जीवन एक कथा । मराठी कथा प्रेम आणि मैत्री सूरज नुकताच बारावी ची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. सूरज खुप अभ्यासू होता. आकरावी बारावी फक्त अभ्यास आणी अभ्यास यातच घालवल. कॉलेज च जीवन जगायच त्याच राहुनच गेल होत. सूरज आत्ता पर्यन्त मुलींपासून खुप दूर होता. आकरावी बारावी या वर्षात एक ही मैत्रीण बनवली नाही. मित्र ही मोजकेच होते, अगदी हाताच्या बोटांवर मोजन्या इतके. त्याला आता पदवी साठी प्रवेश घ्यायचा होता. त्याला आता अभ्यासा सोबत कॉलेजच आयुष्य ही जगायच होत. खुप मित्र-मैत्रिणी बनवायच्या होत्या. त्याने पदवी साठी मोठ्ठ कॉलेज निवडल. अभ्यासात हुशार असल्याने त्याला प्रवेश ही लगेच मीळाला. त्याच्यासोबत त्याचा जुना जिवलग मित्र ही होता. दोघांनी सोबतच एकाच कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. त्याच सोबत काही विषयांसाठी दोघांनी शिकवणी ही लावून घेतली. शिकवणी सकाळी असायची व दुपारी कॉलेज असायच. सूरज शिकवणी व कॉलेज दोन्ही नियमित करत असे. अभ्यासू वृत्ती असल्याने त्याची कॉलेज मध्ये चांगलीच छाप पडली होती. त्याने नविन मित्र बनवायला सुरुवात केली. अभ्यासात ह...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा