"ती" निराधार | Jivan Ek Katha | Marathi Katha

जीवन एक कथा । मराठी कथा

"ती" निराधार

 

   "उमा" जवळपास सन १९५० च्या पुर्वीचा तिचा जन्म असावा. त्याकाळी कुणाचीही फार श्रीमंती नसे. त्या काळातील रुढी परंपरा ही खुप वेगळ्या असत. त्यांचे विचार ही खुप मागासलेले असत. त्याकाळी अपत्य असण्याची कुठलीही मर्यादा नव्हती. कुणाला पाच अपत्य असत तर कुणाला दहाच्या वर ही अपत्य असत. तसच उमा ही एका अतिशय गरीब घरात जन्माला आली. 

    आई-वडील पावसाळी दिवसात चार महीने शेती करत व उरलेले इतर दिवस मिळेल ते काम करुण आपला उदर निर्वाह करत असत. उमाच्या घरी उमा ला इतर सहा ते सात भावंड होती. त्यातील काही मूल तर काही मुली होत्या. कुणी शाळेत जात असत तर कुणी जात नसे. उमा ही शाळेत कधीच जात नसे. आई-वडील मिळेल ते काम करून सर्वांची पोट भरत असत. 

    अतिशय गरीबी असल्याने त्यांना वस्त्र ही व्यवस्थीत मीळत नसे. एकच पोशाख फार काळ टिकवावा लागत. थोडा कुठे फाटला तर सुई दोरा घेवुन तो शिवायचा व परत वापरायचा असे दिवस ते काढायचे. परिवार मोठा असल्याने घरातील सर्वच रोजगार मिळवन्यासाठी कामावर जात अवघे सात आठ वर्षांची मूल ही कामाला जात असे. 

    उमा ही तिच्या आईसोबत शेतात मजूरी करण्यास जात असे. अवघ्या दहा-बरा वर्षांच्या मुलींची लग्न करण्याची प्रथा होती. तस हे वय खेळन्याच असत पण समाज व समाजाच्या रुढी परंपरेसमोर कुनाच काहीच चालत नसे. उमा पेक्षा मोठ्या असणाऱ्या बहिण भावांची लग्न ही अवघ्या दहा ते पंधरा वर्षांची असताना झाली होती. उमा ही आता दहा वर्षांची झाली होती. रुढी-परंपरेनुसार तीही लग्नाच्या वयात आली होती. 

    मुलींना त्यांच्या लग्नाबद्दल सहमती घेतली जात नसत. मुलगी योग्य वयात आली की योग्य वर बघून तीच लग्न लावण्यात येत असे. उमा साठीही योग्य वर शोधणे सुरु केले. मुलांच वय ही पंधरा-सोळा असत. मुलांनाही त्यांच्या लग्नाबद्दल विचारले जात नसत. घरातील वरिष्ठ पुरुष मंडळी परस्पर विवाह जमवत असत. उमाच्या बाबतीत ही असच झाले. 

    उमाच्या वडीलांनी परस्पर उमाच लग्न एका मुलासोबत ठरवल. मुलाच्या वडीलांनीही मुलाला कुठलीच कल्पना न देता त्याचा विवाह ठरवला. लग्नाची तारीख ठरवण्यात आली. उमाच्या लग्नाची कल्पना घरात तिच्या आईला देण्यात आली. उमा अजुन अज्ञान होती. या वयात लग्न व संसार हे तिच्या समजन्या पलीकडे होते. उमाच्या लग्नाची तारीख जवळ आली होती. 

    अजुन ही उमाला तीच लग्न आहे हे उमगत नव्हते. अजूनही उमाने तिच्या होणाऱ्या पतीला बघितले नव्हते. व मुलाने ही आपली होणारी पत्नी बघितली नव्हती.  लग्नाचा दिवस जवळ आला. काही मोजकेच जवळील पाहुने मंडळी जमा झाली. उमाला हळद लागली. लग्नाचा दिवस उजाडला. उमाला तिच्या आईने व्यवस्थीत साडी नेसवुन बाशिंग बांधून लग्नासाठी तयारी केली. 

    काहीच वेळात नवरदेव कडील पाहुने ही दारात आली. नवरदेव ही वाजत-गाजत नवरीच्या दारी आला. लग्नाची सर्व तयारी आटोपली होती. सर्व-साधारणपणे उमाचा विवाह आटोपला. उमाच्या आई-वडीलांनी तिची सासरी पाठवणी केली. उमा आता विवाहित झाली होती. सासरी सासु सासरे व तिच्या पतीचे इतर भावंडे असत. उमा लहान असल्याने ती आणखी घरकामात जास्त हुशार नव्हती. 

    तिची सासु घरातील सर्व कामे करून घेत व सोबत उमाला घरातील कामे ही शिकवत असत. उमा व तिचा पती दोघेही नासमज होती. त्यांना नविन संसार वैवाहिक जीवन याबद्दल पाहिजे तेवढे ज्ञान नव्हते. उमाचा पतीही त्याच्या वडीलांसोबत शेती काम करत असत. तोही शाळेत जात नव्हता. उमाच्या सासु -सासरे यांची परिस्थिती ही हलाखीचीच होती. 

    शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता. उमाही तिच्या पती सासु सोबत शेतात कामास जाऊ लागली. तिला जमेल तेवढे काम ती व्यवस्थित करत असे. तिची सासु ही तिला प्रत्येक गोष्टीत संभाळून घेत असे. जे काम तिला जमत नसे ते तिला शिकवण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असे. कालांतराने उमा घरातील इतर कामे व्यवस्थित शिकली होती. 

    तिला आता स्वयंपाक ही चांगल्याप्रकारे जमत होता. तिला घरातील इतर जिम्मेदारी ही माहित झाली होती. तिचा पतीही शेती उत्तम रित्या करत होता. हळूहळू दोघांच ही वय वाढत होते. वयाप्रमाणे त्यांची समज ही वाढत होती. एकमेकांच्या जिम्मेदारीची जाणीव ही हळूहळू होत होती. उमा एक स्त्री म्हणून घरातील तिच्या सर्व जबाबदारी पार पाडत होती.

     सर्व गोष्टी सुरळीत चालू होत्या. पण आता उमाचा पती विस-एकविस वर्षांचा झाला होता. तो आता सुजान झाला होता. उमा ही त्याची पत्नी आहे व तिच्यासोबत पूर्ण आयुष्य तिला काढायचे आहे हे तो जानत होता. पण त्याला उमा ही पत्नी म्हणून नको होती. त्याला उमा आवडत नव्हती. लहानपणी त्याच्या मर्जीशिवाय त्याचा विवाह करण्यात आला हा आरोप तो त्याच्या आई-वडीलांवर करत असे. 



    त्याला उमा ही नकोशी होती. त्याला सर्वानी खुप समजवण्याचा प्रयत्न केला पण काही केल्या ऐकट नव्हता. उमा मधील काही गुण-दोषांमुळे त्याला उमा आवडत नव्हती. पण पती हेच एक स्त्रीच आयुष्य हे उमा ही जानायला लागली होती. तिचा पत्नी धर्म ही ती जानत होती. ती तीच पत्नी असन्याच कर्तव्य निभवत होती. सहन करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

    काही दिवस उलटून गेली. उमाचा पती चे आणि उमाचे आता वाद सुरु झाले, उमाच्या पतीला ती नकोच असल्याने तो कुठल्यान कुठल्या कारणाने तिच्याशी नेहमी वाद घालत असत. कधी कधी तर तो तिला मारहाण ही करत असे. पण पुरुष प्रधान संस्कृती असल्याने तिलाही सर्व सहन कराव लागत. व ती तिचा पत्नी धर्म निभवत असे. 

    कधी कधी ती रागात दोन-तिन महीने माहेरी ही निघून जात असत. पण समाज नाव ठेवेल व आई-वडीलांची इज्जत सन्मान कायम रहावा म्हणून ती परत सासरी आपल्या पतीकड़े नांदायला जात असे. पण ती सासरी परतल्यावर परत तिच्या पतीचा रागाचा पारा चढत व पुन्हा त्यांच्या मध्ये वाद निर्माण होत असे. आता तिचा पती कुठलाही विचार न करता एखाद्या जनावरा प्रमाणे तिला मारहाण करत असे. 

    उमाला या गोष्टी असह्य होत असे. पण आई-वडीलांचा विचार करत सर्व सहन करत असे. एक दोन वर्ष असेच सुरु राहिले. उमाचा पती काही केल्या तिला स्विकारायला तयार नव्हता. त्याला ती नकोच होती. उमाची ही सहनशक्ती आता संपली होती. तिनेही आता टोकाचा निर्णय घेतला होता. रोजची मारहाण रोजचे वाद या सर्वांना ती कंटाळली होती. 



    तिनेही आता शेवटचा निर्णय घेतला होता. तिनेही पती सोबत रहायचे नाही असे ठरवले. व एक दिवस तीही तिच्या पतीला सोडून कायमची माहेरी निघून गेली. माहेरी तिने तिच्या आई-वडीलांना घडला प्रकार सांगीतला व ती आता परत त्या घरी जाणार नाही हा निर्णय सांगीतला. तस ती अवघी अठरा वर्षांचीच होती. एवढ्या कमी वयात मुलीचा संसार तुटला याच तिच्या आई-वडीलांना खुप दुःख झाले.

     पण मुलीला तिथे अजीबात सुख नाही त्यामुळ त्यांनी ही तिच्या निर्णयाला सहमती दर्शविली. आता उमा माहेरीच राहू लागली. तिच्या आईसोबत शेतात मजूरी करण्यास जात असे. समाजातील इतर लोकांनाही आता माहित झाले होते की उमा चा पती तिला खुप त्रास देत असे व या सर्व गोष्टीला कंटाळून ती कायमची माहेरी राह्वयास आली. 

    उमाच्या इतर भावंडांचे ही एक एक करून लग्न होत होती. तिच्या काही नातेवाईकांनी उमाच पुनर्विवाह करण्याचा सल्ला तिच्या वडीलांना दिला. पण तिचे वडील मुलीचा दूसरा विवाह करण्याचा विरोधात होते. ते कुठल्याही परिस्थितीत मुलीचा पुनर्विवाह करणार नव्हते. तीच मरण आता एक तर माहेरी किंवा तिच्या पहिल्या पतीच्या घरीच होइल.

     व इथून पुढे उमाचा संभाळ करण्याची तयारी दर्शिवली. कमी वयातच मुलीचा संसार तुटल्याची त्यांना खंत होती. पण दूसरा पती हे त्यांना मान्य नव्हते. उमा आता माहेरीच राहू लागली. आई-वडीलांसोबत घरच्या शेतात नेहमी त्यांना मदत करत असे. कालांतराने उमाच्या सर्व भावंडांची लग्न झाली होती. जो तो ज्याच्या त्याच्या संसारात मग्न झाला होता. उमाचा एक भाऊ आई-वडील व उमा हे सर्व एकत्र रहात असत. 

    सणावाराला सर्वजन एकतर येवून सण साजरा करत असत. उमाच्या कुठल्याच बहीण भावाने तिला अंतर दिले नव्हते. नेहमी तिला सर्व प्रकारची मदत करत असे. दहा-पाच वर्ष अशीच उलटून गेली. उमाचे इतर भावंड कामानिमित्त दूर रहवयास गेली होती. त्यांच गावी येण्याच प्रमाण ही फार कमी झाले होते. प्रत्येकाला मूल बाळ झाली होती. 

    जो तो आपल्या संसारात मग्न होता. आपल्या मुलांच भवितव्य घडवन्याच्या मागे लागला होता. पण उमाचे वडील तिचा सांभाळ योग्यप्रकारे करत होते. त्यांनी अद्याप तिला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नव्हती. कालांतराने उमाचे आई-वडील वृध्द होत गेली आता तिच्या वडीलांकडन शेतातील फारस काम होत नसे. पण उमाचा एक भाऊ त्यांचा सांभाळ व्यवस्थित करत असे. 

    तिचे इतर भाऊ ही त्यांना पैसा पुरवत असे. उमाच आयुष्य पतीविना सुरळीत चालू होते. उमाचे वडील आता वया मानाने अंथरुणावर पडले होते. त्यांची तब्येत आता त्यांना साथ देत नव्हती. आता उमाच्या मागेही कामाचा व्याप वाढला होता. तीही घरात व शेतात जमेल तेवढ काम करत असे. काही दिवसांत उमाच्या वडीलांच वृध्दपकळाने निधन झाले. आता खरा उमाचा आधार हरपला होता. तिचा सांभाळ करणारे तिचे वडील आता या जगात राहिले नव्हते. 

    वडील गेल्यानंतर काही दिवस इतर भावंडांनी तिचा सांभाळ केला. पण प्रत्येकाला आपला स्वताचा संसार बघायचा होता. आई-वडीलांसोबत एकत्र राहणारा तिचा भाऊ ही आता तिच्याशी वाद घालू लागला. त्याला ही आता त्याच्या संसाराची ओढ़ लागली होती. तोही आता त्याची पत्नी व मुलांकडे जास्त लक्ष देत असत. कालांतराने त्यानेही उमाकड़े दुर्लक्ष केले होते. उमाची वृद्ध आई हे जानत होती. 

    उमामुळे कुणालाही त्रास नको म्हणून उमाच्या आईने उमासोबत वेगळ राहण्याचा निर्णय घेतला. आता उमा व तिची आई वेगळ राहू लागले. दोघीही मजूरी करून आपल पोट भरत असत. उमा आता कुणावरही आवलंबुन नव्हती. स्वताच पोट भरन्या इतपत ती काम करत असत. पण तिच्या आईने तिला अजूनही एकटे सोडले नव्हते. पण कालांतराने तीची आई ही वृद्ध झाली होती. 

    आता तिच्या आईकडन ही फार काम होत नसत. तिची आई झेपेल तेवढच काम करत असत. हळूहळू तिच्या आईची ही तब्येत खालावत चालली होती. तिची आईही आता नेहमी आजारी रहात असे. उमाला स्वतःचा व आईच्या द्वाखान्याचा खरच झेपत नव्हता. 

    उमाने तिच्या आईला मुलांकडे राहवयास सांगीतले. उमा तिचा द्वाखान्याचा खर्च उचलन्यास असमर्थ होती. आता उमाची आई तिच्या मुलांकडे राहाते. उमाच वय ही आता साठी ओलांडून गेल होत. उमाला ही आता फारस काम झेपवत नव्हते. पण जमेल तस काम करून ती आपल पोट भरत असे. कधी काळी तिचे बहीण भाऊ ही तिला आर्थिक मदत करत असत. 



    पण त्यात तीच भागत नसे. कमी वयात पती पासून विभक्त झाल्याने तिला मूलबाळ झाली नाही. त्यामुळ उतार वयात तिचा सांभाळ करण्यास तिला कुणीही नव्ह्त. भाऊ बहीण ही आपल्या संसारात मग्न होती. त्यामुळ ते ही फारस लक्ष देत नसत. उमाची आई ही शंभरीच्या जवळ पोहचली आहे. उमाकडून ही आता काम होत नाही. तिची आता उपासमार होत असे. 

    वाढत्या वयाने ती ही थकली होती. तिला आता दोन वेळच जेवन ही मीळत नसे. ती आता कुणाच्याही घरी जावून जेवन मागत असे. कुणी जेवन देत असे तर कुणी पैसे देत असत. ती आता एकटी पडली होती. वडीलांच्या चुकीच्या निर्णयामुळे आज तिच्यावर हे दिवस ओढावले होते. जर वडीलांनी वेळीच योग्य मुलगा बघून पुनर्विवाह केला असता तर आज उमाला ही मूल असती तीच्या मुलांनी तिचा व्यवस्थित संभाळ केला असता. 

    आज उमाला जर कुणी काही दिले तरच ती पोट भरत असे. तिच्या बहीण भावांनी केलेली मदत ही तिला खुप दिवस पुरवावी लागत. तिच्या आईला इच्छा असुनही तिची मदत करता येत नाही. उमा आज ही हालाखीचे जीवन जगत आहे. आज तिला कुणाचीही साथ नाही. वडील गेल्यानंतर एकट्याने आपले आयुष्य जगत आहे.


Jivan Ek Katha हा Marathi Katha blog आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना नक्की share करा .

 धन्यवाद


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेम आणि मैत्री | Jivan Ek Katha | Marathi Katha

"ती" एक सन्मान | Jivan Ek Katha | Marathi Katha

प्रेम भंग | Jivan Ek Katha | Marathi Katha