल्याने त्याला अभ्यासात काहीच रुची वाटत नसे. त्यामुळ कसे तरी त्याने पुन्हा परीक्षा दिली. व तो पुन्हा अनुत्तीर्ण झाला. आता त्याने शिक्षण थांबवन्याचे ठरविले. आणि नियमित काम करून घर चालवण्याचा निर्णय घेतला. तो आता शिक्षण सोडून कामावर लक्ष देवू लागला.
शिक्षणात पूर्ण लक्ष घातल्याने त्याने कधी हाउस मजा केली नव्हती. अभ्यासा व्यतीरीक्त कुठल्याच गोष्टीचा विचार त्याने केला नव्हता. पण आता तो कामावरील मुलांसोबत भरपूर मज्जा करत असत. तो आपल्या कामात खुप खुश होता. त्याने आपल्या कामात ही खुप मन रमवल होत. त्याच्या सोबत कामावर असलेल्या काही मुलांच्या प्रेयसी ही होत्या.
ते मूल कधी तरी त्यांच्या प्रेयसी सोबत फोनवर बोलत तर कधी भेटायला ही जात असे. असाच त्याचा एका मित्राने त्याच्या प्रेयसीला भेटायला जात असताना अनिलला ही सोबत नेले. ता अनिलला यापूर्वी एक ही मैत्रीण नव्हती. त्यामुळ त्याला मुलिंबद्दल एक विशेष आकर्षण वाटत होत. तोही त्याच्या मित्रासोबत त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला.
सुरुवातीला त्याला मुलीसोबत बोलायला भीती वाटू लागली पण हळूहळू त्याची भीती दूर होत गेली. दोन-तिन वेळेस त्याच्या मित्रासोबत मित्राच्या प्रेयसीला भेटायला गेल्याने . आता त्याला कुठे तरी वाटत होते की आपली ही एक प्रेयसी असावी. आपण ही तिच्याशी फोनवर बोलाव तिला भेटायला जाव. पण त्याची एकही मैत्रीण नसल्याने किवा एकाही मुलीसोबत ओळख नसल्याने त्याला हे अवघड जाणार होते.
तरीही त्याने प्रयत्न करण्याचे ठरवले. तो आता त्याच्या मित्रासोबत भरपूर वेळेस त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी जाऊ लागला. एक दोन वेळेस त्या मुलीची ही मैत्रीण नंदिनी ही तिच्यासोबत होती. तशी नंदिनी आणि अनिलची बऱ्यापैकी ओळख झाली होती. नंदिनी दिसायला सुंदर होती. अनिलने नंदिनीला आपली प्रेयसी बनवण्याचे ठरविले.
त्याप्रमाणे अनिल तयारीला लागला. अनिल ने नंदिनी सोबत चांगली ओळख करून घेतली. नंदिनी कॉलेज मधे शिकत होती. त्यामुळ ती नेहमीच तिच्या मैत्रिणीसोबत येत नसे. एक दोन महीने झाले अनिल नंदिनीला भेटला नव्हता. एक दिवस त्याने नंदिनीचा फोन नंबर मीळवला व तिच्याशी फोनवर संपर्क साधला. तीही अनिलला ओळखत असल्याने तीही अनिलसोबत व्यवस्थित फोनवर बोलली.
अनिलने तिची व्यवस्थित विचारपूस केली. हळूहळू दोघे आता कधीतरी एकमेकांना फोन करून बोलत असे. अनिलने आधीच नंदिनीला आपली प्रेयसी बनवण्याच ठरवल असल्याने तो तिच्याशी अधिक आपुलकीने बोलू लागला. नंदिनीला ही अनिलच बोलण आवडत असे. एक दिवस अनिलने नंदिनीकड़े प्रेमाची मागणी घालायचे ठरवले.
तस त्याने तिला वाईट वाटणार नाही याची पूर्ण काळजी घेत विचारण्याच ठरवले. ठरल्याप्रमाणे अनिलने नंदिनीला नेहमीप्रमाणे फोन केला. सुरुवातीला तिची व्यवस्थित विचारपूस केली. नंतर तिचा मूड बघून तिला प्रेमाची मागणी घातली. अनिल एक चांगला साध्य सरळ स्वभावाच आहे हे ती चांगल ओळखून होती. त्यामुळ तिनेही अनिलच्या मागणीला होकार कळवला.
बघता बघता अनिलच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली. अनिल साध्या सरळ स्वभावाचा असल्याने त्याच्या मनात कुठलही कपट नव्हते. तो नंदिनीवर जिवापाड प्रेम करू लागला. नंदिनीची नियमित काळजी घेवु लागला. अनिल आणि नंदिनीही आता एकमेकांना भेटण्यासाठी जाऊ लागले. नंदिनी आता अनिलसाठी त्याचा जीव की प्राण झाली होती.
तो तिच्यासाठी आपल सर्वस्व पणाला लावत असे. कधी ती आजारी पडली तर स्वतः अनिल तिला दवाखान्यात घेवुन जात असत. अनिल आता सुट्टीच्या दिवशी नियमित नंदिनीला भेटण्यास जाऊ लागला. तो नंदिनीवर खर्च ही खुप करू लागला. नंदिनीची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करू लागला. त्या दोघांच्या प्रेमाला चांगलाच बहर आला होता. नंदिनी ही अनिल वर आपला जीव ओवाळून टाकत असे.
बघता बघता दोघांच्या प्रेमाला दोन वर्ष पूर्ण होत आली होती. एवढ्या दिवसात दोघांमध्ये एकदाही वाद झाला नव्हता. अनिलने आता नंदिनी सोबत आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याने नंदिनी सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. नंदिनीसोबत भेट झाल्यावर त्याने त्याच्या मनातील तिला बोलून दाखविले. त्याने तिच्याकडे लग्नाची मागणी घातली.
अनिल खुप प्रमाणिक व साधा सरळ मुलगा असल्याने तिनेही त्याला आपल्या आयुष्यभराच्या साथीदार होण्यासाठी होकार दर्शवला. अनिल खुप खुश होता. त्या दोघांचा लग्नाचा निर्णय पक्का होता. त्यामुळ आता अनिलने त्याच्या नातेवाईकातील त्याच्यासोबत मित्र म्हणून असणाऱ्या काही जणांना याची कल्पना दिली तर काहींची भेटही घालून दिली.
आता अनिल ने नंदिनी सोबत फोन करण्याच व भेटण्याच प्रमाण वाढवल होत. नंदिनीही सुरुवातीला त्याला व्यवस्थित प्रतिसाद देत होती. पण कालांतराने तिच्यात हीओ अनिलला फरक जाणवू लागला. नंदिनी बहुतेक वेळा अनिलचा फोन स्वीकारत नसत. तर कधी कधी तिचा फोन बंद लागत. तरीही अनिलने याचे वाईट वाटुन घेतले नाही.
पण तीच अस वागन वाढतच राहील. नंदिनी आता अनिलसोबत भेटण्यास ही टाळाटाळ करत असे. नंदिनी आपल्यासोबत अशी का वागत आहे हे त्याला अजीबात समजत नव्हते. तो नंदिनी ला विचारू लागला तर त्यावर नंदिनीही व्यवस्थित उत्तर देत नसे. एक दिवस याच कारणावरून दोघांमध्ये वाद ही झाला. अनिलने नंदिनीला खुप समजावून सांगीतले पण नंदिनीच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता.
एक दिवस अनिलने नंदिनीला संध्याकाळी बाहेर होटल वे जेवन करण्यास बोलवले. सुरुवातीला नंदिनी हो बोलली व नंतर तिने येण्यास नकार दिला. अनिलला आता नंदिनीवर वेगळाच संशय येवू लागला. अनिलने नंदिनी अशी का वागत आहे याचा शोध घेन्याच ठरवले. एक दिवस अनिलने नंदिनी सध्या कुठे आहे याचा तपास केला. त्यानंतर त्याने नंदिनीला भेटण्यासाठी अग्रह केला.
त्यावर नंदिनीने आपल्याला काम आहे अस सांगुन नकार कळवला. पण नंदिनी सध्या कुठे आहे हे त्याला माहित होते. तो त्या ठिकाणी पोहचला. त्यानंतर तिच्यावर बारकाइने लक्ष ठेवून होता. नंदिनी त्या ठिकाणहुन जाण्यास निघाली. तिच्या पाठोपाठ अनिल ही गेला. नंदिनी आपल्याला बघणार नाही याची त्याने पूर्ण काळजी घेतली. थोडाच वेळात नंदिनी एका मुलासोबत बोलताना दिसली.
त्या मुलाला अनिलने यापूर्वी कधीच बघितले नव्हते. नंदिनी व तो मुलगा त्या ठिकाणी हातात हात घेवुन गप्पा रंगवत बसले. हे अनिलने आपल्या डोळ्याने चांगले बघितले. नंदिनी आपल्याला फसवत असल्याचे त्याला जाणवले. नंदिनीला एका मुलासोबत प्रेमाच्या गप्पा रंगवताना बघून अनिल च्या मस्कात चांगलीच आग पेटली. त्याने कसलाही विचार न करता नंदिनी समोर गेला. व तिचा धोकेबाज पणा उघड केला.
नंदिनीने त्याला आपल्या समोर बघून घाबरून गेली. त्याने नंदिनीच्या कानाखाली जोरात वाजवली व तिथून काढता पाय घेतला. नंदिनीच अनिलवर प्रेम नव्हतच याची जाणीव अनिलला झाली. नंदिनीने फक्त अनिल तिच्यावर खर्च करत असल्याचा फायदा घेतला. अनिलच्या पैशांवरमौज केली हे अनिल ला चांगलेच समजले होते.
अनिलच्या साध्या सरळ स्वभावाच नंदिनीने चांगलाच गैरफायदा करून घेतला होता. व एक प्रेयसी म्हणून चांगलाच धोका दिला होता. अनिललाही आपली प्रेयसी धोकेबाज असल्याच माहीत झाल.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा