लग्नासाठी प्रेमाचं नाटक | Jivan Ek Katha | Marathi Katha
जीवन एक कथा
लग्नासाठी प्रेमाचं नाटक
हल्ली कुठलाही छोटा मोठा सण असो व्हाट्सअप फेसबुक वर शुभेच्छा देण्याची परम्पराच आहे. असाच एक सण होता सर्वसामान्यान प्रमाणे राजेशला ही नातेवाईकाच्या मित्र परिवाराच्या शुभेच्छा येत होत्या. राजेश ही सर्वाना शुभेच्छा देत होता.
दुपारची वेळ होती व्हाट्सअप वर अचानक एका नंबर वरुन शुभेच्छा आल्या. तो नंबर राजेशच्या ओळखीचा नव्हता. राजेशला तो कुणाचा नंबर आहे ते जानुन घ्यायचे होते. त्याने त्या नंबर वर असलेला फोटो बघीतला. त्यावर एका मुलीचा फोटो होता. त्यावरून त्याला समजले की हा एक मुलीचा नंबर असावा. पण त्या मुलीला राजेश ओळखु शकला नाही.
मुलीचा नंबर असण्याची शक्यता आणि त्यात तो तिला ओळखत ही नव्हता त्यामुळे राजेशने तिला कुठल्याच प्रकारचा संदेश पाठवला नाही. तो डोक्यावर खुप जोर देऊन सारखा विचार करत होता कोण असेल ही मुलगी. त्यासोबत त्याला अनेक प्रश्न पडू लागले. कोण ही मुलगी? ही मला ओळखत असेल का? हिला माझा नंबर कुठून मिळाला? असे अनेक प्रश्नांनी राजेशच्या डोक्यात घर केले होते.
जोपर्यंत ओळख लागत नाही तोपर्यंत तिला कुठलाच मेसेज करायचा नाही अस त्यानी ठरवल होत. संध्याकाळी राजेश आणि त्याच्या एका जवळच्या मित्राची भेट झाली. त्याने हे त्याच्या मित्राला सांगीतल. त्याच्या मित्रानीही हाच सल्ला दिला ओळख लागत नसेल तर बोलू नकोस.
दोन दिवस झाले राजेशला ओळख लागली नव्हती. आणि त्यानेही कुठलाच मेसेज केला नाही. त्यादिवशी सकाळी परत गुड मॉर्निंग चा मेसेज आला. राजेशने मेसेज बघितला. त्याला आता त्या नंबरवरील फोटो बदल झाल्याच दिसले.
त्याने परत नविन फोटो कुठला हे बघीतले. आता त्यात त्या मुलीसोबत एका चाळीशीतिल महिलेचा ही फोटो होता. ती त्या मुलीची आईच होती. राजेश त्या महिलेला ओळखत होता. एका कार्यक्रमात राजेशची त्या महिलेसोबत भेट झाली होती. ती महिला आणि राजेश हे नातेवाईक होते. आणि एक वेळेस राजेश त्या महिलेच्या घरी ही गेला होता. त्या वेळेस ती मुलगी ही घरीच होती.
पण राजेश हा एक पहुणा म्हणून गेला होता त्यामुळे त्याने पहुन्यासारखा चाहा नाश्ता करून निघून गेला त्याने त्या मुलीला बघितले नव्हते.
आता राजेशला ओळख पटली होती. राजेशने तिला गुड मॉर्निंग केले. राजेशला त्या मुलीचे नाव माहित नव्हते. त्याने तिच्या आडनाव वरुनच विचारले. " तू शेळकेंची मुलगी का?" त्यावर तिने उत्तर दिले "हो, मी शेळकेंचीच मुलगी" . त्यावर तिने विचारले का ओळखले नाही का? राजेश बोलला नाही, तुला कधी बघितले नव्हते त्यामुळ ओळख नाही लागली.
आज तुझ्या आईसोबत फोटो बघितला तेव्हा लक्षात आल. त्यावर तिने उत्तर दिले ठीक आहे. आणि तिचे नाव सांगितले "माझ नाव पूजा" आता लक्षात ठेवा विसरु नका अस बोलली. नात्यातील मुलगा असल्याने आदर पूर्वक बोलत होती.
पण राजेशच्या एका प्रश्नाच उत्तर आणखी मिळाले नव्हते. राजेशने पूजाला विचारले माझा नंबर कुठून मिळाला. त्यावर पूजा बोलली "तुमचा नंबर पप्पांच्या मोबाइल मधे होता , तो मोबाइल आता मी वापरत आहे. " "तुमचा नंबर पहिले पासून त्यात होता नातेवाईक असल्याने मी डिलेट नाही केला " आणि त्यादिवशी सर्वांना शुभेच्छा देत असताना तुम्हालाही पाठवल्या गेल्यात.
राजेशने सर्व ऐकून घेतले आणि ठीक आहे बोलला. पूजा ने परत विचारले, का? तुम्हाला राग आला का. राग आला असेल तर त्याबद्दल मी माफी मागते." राजेश बोलला अग माफी नको मागुस . मला प्रश्न पडला म्हणून विचारले.
याप्रकारे आता राजेश आणि पूजाचे बोलने सुरु झाले. पण या सर्वामागे वेगळाच हेतु होता याची जरा ही कल्पना राजेशला आली नाही.
आता त्या दोघांचे नेहमी एकमेकांना मेसेज पाठवने सुरु झाले. नातेवाईकच असल्याने आता राजेश निश्चिंत होउन बोलू लागला. हळूहळू दोघांच बोलन सुरु झाले. एकमेकांसोबत बोलण्याच प्रमाण ही वाढत गेले. एकाच वयातील असल्याने एकमेकांसोबत लवकरच मैत्री झाली. आता ते दोघ सकाळी संध्याकाळी सारख बोलू लागले. फोनवर ही गप्पा मारने सुरु झाले. दोघातील मैत्री ही घट्ट झाली. पूजा मनमोकळं होउन गप्पा मारत असे. काही दिवस उलटून गेलेत.
एक दिवस पूजा खुप खोलवर जाऊन बोलत होती जणू तिला वेगळच काही तरी सांगायचे होते. राजेशला तसा संशय ही येत होता हिला काही तरी बोलायच आहे. पण मुलगी असल्याने ती ही सरळ बोलू शकत नव्हते. पण तिच्या मनात काय आहे हे राजेश पर्यंत पोहचवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत होती.
तस आणखी एकमेकांची एकदाही भेट झालेली नव्हती. हे सर्व फोनवर सुरु होते. राजेश पूजाच्या मनातल जानुन घेण्याचा प्रयत्न करत होता. पण काही केल्या पूजा स्पष्ट बोलत नव्हती. तिला राजेशच्या तोंडून बोलून घ्यायचे होते. तिच्या बोलन्यावारून राजेश तिच्या मनातल समजुन गेला होता.
पण नातेवाईकातिल मुलगी असल्यामुळ तो ही बोलत नव्हता. शेवटी पूजा बोलली "तुम्हाला सर्व समजत आहे पण तुम्ही नासमज असल्यासारखे करत आहात" तरी राजेश बोलला की नाही मला अजीबात नाही समजत तुला काय बोलायचे आहे ते?.
पूजा काही केल्या ऐकायला तयार नव्हती. जणू आज राजेशच्या तोंडून बोलुनच घ्यायचे हे ठरवले होते. शेवटी राजेश बोलला. "तु प्रेमात पडलीस का?" त्यावर पूजा एकदम नाजुक आवाजात बोलली हो. राजेशने मुद्दाम विचारले कुणाच्या? त्यावर पूजा बोलली नालायक तुमच्याच ना. एवढ पण समजत नाही का तुम्हाला. राजेश बोलला समजत तर होत पण आपण नातेवाईक आहोत. तर कस जमल आपल्या मधे. पूजा बोलली "आपल नात जमन्यासारखच आहे".
राजेशला एवढ्या खोलवरच नात माहित नव्ह्त. पण पूजा पूर्ण आभ्यास करुनच आली होती. पूजा बोलली आहो मी तुमच्या मामाची मुलगीच लागते आणि तुम्ही आत्त्याचे. तर आपल्या मधे काहीच अड़चन नाहीये. तरी राजेश ला नात समजत नव्हते. त्याने पूजाला विचारले ते कस.? पूजाने पूर्ण नात्याचा उलगडा करून सांगीतला.
पूजा खुप दूरच्या नात्याने राजेशच्या मामाची मुलगीच लागत होती. आता राजेश वेगळ्याच संभ्रमात पडला. प्रेमाचा स्वीकार करावा की नाही. थोडा वेळ त्याने पूजाला बोलण्यात अडकवून ठेवले. राजेशने खुप विचार केला. तस त्यांच एकमेकांच खुप जमायच. राजेशने होकार देण्याच ठरवले.
आणी त्याने तस पूजाला सांगितले ठीक आहे. आतापर्यन्त कधीही एकमेकाना न भेटलेल्या पूजा आणी राजेशचा प्रवास प्रेमाच्या मार्गावर येउन पोहचला.
पण हे सर्व पूर्व नियोजित होते याची थोडीही कल्पना राजेशला झाली नाही. राजेश निस्वार्थ पूजावर प्रेम करू लागला. राजेश आणि पूजा दोघ एकाच शहरात रहात होते. पण राजेश शिक्षनासाठी मुंबई मध्ये राहत होता. त्यामुळ एवढे दिवस फक्त फोन वरच बोलत असे.
एक दिवस सहज म्हणून राजेशने पूजाला विचारले . "आपण दोघ बोलतो हे तुझ्या घरी माहित आहे का?" त्यावर पूजा बोलली हो. "आपण दोघ बोलतो हे आईला माहितीये" , राजेश थोडा घाबरला. आणि त्याने विचारल कशाला सांगीतल. पूजा बोलली घाबरू नका .
आपण बोलायला लागलो त्याच्या दूसऱ्या दिवसापासून आईला माहित आहे. तस आई माझा मोबाइल नेहमी बघत असते. राजेशला आणखी प्रश्न पडला . "आपल एकमेकांवर प्रेम आहे तेही सांगीतल का?" पुजा बोलली "नाही, अजुन तर सांगीतल नाहीये. पण तुम्ही म्हणत असाल तर सांगते" .
तू घाबरत नाही का.? राजेश ने विचारले. त्यावर पूजा बोलली घाबरायच काय त्यात कधीतरी सांगावच लागेल ना.! त्यावर राजेश लागलीच बोलला नको-नको आता काहीच नको सांगू. अजुन आपण एकमेकांना भेटलो पण नाहीये. पूजा हसत बोलली नाही सांगत. तरीही राजेशला थोड़ी भीतीच वाटत होती.
जवळपास दोन महीने फोन वरच बोलण्यात गेलेत. राजेश घरी जाणार होता. तशी कल्पना त्याने आधीच पूजाला दिली होती. राजेश आणि पूजा एकाच शहरातील असल्याने तो घरी गेल्यावर पूजाला ही भेटणारच होता. राजेशने घरी येतोय अस सांगितल्यावर पूजाने लगेच दूसऱ्याच दिवशी भेटण्याचा हट्टच धरला. राजेशलाही भेटण्याची ओढ़ लागल्याने त्याने ही होकार दर्शवला.
राजेश घरी पोहचला पूजाला फोन करून कळवल. ठरल्याप्रमाणे दूसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता भेटायच ठरल. दूसरा दिवस उगवला, पहिलीच भेट असल्याने राजेश चांगलाच तयार होउन गेला. पूजाही चांगली नटून आली होती. दोघे एक कॉफी शॉप वर भेटले. दोघात चांगल्या गप्पा रंगल्या.
पण पूजा राजेश सोबत जवळीक करण्याचा प्रयत्न करत होती. पहिलीच भेट असल्याने राजेश स्वताला सावरत होता. तरीही शेवटी पूजाला राहवल नाही आणि तिने राजेशला मीठी मारली. राजेशने तिची ओढ़ बघून त्यानेही तिला घट्ट पकडल.
आता खुप वेळ झाला होता. दोघांनाही घरी जायच होत. पण पूजाच मन काही भरल नव्ह्त. तिने राजेशला एक अग्रह केला. तुम्ही जोपर्यंत इथे आहात तोपर्यंत रोज भेटायच. कारण राजेश परत गेल्यावर तो दोन तिन महीने येणार नव्हता. राजेशने तिला वचन दिल. आहे तोपर्यंत रोज भेटेल.
राजेश हा पाच दिवसांसाठी आलेला होता. ते दोघ रोज एकमेकांना भेटत होती. त्या पाच दिवसात त्या दोघांमध्ये खुप जवळीक वाढली होती. त्या ५ दिवसांमध्ये पूजाने एक वेळेस राजेश चे चुम्बन ही घेतले होते. ज्यामुळे दोघांच प्रेम आणखीनच घट्ट झाले. पण इतक्यात त्यांच्या मध्ये लग्नाचा विषय निघाला नव्हता.
राजेश परत मुंबईला निघाला. आता त्या दोघांच फक्त फोनवर बोलन सुरु झाले. जे ५ दिवस सोबत घालवलेत ते खुप अविस्मरणीय होते. त्या दोघांमध्ये मध्ये झालेली जवळीक ही विशेष ठरली. पण हे सर्व अचानक नव्हते झालेले. पूजा हे सर्व ठरवूनच आलेली होती.
आता त्या दोघांमध्ये खोलवर बोलन होत असे. एकमेकांच्या मनातील भीतीही दूर झाली होती. एक दिवस असच दोघांच बोलन सुरु होत. दोघांना भेटून खुप दिवस उलटून गेले होते. परत कधी भेटायच यावरून चर्चा सुरु होती. राजेश बोलला लवकरच भेटू. तो एका लग्नासाठी येणार होता.
त्यावेळी भेटायचे ठरले. एव्हाना दोघेही एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी तयार होते. ठरल्याप्रमाणे पूजाची वाटचाल योग्य दिशेने चालली होती. राजेश हा पूर्ण पूजच्या प्रेमात बुडाला होता. जणू त्याने तिचा पत्नी म्हणून स्वीकारच केला होता.
ते दोघे इतक्या पुढे निघून गेले होते की, पुढच्या वेळेस जेव्हा भेट होइल त्यावेळी शारीरिक जवळीक साधायची ही ठरल. पण पूजा शारीरिक जवळीक साधण्यासाठी कधी हो बोलायची तर कधी नाही बोलायची. दोघांचा भेटण्याचा दिवस जवळ आला दोन दिवसानंतर ते दोघे भेटणार होते.
पण पूजा ने यावेळी राजेशच्या घरीच भेटण्याचा हट्ट केला. तिला राजेशचे घर बघायचे होते. राजेश त्यासाठी ही राजी झाला. राजेशच्या घरचे जेव्हा लग्नासाठी जाणार होते. त्यावेळेस तो पूजाला घरी घेउन येणार होता.
उद्या ते दोघ घरी भेटणार होते. पण शारीरिक जवळीक साधायची नाही अस ठरल. राजेश तिला घेउन घरी आला. पूजा खुप खुश होती. तिने राजेशच पूर्ण घर बघितले. पूजाने तिच्या हाताने नाश्ता बनवला. हळूहळू दोघांच्या गप्पा रंगु लागल्या. पूजाने अचानक राजेशला विचारले शारीरिक जवळीक साधायची का? राजेश बोलला तू तर नाही बोलली होती मग अचानक कस काय वाटल. पूजा बोलली तुम्हाला बघून मूड झाला.
राजेश ने थोडा विचार केला! राजेशने पूजाला विचारल खरचं मनापासून तयार आहेस का?. राजेश पूजाला बोलला आपल लग्न कदाचित होऊ शकत किवा नाही पण होऊ शकत. नंतर त्रास नको. निट विचार करून बोल!. त्यावर पूजा बोलली हो ते माहितीये. भविष्यात काहीही होऊ शकते.
तुम्ही नाही लग्न केले तरी चालेल. तुमची पत्नी म्हणून जरी नाही रहता आले तरी आयुष्यभर तुमची प्रेयसी म्हणून राहिल. तुम्ही न घाबरता शारीरिक जवळीक साधू शकता. मी लग्नाचा हट्ट करणार नाही. तस पूजाने वचन दिले आणि शपथ ही घेतली. या अटीवर राजेश शारीरिक जवळीक ठेवण्यास तयार झाला. त्यादिवशी दोघांमध्ये शारीरिक जवळीक झाली. पूजा खुप खुश होती.
संध्याकाळी घरी गेल्यावर पूजाच्या डोळ्यासमोरून राजेशचा चेहरा काही जात नव्हता. जणू पूजाला एक प्रकारची नशाच चढली होती. तिने राजेशला सांगितले आपण उद्याही शारीरिक जवळीक ठेऊ. दूसऱ्या दिवशीही त्यांच्या मध्ये संबंध घडला. पूजा राजेशच्या प्रेमात जणू सर्व भान विसरून गेली होती. पूजा घरी गेली. आता राजेशही परतणार होता.
राजेश बस ने मुम्बई कड़े निघाला. अर्धा प्रवास झाला असेल. तोच पूजाचा फोन आला. "पण यावेळी फोनवर पूजा नसून तिची आई बोलत होती". राजेश घाबरला. तो बोलू लागला. तोच पूजाची आई राजेशला बोलली "तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेउन आमच्या घरी या" राजेशने विचारले कशासाठी?.
पूजाची आई बोलली "तुमची आणि पूजाच्या लग्नाची बोलनी करायला!". राजेशला काही उमजत नव्हते. राजेश बोलला पण आजुन लग्नासाठी तयार नाहीये. पूजाची आई बोलली "ते मला माहित नाही तुम्ही घरी येउन जा. यावरून राजेश आणि पूजाच्या आईमध्ये वाद झाला.
संध्याकाळी परत पूजाचा फोन आला. राजेशने पूजाला विचारल, काय झाले? तुझी आई अचानक अस का बोलली? तिला कस काय माहित झाले? असे खुप प्रश्न राजेशला पडले. त्यावर पूजाने जे सांगीतले ते ऐकुन राजेशला धक्काच बसला.
पूजाने पूर्ण उलगडा केला! पूजाने सांगीतल की आपण बोलतो त्या पहिल्या दिवसापासून आईला सर्व माहित आहे. रोज आपण काय बोलायचो हे ही तिला माहित आहे. आपण किती वेळेस भेटलो कुठे भेटलो हे सर्व तिला माहित आहे. मी जेव्हा तुम्हाला भेटायला आले त्या वेळेस आईची परवानगी घेउनच आले होते. दोन वेळेस तुमच्या घरी आले होते ते ही आईच्या परावानगीणेच.
राजेशला चांगलाच धक्का बसला. राजेशने विचारले "मग तू हे आधी का नाही सांगितले?" हे सर्व माझ्यापासून का लपवले? यावर पूजाने उत्तर दिले तुम्ही घाबरला असता, भेटायला आले नसते त्यामुळ नाही सांगीतल!. राजेशला पूजाचा भयंकर राग आलेला.
त्याला कुठ तरी जानवत होत की पूजाने एवढ सगळ का लपवल. राजेशला काही उमजत नव्हते. राजेश ने पूजाला विचारले आपले प्रेमसंबंध पण माहित आहे का?. पूजाने सांगीतल हो सगळ माहित आहे. राजेशने आणखी विचारले "आणि आपल्यात शारीरिक जवळीक झाली ते.?" त्यावर ही पूजा हो म्हणाली!.
राजेश खुप चिडला. तो बोलला एवढ सगळ का सांगत बसली. पूजाने बोलली , मी काहीच नाही सांगितले. माझी आई रोज चार वेळेस माझा मोबाइल चेक करायची. आपण जे काही बोलायचो ते सर्व ती बघायची. मला तिची पूर्ण परवानगी होती. आणि आपला शारीरिक जवळीक करण्यासाठी मी नाहीच बोलली होती. पण ते ही आईने वाचल होत. तीच बोलली जा. तिनेच परवानगी दिली. त्यामुळे मी न घबरता तयार झाले.
राजेशला हे सर्व ऐकून चांगलाच घाम फुटला. राजेश विचारात पडला, की कोणती आई मुलीला अस करण्यासाठी परवानगी देईल?. यामागचा हेतु काय हे त्याला जानायचे होते!. राजेश आता सावधगिरी बाळगत होता. तो पूजाकडून सर्व माहिती घेऊ लागला. आणि आता पूजा राजेश सोबत प्रमाणिकपणे बोलू लागली. राजेश जे काही विचारायचा ते सर्व सांगत होती.
राजेशला पूजाच्या आईचा काय हेतु होता ते समजले. पूजाच राजेश सोबत लग्न लावणे केवळ याच उद्देशाने तिच्या आईने पूजाला राजेश सोबत बोलायला लावले. पूजाच राजेश वर प्रेम होने हे सर्व नियोजित होत. मैत्री पासून ते प्रेमसंबंध आणि शारीरिक जवळीक हे सर्व नियोजित होत जेणेकरून राजेशला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नासाठी तयार करणे.?
राजेशला कळून चुकले होते की त्याला जबरदस्ती फसवले गेले आहे. राजेशच्या मनातून पूजा पूर्ण पणे उतरून गेली होती. पण आता कुठ पूजाला राजेशवर खर प्रेम झाले होते. पूजाला राजेश हवा होता. पण एवढी फसवणूक झाल्यावर राजेशचा पूजावर विश्वास राहिला नव्हता. त्यांच्या मध्ये रोज भाण्डण होत असे.
राजेशने पूजाला विचारले, जर लग्नच करायचे होते तर तुम्ही तस सरळ सांगू ही शकत होते. माझ्या घरी ही येऊ शकत होते. मग एवढा चुकीचा मार्ग का निवडला!. त्यात त्याला समजले की पूजाचे वडिल समाजात जास्त जात येत नव्हते व तिच्या आईचा स्वभाव ही भांडखोर असल्याने कुणी लवकर पूजाशी लग्नाला तयार होत नसे. पूजाच ही लग्नाच वय निघून जाऊ नये म्हणून हा प्रयत्न केला.
पण आता एवढी फसवणूक झाल्यावर. एवढा खोटारडा पणा बघून राजेशनेही पूजाला लग्नासाठी स्पष्ट नकार दिला. आणि तस तिच्या आईला कळवायला सांगितले. आणि शारीरिक जवळीक करण्याच्या दिवशी पूजाने दिलेले वचन याचीही त्याने आठवण करूण दिली.
त्यावर पूजाने विचारले ? पण तुम्ही असा निर्णय का घेताय मला तुम्ही हवे आहात. राजेश काहीही एक ऐकन्याच्या परिस्थितीत नव्हता. राजेश तिला बोलला तुम्ही जर मला आता एवढ फसवू शकतात लग्नानंतर तुम्ही तर खुप त्रास देतील.
पूजाला राजेशच प्रेम हव होत. तिला तिची व तिच्या आईची चुक समजली होती. तिने राजेशला सांगितले! तुम्ही लग्न नाही केले तरी चालेल पण मला तुमची सोबत हवी आहे. मला तुमच निस्वार्थ प्रेम हव आहे. मला फक्त तेवढच द्या. राजेश ने पहिले तिच्या आईला लग्न होणार नाही हे सांगायला सांगितले.
तस पूजाने तिच्या आईला समजावून सांगितले. खुप प्रयत्न केले आईला समजवन्यासठी. शेवटी तिच्या आईने सांगितले तुला जस वाटेल तस बघ. पूजाने राजेशला तशी कल्पना दिली. तिने राजेशला सांगितले की मी समजवले आईला, आता तुम्ही निश्चिन्त राहा. राजेश बोलला ठीक आहे.
आणि आता आपण दोघेही बोलन बंद करू, या सर्व गोष्टीला पूर्णविराम देऊ. पूजा यासाठी तयार नव्हती. तिने सांगीतल मला तुमचा सहवास हवा आहे. पण आता आपण एकमेकांना बोलतो हे मी माझ्या आईला समजू देणार नाही. तिला तस सांगुन देइल की आम्ही बोलत नाही. आणि मी ही लग्नासाठी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही.
राजेशला पूजाच्या प्रेमावर विश्वास होता. पण परत धोका होइल हे ही तो नाकारू शकत नव्हता. पूजा काही केल्या त्याला सोडायला तयार नव्हती.
पूजाने कस तरी राजेशला तयार केले. आता ते दोघ चोरून एकमेकाना बोलायचे, भेटायचे. पण राजेश पूजाला हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांच्यात वाद ही होत असत. पण पूजाला कधीच त्याच्या कुठल्याच गोष्टीचा राग येत नव्हता. पूजा राजेशची प्रत्येक गोष्ट सहन करत होती.
एक दिवस राजेश आणि पूजा मध्ये जोराचे भांडण झाले. राजेशला माहित होते काही केल्या पूजाला आपला राग येणार नाही. त्याने भांडण झाल्यावर आपला मोबाइल चार दिवस बंद करुन ठेवला. त्या चार दिवसात पूजाने जेवण केले नाही. तिला दवाखान्यात सलाईन लावण्यात आली होती.
राजेशचा मोबाइल बंद असल्याने त्याला काहीच माहित नव्हते. पाचव्या दिवशी त्याने मोबाइल चालू केला. त्याच दिवशी पूजाच्या आईने परत राजेशला फोन केला. व झालेली परिस्थिति सांगितली. त्या दिवशीही राजेश आणि पूजाच्या आईचा वाद झाला. शेवटी पूजाच्या आईने राजेशला सांगितले.
नका करू लग्न! पण तिच्याशी बोलत जा. तुमचा फोन बंद होता तर ती जेवन ही करत नव्हती. यावरून राजेशला पूजाच्या प्रेमाचा अंदाज आला व त्याने पूजाला वचन दिले की आता बोलन बंद नाही करणार.
पूजा आणि राजेश नेहमी सारख एकमेकाना बोलायला लागले एकमेकाना भेटत असे त्यांच्या मध्ये शारीरिक जवळीक ही होत असे. काही दिवसानी राजेशच दूसऱ्या मुलीसोबत लग्न जमले. पूजाला दुसरीकडून माहित झाले. तिने राजेशला विचारले. राजेशने प्रमाणिक पणे सांगितले "हो जमले आहे. "पूजाने त्याचे अभिनंदन केले.
पण मला विसरायच नाही आणि माझ्यावर असच प्रेम कायम करत रहा अस सांगितले. तस पूजा खुप दुखी झाली कारण राजेशच्या लग्नानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण होणार होता. तिने राजेशकडे शारीरिक जवळीक ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. राजेशने नकार दिला पण ती समजुन घेण्यास तयार नव्हती. राजेश तिला नाराज करू शकला नाही.
काही दिवसात राजेशचे लग्न झाले. पण पूजाच प्रेम काही कमी झाले नाही. ते दोघ अधून मधून बोलत असे. राजेशला वाटले काही दिवसात पूजाच लग्न होइल आणि ती ही हे सर्व विसरून जाइल.
"पूजाच ही लग्न झाले. पण तिला तिच्या नवऱ्यामध्ये राजेशच दिसत होता."
आज दोघेही लग्न करून त्यांच्या संसारात सुखी आहेत. पण पूजा आणि राजेश च प्रेम अतूट आहे. आजही पूजाच राजेशवर तेवढच प्रेम आहे. आजही ते दोघे एकमेकाना फोनवर चोरून का असेना पण बोलतात.
पूजा आणि राजेशच प्रेम हे त्यांच्यासाठी अविस्मरनीय आहे.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा