प्रेम त्याग | Jivan Ek Katha | Marathi Katha
जीवन एक कथा । मराठी कथा
प्रेम त्याग
चेतन व त्याचा परीवार गावाकडे खुप हलाखीचे जीवन जगत होते. चेतन चे आई वडील गावाकडे मिळेल ते काम करून आपल्या परीवार उदार निर्वाह करत होते. चेतन अवघ्या सात-आठ वर्षांचा होता. तोही या वयात आई-वडिलांना हाथ भार लावण्यासाठी अधून मधून मिळेल ते काम करत असे. त्यामुळ शाळेतही नियमीत जाता येत नसे. ज्यादिवशी काम भेटले त्या दिवशी शाळेला सुट्टी मारावी लागत.
सहाजीक याचा परीणाम अभ्यासावर होत असे.खुप कष्ट मेहनत करून कसे बसे दिवस काढत होते. गावाकडे तस रोज सर्वांनाच काम मिळेल याची काहीच शास्वती नसायची. ग्रामीण भागात शेती व्यतीरीक्त इतर कामे फार कमी असतात. त्यामुळ कधी कधी तर घरातील सर्वच जन काम नसल्याने घरीच रहावे लागे.
तर कधी कधी मोठे काम मिळाल्यावर घरातील सर्वच कामाला जात असे. याचा परीणाम मुलांच्या शिक्षणावर दिसू लागला. चेतन व त्याचे बहीण भाऊ अभ्यासात मागे पडू लागली. शाळेतील अनियमितता त्यामुळ शाळेतुन ही नेहमी त्यांची ओरड यायची, पण मुलांना ही काम केल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.
उन्हाळी दिवसात शेतात फारसे काम लागत नसे तेव्हा तर दोन टाइम जेवणाची सोय करणं ही अवघड जात असे. चेतनचे आई वडील कसाबसा आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. घर चालवन्यात मुलांची ही त्यांना फार मोठी मदत होती. कवळ्या वयातच मूलं काम करत होती. हे चेतनच्या आई-वडीलांना बघवत नव्ह्त. मुलांच शिक्षणात होणार नुकसानही त्यांना बघवत नव्ह्त कारण जर मूलही शिक्षणात मागे पडली तर त्यांना ही आयुष्यभर हेच दिवस बघावे लागतील.
त्यांना ही आयुष्यभर काबाड कष्ट करुन दिवस काढावे लागतील. जे दिवस आपण बघतोय ते आपल्या मुलांनी परत बघू नये ही मोठी चिंता त्यांना वाटत होती. त्यांना यातून मार्ग शोधायचा होता. त्यासाठी ते तसा प्रयत्न ही करत होते. पण पाहिजे तस उत्पन्न त्यांना मीळत नव्हते.
ग्रामीण भागात असल्यामुळ तस उत्पन्न मीळवन्याचा मार्ग ही त्यांना मीळत नव्हता. दूसऱ्याच्या शेतात मोल मजूरी करन्याशिवाय इतर पर्याय त्यांच्याकडे नव्हता. ते नेहमी चिंतेत असत. गावातील लोकांकडून व नातेवाईकांकडून ही ते सल्ला घेत असे, कोणी चांगला सल्ला देत असे तर कुणी त्यांची हसी उडवत असे. पण या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा ते प्रामाणिक पणे प्रयत्न करत असे.
चेतन व त्याच्या आई-वडिलांच नेहमी प्रमाणे दूसऱ्याच्या शेतात जावून मजूरी करणे सुरूच होते. एक दिवस चेतनचे आई-वडील एका कार्यक्रमाला गेले. तिथे त्यांना त्यांचा एक जवळचा नातेवाइक भेटला. त्याला चेतन व त्याच्या आई वडिलांची परीस्थिती माहित होती. त्या नातेवाईकाने त्यांना एक सल्ला दिला.
"गावाकडे दूसऱ्याच्या शेतात जावून मजूरी करण्यापेक्षा, एखद्या मोठ्या शहरात जा तिथे तुम्हाला नियमित काम ही मिळेल व त्यातून उत्पन्न ही चांगल्याप्रकारे मीळेल शिवाय मुलांच शिक्षण ही चांगल्या प्रकारे करता येइल.!" त्यांना हा सल्ला योग्य वाटला.
पण नेमक जायच कुठल्या शहरात हा प्रश्न त्यांना पडला होता ?. त्याच नातेवाईकाने त्यांना सांगीतले की, "आम्ही ही शहरात राहतो तिकडे चला. सुरुवातीला आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू".
यावर काही दिवस चेतनच्या आई-वडिलांनी खुप विचार केला. शेवटी एक दिवस त्यांनी शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तशी त्यांच्या नातेवाईकाला कळवले. त्यांच्या नातेवाईकने ही त्यांना सुरुवातीला लागेल ती मदत करण्याची तयारी दर्शीवली होती. त्यांच्या नातेवाईकाने त्यांच्या जवळपास एक रूम शोधायला सुरुवात केली.
चेतनच्या आई-वडिलांना परवडेल अशीच रूम ते शोधत होते. काही दिवसात योग्य अशी रूम मिळाली. लागलीच त्यांनी चेतनच्या आई-वडिलांना कळवले. चेतनच्या आई-वडिलांनी आता शहरात जाण्याची तयारी केली. त्यांना आता कायमचे तिकडच रहायचे होते त्यामुळ त्यांनी आपला सर्व पसरा सोबत घेतला.
शेवटी तो दिवस उजाडला आता चेतन व त्याचे आई-वडील व इतर भाऊ बहीण नविन शहरात रह्वयास निघाले, तिथे पोहचताच त्यांच्या नातेवाईकाला गाठले. त्यानेही जी रूम बघितली होती तिथ त्यांना पोहच केल. त्यांना घरातील पसारा लावण्यात मदत ही केली. व तेथील परिसरातील माहिती ही दिली.
आता महत्त्वाचा प्रश्न हा होता की चेतनच्या आई-वडिलांना काम शोधण्याचा. व चेतन व त्याच्या भावंडांना शाळेत प्रवेश घेन्याच त्यांच्या नातेवाईकाने चेतनच्या वडीलांसाठी त्यांच्याच ओळखीच्या ठिकाणी काम ही शोधून दिले.
सुरुवातीला मिळेल ते काम त्यांनी सुरु करण्याच ठरवल. चेतनचे वडील आता नियमित कामावर जात असे. त्या कामाच्या उत्पन्नातून त्यांच दोन वेळेस जेवणाची व्यवस्था झाली होती. चेतन व त्याच्या भावंडांनाही चांगल्या शाळेत दाखल केले. पण त्यांचा शिक्षणाचा पाया खुपच कच्चा होता. तरी त्यांच्या आई-वडिलांनी मुलांना चांगल शिकवण्याच ठरवल.
चेतनने आता सहावीला प्रवेश घेतला होता. आता तो नियमित शाळेत जात होता. आता कुठल्याही प्रकारच्या कामाला जात नव्हता. त्यांच घर सद्ध्या फक्त वडिलांच्या उत्पन्नावर चालत होते. पण त्यातून फक्त दोन वेळेस जेवणाची सोय झाली होती. घरातील इतर खरच निघत नव्हता. त्यामुळ आता चेतनच्या आईनेही काम शोधण्यास सुरुवात केली.
त्याच्या आईनेही एक-दोन घरांची धुनी-भांडी करण्याचे काम सुरु केले. पण गावाकडे दूसऱ्याच्या शेतात जावून मजूरी करण्यापेक्षा शहरातील काम त्यांना योग्य वाटत होते. गावाकडे दिवसभर राबराब राबुन ही जेवढा पैसा मीळत नव्हता त्यापेक्षा जास्त पैसा ते ही कमीत कमी मेहनत करून मिळत होता. शिवाय मुलांच शिक्षणही सुरळीत चालू होते.
चेतनचे आई-वडील आता पूर्वीपेक्षा खुप समाधानी होते. पूर्वी सारखे कष्टही करावे लागत नसे. आता त्यांना शहरात येवून दोन-तिन वर्ष झाली होती. सर्व काही सुखी-समाधानी चालू होत. कुठलीही चिंता त्यांना नव्हती. आता हळूहळू त्यांना प्रगती करायची होती. शहरात येवून त्यांच्या गरजाही वाढल्या होत्या.
त्यांना स्वतःच घर ही घ्यायच होत. पण एका मोठ्या शहरात ते फक्त आई-वडीलांच्या उत्पन्नावर शक्य नव्ह्त. एव्हाना चेतनही खुप समजदार झाला होता. आता त्याला सर्व परिस्थिती समजत होती. त्यानेही आता थोडा फार आई-वडीलांना हाथ भार लावायचे ठरवले.
चेतन व त्याच्या मोठ्या भावाने शाळेत नियमित जावून बाकीच्या वेळेत काम करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून घरातिल इतर गरजा भागवन्यात आई-वडीलांना मदत होईल. आता चेतन शाळा करून उरलेल्या वेळेत एका दुकानात काम करू लागला. आता त्यांच्या घरात चांगल्याप्रकारे पैसा येत होता. त्यातील काही पैसा आता मागेही पडत होता.
त्यांच्या इतर गरजाही पूर्ण होत होत्या. पण चेतन अभ्यासात कच्चाच होता. पण लहानपणापासून कष्ट करण्याची काम करण्याची सवय त्याला होती त्यामुळ तो कामात व्यवस्थीत लक्ष देत होता. चेतनने कशीतरी दहावी पूर्ण केली.
अभ्यासात कच्चा असल्याने शिक्षणात जास्त लक्ष त्याने दिले नाही. आकरावी-बारावी तो नियमित महाविद्यालयात जात नसे. आता पूर्ण वेळ कामावर जात असे. व कधी तरी कॉलेज ला जाने व परीक्षेच्या वेळी कॉलेज ला जात असे. चेतन आता चांगल्या प्रकारे पैसा कमवू लागला होता. त्याच्या आई-वडीलांच्या डोक्यावरचा भार कमी झाला होता.
त्यांचे एक एक स्वप्न ही पूर्ण होत होते. आता त्यांना फारसे कष्ट करावे लागत नव्हते. गावाकडून शहरात आल्याचे त्यांनी सार्थक केले होते.
पण सर्व घर सुखात नांदत असताना एकीकडे चेतनचे वडील नशेच्या अहारी गेले होते. पूर्वीपेक्षा मुबलक प्रमाणात पैसा घरात येत असल्याने त्यांच नशा करन्याचे प्रमाण ही वाढले होते. आयुष्यभर काबाड कष्ट केले. कुठल्याही गोष्टीची हाउस मौज केली नाही. त्यामुळ त्यांना सुरुवातीला नशा करण्यापासून कुणी आडवले ही नव्हते.
चेतन व त्याचे भावंड कमवत असल्याने आता त्याचे वडीलही कामावर जास्त लक्ष देत नव्हते. कधी कामावर जात तर कधी मित्र मंडळी सोबत दिवसभर नशा करत असत. हळूहळू त्यांच नशा करण्याच प्रमाण वाढतच चालले होते. कालांतराने चेतनच्या वडीलांनी कामावर जाने बंद केले. चेतनच्या वडीलांनी आयुष्यभर फक्त कामच केले असल्यानी उतार वयात आता त्यांनी आराम करावा ही घरातील सर्वांचीच इच्छा होती.
पण चेतनच्या वडीलांनी त्याचा खुपच गैरफायदा उचलला. घरी राहून नशा करण्याच प्रमाण त्यांनी वाढवल होत. रोज सकाळी उठल की नशा करण्यास सुरुवात करत असे. आता पूर्ण दिवस त्यांचा फक्त नशा करण्यातच जात होता. एकीकडे त्यांची प्रगती होत असताना त्यांच्या सुखी कुटुंबाला जनु कुणाची तरी नजरच लागली होती.
आता घरातील सर्वजन चिंतित झाले होते. कारण चेतनच्या वडीलांना जडलेल व्यसन दिवसेंदिवस वाढतच होते. चेतन ही आता खुप मोठा झाला होता. तो विस-एकविस वर्षांचा झाला होता. त्याने व त्याच्या भावंडांने घरची पूर्ण जबाबदारी उचलली होती. पण वडीलांना जडलेल व्यसन हीच त्यांच्यासाठी खुप मोठी चिंतेची बाब होती. त्यांनी वडीलांना खुप समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते आता काहीच ऐकण्याचा मन:स्थितीत नव्हते.
ते नशेच्या एवढ आहारी गेले होते की त्यांना नशा करण्याशिवाय दुसर काहीच सुचत नसे. दिवसभर फक्त नशा करणे हाच त्यांचा दिनक्रम झाला होता. कालांतराने घरातील सर्व त्यांना समजावून समजावून वैतागले होते. आता सर्वांनीच त्यांना समजवने सोडले होते.
जो तो ज्याच्या त्याचा कामात व्यस्त झाला होता. चेतनही त्याच काम प्रमाणिक पणे करत होता. चेतनच्या वडीलांच व्यसन सोडल तर बाकि सर्व गोष्टी सुरळीत चालू होत्या. चेतन ही त्याचा कामात खुप खुश होता.
पण एकीकडे चेतनच्या आयुष्यात वेगळाच बदल घडत होता चेतन ऐन तारुण्यात होता. नकळत तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता. "रुपाली" तीच नाव. रुपाली ही एका ठिकाणी कामाला होती. काही कारणास्तव चेतनच तिथे नेहमी येण-जाण होत.
रुपाली ही विस-एकविस वर्षातील तरुनी होती. दिसायला अतिशय सुंदर होती. त्यामुळच चेतनच तिच्यावर प्रेम जडल होत. पण एकीकडे चेतनच लहानपणीच त्याच्या आई-वडीलांनी नातेवाईकातील एका मुलीसोबत त्याच लग्न जमवून ठेवले होते. चेतनला ही गोष्ट ज्ञात होती. व चेतनला ती गोष्ट मान्य ही होती. पण रुपालीच्या सुंदरते पुढ तो हारला होता.
त्याच नातेवाईकातील एका मुलीसोबत लग्न जमलेले आहे याच भान तो विसरला होता. हळूहळू रुपाली वर त्याच प्रेम वाढतच चालल होत. कालांतराने रुपाली ही चेतनच्या प्रेमात पडली होती. आता दोघांच नियमित एकमेकांना भेट्न बोलण सुरु झाल.
तर एकीकडे चेतनच्या वडीलांच नशा केल्यामुळ आजारी पडले होते. त्यांना आता दवाखाना सुरु झाला होता. चेतन घरी वडीलांचा दवाखाना ही करत होता व इकडे रुपाली वर प्रेम ही करत होता. चेतनच्या वडीलांना महीन्यातन दोन-तिन वेळा तरी दवाखान्यात घेवुन जावा लागत.
रुपाली व चेतनचे प्रेम संबंध एवढे वाढले होते की चेतन च्या आई-वडीलांना याची कुजबुज लागली होती. या बद्दल त्यांनी चेतनकड़े विचारना केली तर त्याने आपले रुपाली वर असणारे प्रेम मान्य केले. व तो रुपाली सोबतच लग्न करणार असल्याचा सांगत होता. पण ही गोष्ट त्याच्या आई-वडीलाना मान्य नव्हती.
त्यांनी चेतनला आठवण करून दिली की "तुझ लग्न आधीच नातेवाईकातील एका मुलीसोबत जमवलेल आहे" व तशी तुला आम्ही कल्पना ही दिली होती. आणि तू ही तर लग्नासाठी होकार दिलाच होता ना?. पण चेतनच्या डोक्यावर प्रेमाच भुत एवढ चढल होत की तो काही एक ऐकायला तयार नव्हता.
आधीच आजारी असलेल्या चेतनच्या वडीलांच्या चिंतेत भर पडली होती. कारण जर नातेवाईकाच्या मुलीसोबत लग्न नाही केल तर त्यांच्यासोबत वाद होतील व जून असलेल नात ही सम्पूष्टात येइल. शिवाय समाजात बदनामी होइल ते वेगळच. घरातील सर्वांनी चेतनला समजवन्याचा खुप प्रयत्न केला. पण तो कुनाचच ऐकन्याच्या मन:स्थितीत नव्हता.
तर एकीकडे त्याच्या वडीलांची तब्येत खुपच खालावली होती. त्यांना आता दर दोन-चार दिवसांनी दवाखाना करावा लागत. दवाखान्यातील डॉक्टरांनी ही स्पष्ट सांगीतले होते की ते आता जास्त दिवस राहणार नाहीत. अती नशा केल्यामुळ त्यांच शरीर आतून पूर्ण खराब झाले होते. तस चेतनच लग्नाच वय ही झालेल होत.
एक दिवस चेतनच्या वडीलांनी चेतनच लग्न नातेवाईकातील मुलीसोबत करण्याचा निर्णय घेतला. चेतनला न माहित त्यांनी मुलीच्या आई-वडीलांना याची कल्पना दिली. काही दिवसांनी चेतनचा साखरपुडा ठरवण्यात आला. साखरपुडा काही दिवसांवर येवून ठेपला. आता याबद्दल त्याच्या वडीलांनी त्याला त्याच्या साखरपुडा असल्याची कल्पना दिली.
वडीलांची सद्यः परिस्थिति पाहून तो वडीलांनी घेतलेला निर्णय डावलू शकला नाही. पण रुपालीवर असलेल त्याच प्रेम काही कमी झाल नव्ह्त. त्याने साखरपुडा करण्यास तयारी दर्शीवली पण त्याला लग्न फक्त रुपाली सोबतच करायच होत. काही दिवसांनी चेतनचा साखरपुडा नातेवाईकातील मुलीसोबत झाला. आता घरात सर्व आनंदी झाले होते.
रुपलीच भुत चेतनच्या डोक्यातून उतरल असाच सर्वांचा गैरसमज झाला होता. साखरपुडा होवून दोन-तिन महीने उलटले. चेतनच्या वडीलांची तब्येत आता खुप खालावली होती. कुठलाही उपचार त्यांच्यावर असर करत नव्हता.
अखेर चेतनच्या वडीलांची प्राणज्योत मालावली. चेतनच्या डोक्यावरून वडीलांच छत्र हरपल होत. चेतनच लग्न होण्यापूर्वीच त्याचे वडील त्याला सोडून गेले. काही दिवस उलटले चेतन घरातील इतर जन आता दुखातुन सावरत होते. इकडे आता पुन्हा चेतनच्या लग्नाचा विषय निघत होता. पण आता चेतन फक्त रुपाली सोबतच लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होता.
तो कुणालाही ही जुमानत नसे. पण त्याचा मित्र परिवार व नातेवाईकानी खुप समजूत काढली. सर्व जन त्याला एकच सांगत "तुझ्या वडीलांची इच्छा तरी पूर्ण कर." ही बाब चेतन कुठे तरी पटत होती. सर्वांनी खुप समजवल्यानंतर चेतनला जाग आली.
व फक्त वडीलांची एक शेवटची इच्छा म्हणून वडीलांच्या हाताने साखरपुडा झाला आहे त्याच मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय त्याने घेतला. तस आता त्याने रुपालीला ही तस स्पष्ट सांगीतले. रुपाली ही त्याची अडचन समजुन गेली. व तिनेही चेतनकड़े कसलाच अग्रह केला नाही.
चेतनने आपल्या "प्रेमाचा त्याग" करून आई-वडीलांनी ठरवलेल्या व वडीलांची शेवटची इच्छा पूर्ण करायची म्हणून नातेवाईकाच्या मुलीसोबत लग्न करायचा निर्णय घेतला. काही दिवसांनी लग्नाची तारीख ठरली. ठरल्या तारखेला चेतनचा व त्याच्या नातेवाईकातील मुलीचा विवाह झाला. आता चेतन रुपालीला विसरून त्याच्या पत्नी सोबत सुखी संसार करत आहे.
"आई-वडीलांचा नातेवाईकांना दिलेला शब्द व वडीलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी चेतनने आपल्या "प्रेमाचा त्याग" केला."...!!!




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा