प्रेम भंग | Jivan Ek Katha | Marathi Katha
जीवन एक कथा | मराठी कथा
प्रेम भंग
"निशा" सर्वसाधारण कुटुंबातील होती. निशाच कुटुंब मोठ होत. निशाला आणखी पाच बहिणी व एक भाऊ होता. भाऊ सर्वात लहान होता. निशाच्या घरची परीस्थिती बेताचीच होती. एवढ मोठ कुटुंब संभाळन कुण्या एकाच काम नव्ह्त. घरातील सर्वच व्यक्ती मिळेल ते काम करून उदर निर्वाह करत असे. निशाचे आई वडील ही मोल मजूरी करून घर चालवत असे.
निशा सर्व बहिणी मध्ये चौथ्या नंबरची होती. तिच्या दोन बहिणीचे लग्न झाले होते. निशापेक्षा एक मोठी बहीण लग्नाची बाकी होती. तस तिला स्थळ बघणे चालूच होते. इकडे निशा ही वयाच्या विशीत आलेली तरुनी होती. हे वय जर नाजुकच असत. कधी कुणाचा पाय निसटेल हे सांगताच येत नाही. तसच निशाच ही झाल.
निशा एका मुलाच्या प्रेमात पडली. प्रेम करणे हा काही गुन्हा नाही. या वयात जे सर्वांच होत तेच निशाच झाल. निशाच त्या मुलावर निस्वार्थ प्रेम होत. तो मुलगा ही निशावर तेवढच प्रेम करायचा. दोघ एकमेकांमध्ये खुप खुश होती. निशाला तो आयुष्यभर जोड़ीदार म्हणून हवा होता. तो ही निशाला आयुष्यभर साथ देण्यास तयार होता.
एक दिवस निशाच्या आई वडिलांना निशाच प्रेम प्रकरण समजले. त्यांनी निशाच्या प्रेम प्रकरणाला विरोध दर्शवला. "समाजात नाव खराब होइल ईज्जत जाईल लोक नाव ठेवतील याची भीती त्यांना वाटत होती." शिवाय तिच्या ईतर बहिणीच लग्न बाकी होत. जर निशाच प्रेमप्रकरन समाजात माहीत झाले तर तिच्या ईतर बहिनिंसोबत कुणी लग्न करणार नाही, त्यांनी निशाला प्रत्येक प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
पण निशाला प्रेमापुढे काहीच दिसत नव्हते. "निशाने त्यांच काही एक ऐकल नाही" निशाला फक्त तीच प्रेम हव होत. निशाचे आई वडिल तिला विनवन्या करत होते. पण तिने काही एक ऐकल नाही. निशा प्रेमात बुडाली होती. तीच प्रेमच तिच्या अग्रस्थानी होते. काही दिवस उलटून गेले. निशाने तिच्या प्रियकराकड़े लग्नाची मागणी केली. तिच्या प्रियकरानेही लग्नासाठी होकार दर्शवला.
शेवटी निशाने आई-वडिलांना न जुमानता आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जावून आपल्या प्रियकरासोबत लग्न केले. निशा आई वडिलांना सोडून प्रियकरासोबत निघून गेली. निशाने समाजात आपली मान खाली घातली याचा राग तिच्या आई वडिलांच्या डोक्यात शिरला. तिच्या आई वडीलांनी निशा सोबतचे नाते संपुष्टात आनले. निशाला याची कल्पना होतीच त्यामुळ तीही आता आई-वडिलांच्या समोर येवू शकत नव्हती व त्यांच्याशी संपर्क ही करू शकत नव्हती. प्रेमापोटी तिने आई-वडिलांशी नातेच तोडले होते.
निशा तिच्या पतीसोबत सुखी संसार करण्यात रमली होती. दोघांनीही घरच्यांच्या विरोधात जावून लग्न केले होते. त्या दोघांनी दूर एका शहरात आपला संसार मांडला होता. त्या नविन शहरात त्यांच्या ओळखीच कुणीही नव्ह्त. त्यांना तिथे कुणाचा ही सहारा नव्हता.
निशाचा पतीला चांगले काम ही मिळाले होते. त्या दोघांचा संसार खुप सुखी चालला होता. निशाला तिच्या आई-वडिलांची जराही आठवण येत नसे. निशाच्या लग्नाला सात-आठ महीने उलटून गेले होते. तिच्या सुखी संसाराला तिच्या स्वप्नांना कुणाची तरी नजर लागली होती.
निशाचा नवरा तिच्याशी प्रमाणिक नव्हता. निशाच्या पतीचे आणखी एका मुलीसोबत प्रेम संबंध होते. याची चुनचुन निशाला लागली होती. निशा आता तिच्या पतिवर बारीक लक्ष ठेवून होती. एक दिवस निशाने तिच्या पतीला त्या मुलीसोबत बघीतले. तिने त्या मुलीची चौकशी केली. त्या दोघांचे प्रेमसंबंध खुप जुने होते. निशाच्याही पहिले ती मुलगी तिच्या पतीच्या प्रेमात होती. पण तिच्या पतीने तिला अजीबात समजू दिले नव्हते.
निशा खुप नैराश्यात गेली. तिच्या पतीने तिला फसवले होते. तिला आधार देण्यासाठी ही कुणीच नव्हते. आई-वडिल ही दुरावले होते. निशा व तिच्या पती मध्ये वाद सुरु झाला होता. काही केल्या तिचा पती त्या मुलीला दूर करण्यास तयार नव्हता. तो जानत होता की निशाला माझ्याशिवाय पर्याय नाही. तो तिच्या मजबुरीचा फायदा घेत होता.
एक दिवस दोघांचा वाद विकोपाला गेला. व शेवटी निशाने त्याच्यापासून वेगळ राहण्याचा निर्णय घेतला. तसा त्यालाही निशामध्ये पूर्वी सारखा रस राहिला नव्हता. त्यानेही निशापासून वेगळ रहान्यास होकार दर्शवला. शेवटी निशाच्या प्रेमाला व संसाराला पूर्णविराम मीळाला. व तिचा संसार अवघ्या आठ महिन्यातच संपुष्टात आला. निशा व तिच्या पतीने फारकत घेतली.
आता निशा एकटीच पडली होती. तिने आई-वडिलांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या आई-वडिलांनी निशाचा तिरस्कार केला होता. ते निशाच काहीही ऐकन्यास तयार नव्हते. निशासाठी माहेरचे रस्ते कायमचे बंद झाले होते. निशाने आपली समाजात मान खाली घातल्याचा राग त्यांच्या मनात होता. निशा एकटीच पडली होती.
निशाला खुप पश्चाताप झाला होता. निशाने आई-वडिलांच्या विरोधात जायला नको होत हेच तिला योग्य वाटत होते. निशाचा प्रेमावर विश्वास राहिला नव्हता. तिच्या पतीने फक्त तिचा वापर करून घेतला हाच तिचा समज झाला होता. निशाकड़े एकट रहान्याशीवाय पर्याय उरला नव्हता.
निशा तिच्या पतीपासुन विभक्त राहात होती. आई-वडिलांच्या दारातही तिला जागा उरली नव्हती. तिने एकट्याने आयुष्य जगण्याच ठरवल. तिने ही त्याच शहरात स्वताचा उदर निर्वाह भागवन्यासाठी दुसरीकडे काम शोधले. व ती एकटीच रूम करून राहू लागली. कामावरून रूमवर आल्यावर तिला एकटेपना सतावत होता. तिला कुणाची तरी सोबत हवी होती. एव्हाना तिची कामावरील इतर मुलिंसोबत चांगली ओळख झाली होती. तिने कामावरिल काही मुलींना सोबत केली व त्यांच्या सोबतच रूम मध्ये राहू लागली.
निशा तीच एकटीच आयुष्य चांगल्याप्रकारे जगत होती. ती जिथे राहात होती तेथील काही मुलिंसोबतही तिची चांगली मैत्री झाली होती. त्यातीलच तिची एक चांगली मैत्रीण झाली होती विशाखा. विशाखा ही तिच्या आई-वडिलांसोबत निशाच्या शेजारीच राहात असे. विशाखा आणि निशाची मैत्री खुप घट्ट झाली होती. विशाखा ही नेहमी निशाच्या सोबत असायची. निशाला आता कुणीतरी जवळची व्यक्ती भेटली होती. निशा आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी विशाखाला सांगत असे व स्वताच मन मोकळ करायची.
विशाखाच आजोळ हे तिथून ८०-९० किलोमीटर अंतरावर होत. विशाखाचे आजी-आजोबा काका-काकू सर्व गावाकडेच राहात असे. सुट्टी मध्ये किंवा काही कार्यक्रम असल्यावर विशाखा नेहमी गावाकडे येत असे. एक वेळेस असच काहीतरी कारणास्तव विशाखा गावी आली. गावाकडे आल्यानंतर काकांच्या मुलांसोबत गप्पा मारने खेळने हे नेहेमिचच होत.
विशाखाच्या एक काकाचा मुलगा होता निलेश. निलेश ही बावीस तेविस वर्षांचा होता. त्याच सर्व शिक्षण ग्रामीण भागातच झालेल होत. त्याला कुणी तरी प्रेयसी हवी होती. जशी सर्वांना प्रेयसी असती तशीच मला ही एक प्रेयसी असावी अशी त्याची इच्छा होती. गावाकडील मुलींना तो प्रेयसी बनवू शकत नव्हता. व त्याच आकर्षण ही शहरातील मुलिंकड़ेच होते. त्याला शहरातील मुलगी प्रेयसी म्हणून हवी होती.
विशाखा गावी आल्यामुळ निशा तिला सारख फोन करत असे. दिवसातन तिन-चार वेळेस तरी त्या दोघांच बोलन होत असे. ही गोष्ट निलेशला माहीत होती. निलेशला शहरातील मुलगी प्रेयसी म्हणून मीळवण्याचा मोह काही आवरला नाही. एक दिवस निलेशने विशाखाच्या मोबाइल मधून चोरून निशाचा नंबर मीळवला. निशाच्या पूर्व आयुष्याची त्याला जराही कल्पना नव्हती. त्याने निशाला आपली प्रेयसी बनवण्याच ठरवल.
विशाखा तिच्या घरी निघून गेली. त्यानंतर निलेशने काही दिवस जावू दिलेत. व एक दिवस त्याने निशाला फोन करण्याची हिम्मत केली. त्यादिवशी त्याने तिला पहिला फोन केला. व उडवा उडवीच संभाषण करू लागला. व तिच्या सोबत ओळख करण्याचे, मैत्री करण्याचे प्रयत्न करू लागला. दर आठ-दहा दिवसांनी तो निशाला फोन करत असे. निशा तिच्या आयुष्यात पूर्णपणे हारली होती. तिलाही चांगले मित्र हवे होते. त्यामुळ तीही निलेश सोबत मैत्री करण्यास इच्छुक झाली. पण तिला आता कुणाच्याही प्रेमात पडायचे नव्हते. मैत्री एवढेच नाते तिला टिकवायचे होते. तिला पुन्हा स्वताचा प्रेमभंग नको होता. पण तिकडे निलेशला ती प्रेयसी म्हणून हवी होती.
एव्हाना निशा व निलेश मध्ये चांगली मैत्री झाली होती. त्या दोघांच नेहमी फोनवर बोलण होत असे. तस त्यांनी अजुन एकमेकांना बघितलेच नव्हते. तरीही निलेश निशाला प्रेयसी बनवू पहात होता. निलेश ने एक वेळेस निशाकड़े भेटण्यासाठी अग्रह केला. निशाही त्याला भेटण्यासाठी तयार झाली. पण फक्त एक चांगला मित्र म्हणून. भेटण्याचा दिवस वेळ आणि जागा ठरली.
ठरल्यादिवशी निलेश निशाला भेटण्यासाठी निघाला. दोघेही ठरल्या जागेवर वेळेवर पोह्चलेत. कधीही एकमेकांना बघितलेल नव्ह्त त्यामुळ त्यांनी फोनवरच ओळखन्याच्या खुणा सांगितल्या. त्या दोघांची एक मित्र मैत्रीण म्हणून पहिली भेट झाली. दोघांमध्ये छान गप्पा ही झाल्या. पण निशाने आपल्या भुतकाळा बद्दल काहीच सांगीतले नाही. थोडा वेळ गप्पा मारून दोघेही आपआपल्या घरी निघून गेलेत.
निशा दिसायला सर्वसाधारण असल्याने निलेश ने माघार घेतली नाही. त्याला ती प्रेयसी म्हणून हवीच होती. काही दिवस फोन वर बोलण्यात उलटून गेले. न रहावुन एक दिवस निलेश ने निशाला प्रेमाची मागणी घातली. निशाला प्रेम या शब्दाचा खुप राग होता. तिने निलेशला स्पष्ट शब्दात नकार कळवला. निलेश थोडा नाराज झाला. पण त्याने तिला फोन करन चालूच ठेवले. पण निशा आता पूर्वीप्रमाणे निलेश सोबत बोलत नसे.
पण एकीकडे निशाची फारकत होवून वर्ष उलटून गेले होते. निशा अजुन तरुण होती. ती बावीस वर्षांची होती. लग्नाच्या आठ महिन्यातच नवरा सोडून गेला होता. निसर्गाच्या नियमा प्रमाणे आइन तारुण्यात तिची शारीरिक भूक भागली नव्हती. उलट ती वाढतच चालली होती. पण पुन्हा प्रेमभंग होइल या भीतीने ती स्वताचा जीव जाळत असे.
पण अस किती दिवस ती करणार. तिलाही भावना होत्याच की. दिवसेंदिवस तिची भूक वाढतच चालली होती. तिला शारीरिक भूक भागवन्यासाठी पुरुषाची गरज भासु लागली. न रहावुन तिने कुठल्यातरी पुरुषाला जवळ करून गरज पूर्ण करण्याचे ठरवले. तस निलेशनीही तिला प्रेमाची मागणी घातलीच होती. तिने शेवटी निलेशला होकार देण्याच ठरवल. पण फक्त आणि फक्त स्वताची गरज भागवन्यासाठीच. ति आजीबात प्रेमात पडन्यास इच्छुक नव्हती.
तिने ठरल्याप्रमाने निलेशला होकार दर्शवला. पण अजुन ही तिने निलेशला आपल पूर्व आयुष्यात काय घडले आहे ते सांगीतले नव्हते. पण तिकडे निलेश तीच आपल्यावर खर प्रेम असाव याच भावनेत होता. त्या दोघांच आता फोनवर बोलण्याच प्रमाण खुप वाढल होत. निशाचा फक्त एकच उद्देश होता. त्यामुळ ती नेहमी निलेशला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करत असे. निलेश ही यापूर्वी कधीच मुलींच्या संपर्कात नव्हता व तो ही तरुण असल्याने लवकर उत्तेजित होत असे.
निलेशच गाव हे दूर असल्याने त्याला निशा जवळ जाण्यासाठी लवकर जमत नसे. एक दिवस न राहवून निशानेच निलेशला भेटण्याची इच्छा दर्शिवली. खुप दिवस झाले निलेश ही तिला भेटलेला नव्हता त्यामुळ तोही भेटण्यास तयार झाला. पण यावेळी तिने निलेशला थेट ती जिथे रहात असे त्या रूम वरच बोलावले. तेहि तिच्या सर्व मैत्रिणी कामावर गेलेल्या असतील त्या वेळेत. इकडे निलेशच्या मनात तसला काहीच विचार नव्हता. तो साध्या मनाने फक्त तिला भेटण्यासाठी निघाला होता.
निलेश निशाच्या रूमवर पोहचला. निशाने त्याच्यासाठी उत्तम जेवन ही बनवून ठेवले होते. हळूहळू दोघांच्या गप्पा रंगु लागल्या. नेहमी प्रमाणे निशा त्याला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करू लागली. प्रथमच निलेश एका मुलीच्या एवढ्या जवळ पोहचला होता त्यामुळ तो ही अवघ्या काही क्षणातच उत्तेजित झाला. व निशाने तिच्या इच्छे प्रमाणे तिने तिची शारीरिक भूक पूर्ण करून घेतली. पण ती त्याच्या प्रेमात काही पडली नाही.
निलेश चांगलाच तिच्या प्रेमात बुडाला होता. निलेश आता तिच्या सोबत आयुष्य भराचे स्वप्न रंगवू लागला. निलेशला निशा बद्दल जास्त ओढ़ निर्माण झाली होती. पण निशाच सर्व त्या उलट होत. ती फक्त निलेशचा वापर करून घेत होती. शरीराची भूक भागवने एवढा एकच तिचा उद्देश्य होता. कारण यापूर्वी एका मुलानी तीच आयुष्य उद्ध्वस्त केल होत. त्यामुळ पुन्हा तीच चुक तिला करायची नव्हती. एकीकडे तीही कुठल्या तरी मुलाच आयुष्य उद्ध्वस्त करत होती याची थोडीही तिला पर्वा नव्हती. तिने फक्त त्याचा वापर करून घेण सुरु ठेवल होत.
निलेश हा खुप दूर राहात असल्याने दोन-तिन महीने त्याला परत येन जमत नसे. त्यामुळ निशाच पाहिजे तस मन भरत नव्ह्त. आणी जेव्हापासून निलेश सोबत संपर्क आला तेव्हा पासून तिची भूक आणखीनच वाढत गेली. तिची बेचैनी वाढत चालली होती. निलेशच ही सारख सारख तिच्याकड येन जमत नव्ह्त.
कालांतराने तिची कामावरील एका मुलासोबत ओळख झाली. व तिला हवा त्यासाठी तिने त्या मुलाला जवळ केल. तो मुलगा नेहमी तिच्याकडे येवू लागला. इकडे अधून मधून निलेशच ही तिच्याकडे येन चालूच होत. निलेशने एक दिवस निशा समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण निशा तिचा भूतकाळ विसरली नव्हती. त्यामुळ निशा लग्नासाठी तयार नव्हती. पण निलेश सारखा तिच्या मागे लग्नासाठी हट्ट करू लागला. न राहवून शेवटी निशाने तिचा भूतकाळ निलेशला सांगीतला.
निलेशला काहीच सुचत नव्हते. त्याने काही काळ विचार करण्यात घालवला. पण तो तिच्या प्रेमात एवढा बुडाला होता की त्याला निशा शिवाय जगन कठिन झाल होत. सर्व नित विचार करून त्याने परत निशाला लग्नासाठी तयारी दर्शिवली. निशाला तो विश्वास दाखवला. निशालाही कधीतरी कुणाशी लग्न करावेच लागणार होते. तीही एकट्याने आयुष्य किती दिवस काढणार होती. तिनेही निलेशला होकार दर्शवला. पण इकडे नुकतेच कामावरिल एक मुलासोबत तिचे सूत जूळले होते.
काही दिवसांनी शहरात चांगले काम मीळत आहे अस सांगुन तोही निशा साठी इकडे राहायला आला. त्यानेही तिथे एक रूम घेतली व काम शोधले. आता त्याच निशाकड़े नियमित येन जाने सुरु झाले होते. दुसरीकड कामावरिल मुलगा ही तिने अजुन सोडला नव्हता. ती दोघाना ही वेळ देत असे. तिचा आगोदरच प्रेमभंग झाला होता त्यामुळ तिला या सर्व गोष्टी एक खेळ वाटू लागला होता. पण दोन मुलांच्या आयुष्य ती खराब करत होती. त्यांच्या भावनांशी ती खेळत होती याच जरा ही तिला भान नव्ह्त. एवढ दिवस निशाने दोघाना ही योग्य प्रकारे वेळदिला होता.
दोघांनाही अजीबात ती अस काही तरी करत असेल याचा संशय नव्हता. पण सत्य जास्त दिवस लपून राहात नाही. एक दिवस ते उघड होतच.
आज निशाचा वाढदिवस होता. निलेशने तिचा वाढदिवस चांगला साजरा करण्याच ठरवल. तेच तिच्या कामावर सोबत असलेल्या मुलानेही ठरवल. निशा ही मैत्रिणी सोबत एकटीच राहते हे दोघांना ही माहित होत. इकडे निलेश ने वाढदिवसाची पूर्ण तयारी करून ठेवली होती. पण तिकडे कामावर असणारा मुलगा आज तिच्यासोबतच कामावरून निघाला. व तिच्यासोबत तिच्या रूमवर गेला.
इकडे निलेश निशाला सारख फोन लावत होता. निशा कधी फोन उचलायची व दोन शब्द बोलून लगेच ठेवून द्यायची तर कधी फोन उचलत नसे. रात्री खुप उशीर झाला. निशाच अस वागन बघून निलेशचा पारा चांगलाच चढला.
निलेश रागा रागात निशाच्या रूमवर जाण्यास निघाला. याची कल्पना निशाला नव्हती. थोडा वेळात निलेश तिच्यारूमवर पोहचला. त्याने दरवाजा ठोठावला. आता निशा पूर्ण घाबरून गेली. आता ती पकडले जाणार हे तिला समजुन गेले होते. तरी तिने शक्य तेवढा सावरन्याचा प्रयत्न केला. व त्या मुलाला पलंगाखाली लपवून दिले. निलेश रूम मध्ये शिरला.
तो थोडा रागातच होता. रूम मध्ये शिरल्यावर तो थेट पलंगावर जावून बसला. व निशाला फोन न उचलण्याच कारण विचारू लागला. तिने डोक दुखत असल्याचा आव आणला. पण पलंगा खाली काही तरी असल्याचा त्याला भास झाला. निलेशला पलंगाखाली तो मुलगा दिसला.
निशाने आपली चांगलीच फसवनुक केल्याची त्याला जाणीव झाली. त्याच क्षणी त्याचे व त्या मुलाचे चांगलेच वाद झाले. सोबत निशाचे ही पीतळ उघडे पडले. निशा सोबत आधीच फसवनुक झाली होती त्यामुळ तिला या गोष्टीच काही दुःख वाटल नाही. तस ही ती दोघांवर अजीबात प्रेम करत नव्हती. पण आता ते दोघेही तिच्यापासून दूर झाले होते. पण निलेश च हे पहिलच प्रेम होत निशाने त्याचा चांगलाच प्रेम भंग केला होता.
आता त्याचाही प्रेम या नाव वरुण विश्वास उडाला होता. निशानेही आता हा सर्व प्रकार थांबवायच ठरवल. व एखादा चांगला मुलगा बघून लग्न करायच ठरवल.
तिकडे निलेश अजुन या धक्क्यातून सावरला नव्हता. पण प्रेमात पडण्याची त्याची चांगलीच हाउस पूर्ण झाली होती. आता तोही कुणावर मनापासून प्रेम करण्याच्या तयारीत नव्हता. अशाप्रकारे एखाद्या साखळी प्रमाणे प्रेमभंग होत राहिले व प्रेमाचा विस्फोट घडत राहिला. व प्रेमावरुण विश्वास उडत गेला.
Jivan Ek Katha हा Marathi Katha blog आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना नक्की share करा
धन्यवाद



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा