आईची माया | Jivan Ek Katha | Marathi Katha
जीवन एक कथा । मराठी कथा
आईची माया
रामेश्वर शिकायला पुण्यात होता. गावाकडून तालुक्याच्या ठिकाणी व तिथून पुणे असा पूर्ण १२ तासांचा प्रवास असे.
त्या वर्षी त्याच्या भावाचे लग्न होते. घरातिलच लग्न असल्याने त्याला लग्ना पूर्वीच्या प्रत्येक कार्यक्रमाला यावे लागे. त्या पैकिच घरी एक कार्यक्रम होता तो गावी आला. रविवार सर्वांचा सुट्टीचा दिवस असल्याने कार्यक्रम ही रविवारी होता.
रविवारचा दिवस उजाडला पाहुने जमायला सुरुवात झाली छोटासा कार्यक्रम असल्याने मोजकेच जवळचे पाहुने आमंत्रित केले होते. सर्व पाहुने जमले कार्यक्रमाला सुरुवात झाली. पण रामेश्वरला कार्यक्रम संपल्यावर लगेच पुण्याला जायच होत. कारण दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी १० वाजता त्याला कॉलेज मधे हजार व्हायचे होते.
रामेश्वर पद्विच्या शेवटच्या सेमिस्टरला होता, आणि सोमवारी त्याच सबमिशन होते. जर सबमिशनला हजर राहिला नाही तर त्याच वर्ष वाया जाणार होते त्यामुळ त्याला पुण्याला पोह्चन तेवढच महत्त्वाच होत. म्हणून त्याने रविवारी पहाटे लवकर उठून सर्व तयारी करून ठेवली होती.
सकाळचे १०-११ वाजले असतील सर्व पाहुने जमले आणि कार्यक्रम सुरु झाला कार्यक्रमाची सर्व घाई सुरु झाली रामेश्वर सर्व गोष्टी व्यवस्थीत करू लागला. कार्यक्रम आटपत आला सर्वांचे जेवण सुरु होते.
रामेश्वर ला पुण्याला जायची घाई होती. त्या गडबडीत त्याने ही घाईघाई जेवण केले. त्याला तालुक्याला जाऊन पुण्याची बस पकडायची होती त्यासाठी तो खुप घाई करत होता.
सर्व पाहुण्यांचे जेवण आटोपले सोबत रामेश्वरचे ही जेवण आटोपले. आता सर्व कार्यक्रम संपला होता. दुपारचे २ वाजले होते रामेश्वर पुण्याला जाण्यासाठी घरून निघाला सर्व पाहुण्यांची भेट घेतली. त्याला बस स्टॉप ला जायचे होते. पायी जायला खुप वेळ लागला असता म्हणून त्याच्या भावाने त्याला बस स्टॉप वर सोडले व त्याचा भाऊ लगेच घरी गेला.
रामेश्वर तालुक्याला जाण्यासाठी बसची वाट बघत उभा राहिला, थोडाच वेळात बस आली आणि तो तालुक्यासाठी निघाला जवळपास अर्धा-पाऊन तासात तो तालुक्याच्या बस स्टॉपवर पोहचला. बस स्टॉपवर पोहचेपर्यन्त ४ वाजले होते.
तो तातडीने कण्ट्रोल रूम कडे गेला आणि पुन्यासठी बस किती वाजता आहे त्याची चौकशी केली. बस येण्यासाठी १५-२० मिनिटे वेळ होता. रामेश्वर दिवसभर गडबडित असल्याने थोडा बेचैन होता. आणि कधी एकदाची पुणे बस येती याची वाट बघू लागला.
तो तिथेच प्लाटफॉर्म वर उभा राहून बसची वाट बघू लागला. अर्धा तास झाला बस काही आली नाही. तो पुन्हा कण्ट्रोल रूम कड़े जाऊन विचारपूस करून आला. बसला उशीर झाला म्हणून रामेश्वर आणखी बेचैन झाला. तो प्लाटफॉर्म वर चक्कर मारू लागला.
पण एवढ्या वेळात एक ४५-५० वयोगटातील स्त्री त्याला न्याहाळत होती. दिवसभर थकलेला रामेश्वर बसची वाट बघत होता पण कोणी तरी त्याला न्याहाळतय याची त्याला कल्पना ही नव्हती. बसला आणखी उशीर होता. तो तिथेच प्लाटफॉर्म वर वाट बघत उभा होता. तितक्यात त्या स्त्री ला राहवल नाही आणि त्याच्या जवळ आली.
रामेश्वरला बोलली "मी खुप वेळची तुला बघत आहे सारखा चक्कर मारत आहेस" ,"कुठ जायच आहे तुला". ती स्त्री रामेश्वर साठी अनोळखी होती. रामेश्वर ने तिला सांगितले पुणे जायचे आहे. रामेश्वरने ही तिला विचारले तुम्हाला कुठ जायचे आहे. तिने सांगितले मी शिर्डी वरुन आले आता गावी जाण्यासाठी बसची वाट बघत आहे.
पण रामेश्वरला अजुन ही ती स्त्री कोण आहे हे समजत नव्हते. तेवढ्यात ती स्त्री रामेश्वरला बोलली की खुप वेळचा उभा आहेस बस येइपर्यंत बसून घे. रामेश्वर थोडा विचारत पडला की ही अनोळखी स्त्री का स्वताहून बोलू लागली, कारण आता त्याला पूर्ण खात्री झाली होती की आपण या महिलेला यापूर्वी कधीच भेटलो नाही किंवा कुठे बघितले ही नाही.
रामेश्वर थोडा सावध झाला. त्याच्या मनात अनेक प्रश्न उद्भावत होते ही महिला कोण? हीचा चोरीचा किवा लूटमार करण्याचा तर उद्देश्य नसेल ना, असे अनेक प्रश्न रामेश्वरला भेडसावत होती. का स्वताहुन एवढ बोलतीये.
न रहावुन रामेश्वरने विचारल तुम्ही मला ओळखता का यापूर्वी आपण कधी भेटलो होतो का? ती स्त्री बोलली "नाही" मी तुला ओळखत नाही व आपण यापूर्वी कधीच भेटलो नाही.
आणि त्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकून रामेश्वर थोडा अचंबीतच झाला. त्याला मनात पडलेल्या प्रश्नाला थोडा वेळासाठी पूर्ण विराम भेटला आणि तिने जे काही सांगितले ते ऐकून रामेश्वर थोडा भाउक झाला.
"ती स्त्री त्याला बोलली तू जसा बस स्टॉप मधे शिरला तशी माझी नजर तुझ्यावर गेली. तिने सांगितले "तू माझ्या मुलासरखाच दिसतो". खुप वेळची तुला बघतीये तुला बघून मला माझ्या मूलाची आठवण झाली तुझ्यावरून काही केल्या नजर सरकत नव्हती. तू उभेउभ माझ्या मुलासारखाच दिसतोय. मी माझी मोठी भाचि आहे तिला कॉल करून हे सर्व काही सांगितले तिनी सर्व ऐकून घेतल. "शेवटी मला रहावल नाही म्हणून मी तुला बोलायला आले".
आता रामेश्वर एक आईची तिच्या मुलासाठी माया बघून थोडा भाउक झाला. त्याला पडलेले सर्व प्रश्न तो विसरून गेला.
रामेश्वर आता थोडा स्थिर झाला आणि मोकळ्या मनाने बोलू लागला. रामेश्वरने त्या आईच बोलन ऐकून घेतल्यावर त्याला वाटले की या हिचा मुलगा तिच्यापासून कुठे तरी दूर राहत असावा खुप दिवसांपासून ही त्याला भेटली नसावी म्हणून हिला मुलाची खुप आठवण येत असावी. नंतर रामेश्वरने विचारल की तो ही कुठे शिक्षणासाठी बाहेर राहतो का? खुप दिवस झाले तो भेटायला आला नाही का?.
"त्यावर ती आई बोलली हो तो शिकायला बाहेर होता २ वर्षांपूर्वी तो सुट्टी मधे गावी आला आणि अचानक एक दिवस थोड बाहेर फिरून येतो अस बोलला आणि फिरायला गेला. पण त्याच्या मनात काय होत कुनास ठाउक "तो गेला आणि तिकडेच त्याने आत्महत्या केली. "त्या आईचे डोळे भरुन आले. रामेश्वर ही भाउक झाला.
त्याने परत त्या आईला विचारल आत्महत्या करन्यामागचे कारण समजले का.? ती म्हणाली नाही!. त्यानी का आत्महत्या केलि ते अजुन ही समजल नाही. तो गावी आला तर चांगला रहात होता तो असे काही करेल वाटले नव्हते.
पण तो आता आम्हाला सोडून निघून गेला. रामेश्वर थोडा वेळ स्तब्ध झाला. त्याला काहीच समजू नाही लागले. रामेश्वरला वाटले की या आईने आपला जवान मुलगा गमावलाय. ही आणखी त्यातन सावरली नसावी म्हणून हिला माझ्या सारख्या मुला मधे तिचा मुलगा दिसत असावा. रामेश्वर ने तीच दुःख बघून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.
तो आता त्या आईला छान प्रकारे बोलू लागला. तेवढ्यात त्या स्त्रीला ज्या गावी जायचे होती ती बस आली. रामेश्वर ने सांगितले तुमची बस लागली आहे. त्यावर ती आई म्हणाली राहुदे थांबते थोडा वेळ तुझी बस येइपर्यन्त तेवढच मला बरे वाटेल.
नंतर त्या आईने त्याला तिच्या पर्स मधे असलेला तिच्या मुलाचा फोटो ही दाखवला. आणि म्हणाली बघ तू त्याच्या सारखाच दिसतोय. रामेश्वर ने फोटो बघून घेतला त्याला ही थोडा फार त्याच्या सारखाच वाटला. त्या आईने त्यांच्या परिवाराची माहिती दिली. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे आमच गावी दुकान आहे.
त्याच्या वडीलांनी त्याच्या शिक्षनासाठी खुप मेहनत घेतली. मुलगा तर गेला, आता मुलगीच आमच्या साठी सर्व काही आहे. तिला ही खुप आठवण येती त्याची. मी घरी गेल्यावर नक्की सांगेल तिला की समीर सारखाच एक मुलगा होता त्याला भेटले मी. रामेश्वर ही बोलला हो नक्की सांगा.
त्यानंतर त्या स्त्रीने रामेश्वरला त्यांच्या घरचा पत्ता दिला व एक दिवस घरी येण्याचा आग्रह केला. परिस्थिति पाहून रामेश्वर तिला नाही म्हनू शकला नाही. तिने तिचा फोन नंबर ही दिला व रामेश्वर कडून त्याचा ही नंबर घेतला. आणि मी कधी आठवण आली की कॉल करत जाइल बोलली. रामेश्वर हो बोलला. पण रामेश्वरला अजुन ही काही निट उमजत नव्ह्त पण त्या आईची परिस्थिति पाहता तिला तो नाराज करु शकत नव्हता. त्यामळ त्याने ही सहज नंबर दिला.
तेवढ्यात पुणे बस लागली. आता रामेश्वरला निघायच होत. त्या आईला तो निघू का बोलला. आणि तिचे डोळे भरुन आले. पण तो ही आता थांबू शकत नव्हता. ती आई जड हृदयाने हो बोलली. आणि पोहोचल्यावर कॉल कर बोलली. जवळपास ५ वाजून गेले होते. रामेश्वर बोलला मला पोहोचायला रात्रीचे २-३ वाजतील. आणि उद्या माझ सबमिशन आहे. तर मी उद्या संध्याकाळी करेल कॉल अस बोलून तो बसकड़े जायला निघाला. ती स्त्री ही त्याच्यासोबत बसकड़े निघाली.
तो बस मधे बसला. बस निघेपर्यंत तिथेच थांबली. रामेश्वर ने तिच्याकडे बघितले तिचे डोळे भरुन आले होते. रामेश्वरने बस निघाल्यावर तिला हात दाखवला. आणि बस एकदाची पुणे कड़े निघाली.
त्या आईच दुःख त्यालाही बघवत नव्हत. त्याच्या डोक्यात आता फक्त त्या आईचा विचार येत होता. दुपारी जेवण केलेल त्यानंतर त्याला काहीच खाऊ वाटल नाही. दिवसभर थकलेला रामेश्वर बस मधे झोपी गेला.
रात्री ३ वाजता रामेश्वर पुन्यात पोहचला. तिथून रूमवर जाऊन झोपला. सकाळी लवकर उठून कॉलेजला जायचे होते.
सकाळी ७ वाजता उठला. तयारी करू लागला त्याच्या डोक्यात परत तेच विचार येऊ लागले. तसच आवरून कॉलेजला गेला सबमिशन पूर्ण करून रूमवर परतला. तो विचार करु लागला. काल भेटलेली स्त्री जे बोलली ते खर होत की आणखी काही फसवन्याचा प्रयत्न होता. ४ वाजले त्या स्त्रीचा कॉल आला. रामेश्वर ने कॉल उचलला. तिने विचारल किती वाजता पोहचला, व्यवस्थितत पोहोचला ना.? रामेश्वरने ही विचारले तुम्ही कधी पोह्चल्यात. थोडा वेळ बोलून फ़ोन ठेउन दिला.
रात्री रामेश्वरने घडलेला प्रकार रूम मधील मित्राला सांगितला. त्याच्या मित्राने सांगितले जपून रहा. तुझी फसवणूक ही होऊ शकते. रामेश्वर २ दिवस त्याच विचारात होता. त्याचे मित्र त्याला समजावत होते झाला प्रकार विसरून जा. पण एकीकडे रामेश्वरला त्या स्त्रीच बोलन खर वाटत होत.
तो विसरण्याचा प्रयत्न करत होता. तोच आणखी त्या स्त्रीचा कॉल आला आणि रामेश्वर तिच्यासोबत बोलला. ती त्याला घरी ये सांगत होती. त्याने मित्राला सांगितले आज परत कॉल आला होता. रामेश्वरचा मित्र त्याला म्हणाला.
जर तू गेला आणि तिकड़ त्यानी तुला काही कल तर ...? रामेश्वरला तेही कुठ तरी खर वाटू लागल. पण एकीकडे आईची माया. त्या आईची तिच्या मुलाबददल असणार प्रेम दिसत होत. रामेश्वरला अस वाटायच जर माझ्या मुळ एखाद्या आईला तिच्या मुलाच प्रेम मिळत असेल तर ते मी दिल पाहिजे. कुठ तरी त्या आईच दुःख कमी होइल.
एकीकडे फसवणूक होऊ शकते हे ही नकारता येत नव्ह्त . रामेश्वर दोन्ही बाजूनी विचार करू लागला. त्याला काय कराव काही कळत नव्हत.
त्याच्या मित्राकडून रामेश्वर द्विधा मनस्थितित असल्याच बघवत नव्हत. रामेश्वरला यातून कस बाहेर काढाव याचा विचार करू लागले. त्यात एका मित्राने घडला प्रकार रामेश्वरला परत विचारला. रामेश्वरने सर्व काही सांगितले.
त्यावर त्या मित्राने त्याला द्विधा मनस्थितितुन बाहेर निघन्याचा मार्ग सांगितला. त्याने सांगितले जर तुला फसवणूक होत आहे अस वाटत असेल तर तू त्या स्त्रीचे कॉल घेऊ नकोस. आणि जरी तुला तिच्यामध्ये आईच मुलाबददल प्रेम दिसत असेल तरीही कॉल घेऊ नको. यावर रामेश्वरने विचारले का?.
त्यावर मित्र बोलला जर ती मुलाची आठवण म्हणून तुला कॉल करत असेल तर ती प्रत्येक वेळेस तिच्या मुलाची आठवण येत असेल आणि त्या प्रत्येक वेळेस ती रडत असेल.
तुला जर ती सारख कॉल करून बोलत असेल तर ती या दुखातुन कधीच बाहेर पडू शकत नाही. तिने आता स्वताला सावरले पाहिजे. जर तू तिचे कॉल घेतला नाही तर ती काही दिवसानी तुला कॉल करायच बंद करेल. आणि त्यानंतर तिला मुलाची आठवण जास्त येनार नाही. आणि तिला या दुखातुन सावरन्यास सोप्प जाईल.
जर तू कॉल उचलत राहिलास तर एकप्रकारे तू तिच्या भावना आणखी दुखवशील. रामेश्वरच्या मित्रानी जो सुवर्णमध्य सांगितला तो रामेश्वरला योग्य वाटला आणि त्यानी त्या दिवसापासून त्या स्त्री चे कॉल घेतले नाही आणि तो झाल ते सर्व विसरून चिंता मुक्त झाला. आणि काही दिवसानी त्या स्त्रीचा कॉल येन बंद झाले. आणि अपेक्षा आहे की ती आई ही आता तिच्या दुखातुन सावरली असावी.








टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा