कामावरील जवळीक | Jivan Ek Katha | Marathi Katha

जीवन एक कथा । मराठी कथा

कामावरील जवळीक


    नुकतच अमितच शिक्षण संपले होते . आता तो कामाच्या शोधात होता . अमित उच्चशिक्षित होता त्यामुळे तो काम ही त्याच क्षेत्रात बघत होता. आतापर्यंत ५-६ ठिकाणी मुलाखत देऊन झाली होती काही ठिकाणी निवड झाली होती पण अमितच्या अपेक्षेप्रमाणे काम मिळत नव्हते.

     दिवसा माघे दिवस निघत होते पण अमितला मनासारखे काम मिळत नव्हते . अमितच नैराश्य वाढत होत. आता त्याने ठरवल होत मिळेल ते काम करायचे!. अमितच काम शोधन सुरूच होत. तोच एक दिवस त्याला एक कंपनी मधे मुलाखती साठी बोलावण्यात आले. 

    अमितच्या गावापासून ते ठिकाण दूर होते. ठरल्या दिवशी अमित सकाळी मुलाखतीसाठी निघाला. ११ वाजेपर्यंत तो मुलाखतीच्या ठिकाणी पोहचला. तिथे आणखी भरपूर मुले आलेली होती. तिथे गेल्यावर अमितला समजले की मुलाखत दोन - तिन टप्प्यात आहे. काही मुलाचा मुलाखतीचा पहिला टप्पा झाला होता ते दुसऱ्या टप्प्या साठी आले होते. 

    जवळपास तिन वाजता अमितची मुलाखत झाली. त्यानंतर त्याला सांगण्यात आले. पहिल्या फेरी मधे निवड झाल्यास फोन करू व दुसऱ्या फेरिसाठी बोलवू. तशी अमित ची मुलाखत चांगली झाली होती. पण भरपूर मुले मुलाखती साठी असल्याने त्याला चिंता वाटत होती. अमित गावी परतला दोन दिवस झाले अमित फोन ची वाट बघत होता. 

    आणि त्यादिवशी दुपारी अमितला फोन आला आणि मुलाखतीच्या दुसऱ्या फेरी साठी बोलावण्यात आले. अमित थोडा खुश झाला. त्याने लागलीच दुसऱ्या फेरिसाठी तयारी सुरु केलि. आणि ठरल्यावेळी तो दुसऱ्या फेरी साठी पोहचला. त्यावेळी आणखी दोन तिन मुले ही  दुसऱ्या फेरिसाठी आलेली होती. एक एक करून मुले आत बोलवत होती. 

    अमितचा नंबर सर्वात शेवटी आला. अमितची दूसरी फेरी संपेपर्यंत संध्याकाळचे ६ वाजले होते. अमितची दूसरी फेरी संपल्यावर त्याला बाहेर थांबायाला सांगितले. थोडाच वेळात अमितला परत आत बोलावले.अमितची निवड करण्यात आली आहे त्याला सांगण्यात आले. 

    अमित खुप खुश झाला. कारण ज्या क्षेत्रात त्याला काम पाहिजे होते अगदी तेच काम त्याला मिळाले होते. त्यानंतर पगार किती आणि कामावर कधी हजर व्हायचे हे त्याला सांगण्यात आले. पगार थोडा कमी होता. कारण अमितला त्या नविन ठिकाणी किरायानी रूम करुन रहावे लागणार होते आणि जेवणाचा खर्चही आलाच. तिन महीन्या नंतर पगार वाढवू अस सांगण्यात आले. 

    अमितला काम मनासारखे भेटले होते म्हणून त्याने कामावर रुजू होण्यासाठी होकार दर्शवला. दोन दिवसानी नविन महिन्याची एक तारीख होती तेवापासून त्याला कामावर हजर रहायला सांगितले. अमितचा आनंद गगनात मावत नव्हता. 

    तो तेथून निघला रात्रीचे सात वाजले होते गावापर्यंत बस भेटने मुश्किल होते. बस स्टॉपवर गेला. एक बस लागलेली होती. पण ती ही गावापर्यंत नव्हती. दुसऱ्या बसची वाट बघन्यापेक्षा आहे त्या बसने जाने अमितला योग्य वाटले. कारण दूसरी बस कधी असेल किवा नसेलही यापेक्षा रात्र झाली म्हणून तो आहे त्या बसने निघाला.



    अमित बसच्या शेवटच्या स्टॉपवर पोहचला. तिथून त्याचे गाव आणखी २० किलोमीटर होते. रात्रीचे १० वाजले होते. आता त्याला गावाकडे जाण्यासाठी कुठलीच बस नव्हती. त्याने घरी फोन करून घेण्यासाठी बोलावले. रात्रीचे साडे अकरा वाजता अमित घरी पोहचला. दिवसभर थकलेल्या अमितने हात पाय धुतले व जेवन करूं झोपी गेला. 

    दुसऱ्या दिवशी घरातल्या सर्वाना सांगितले त्याची निवड झाली आणि एक तारखेपासून हजर व्हायचे आहे. घरात सर्व आनंदी झाले. अमितसाठी रूम शोधू लागले. तितक्यात एका नातेवाईकाच्या ओळखीचा एक मुलगा रूम करून राहतो हे समजले. तशी अमितची आणि त्याची पूर्वी भेट झालेली. 

    ओळखितलाच मुलगा असल्याने अमित ने त्याच्या रूमवर रहाने पसंत केले. एक दिवस पहिलेच अमित तिथे रहान्यास गेला. दूसरा दिवस उलटला. त्यादिवशी अमितला कामावर हजर व्हायचे होते. सकाळी लवकर उठून आवरून घेतले. 

    नविन ठिकाण व पहिलाच दिवस असल्याने थोडा लवकरच निघाला. तिथे पोहचल्यावर त्याला कामाचा प्रकार सांगण्यात आला. तिथे कामाची जी पद्धत वापरली जाते ती व्यवस्थित समजवण्यात आली. अमितने सर्व निट समजुन घेतले. काही दिवस जुन्याच प्रोजेक्ट्वर काम दिले. अमितच पूर्ण शिक्षण त्याच क्षेत्रातील असल्याने त्याला काहीच अवघड नव्हते. 

    अमितने कामास सुरुवात केलि. त्यासोबतच तेथील सहकाऱ्या सोबत ओळख करुन घेतली. त्याबरोबर त्याने हेही जानुन घेण्याचा प्रयत्न केला की त्याच्यासोबत आणखी नविन कर्मचारी कोण व किती आहेत. त्यावर एक सहकारी ने सांगितले की फक्त एकच कर्मचारी पाहिजे होता. आणि त्यासाठी तुझी निवड केलि आहे. 

    अमित थोडा खुश झाला कारण मुलाखतीच्या वेळेस त्याने बघितले होते जवळपास तिस ते चाळीस मुले होती त्यातून त्याच्या एकट्याची निवड करण्यात आली होती. सहाजिक आहे थोडा गर्व तर होणारच. अमित एकटाच नविन असल्याने त्याला दिलेल्या प्रोजेक्ट वर तो एकटाच काम करत होता. तस त्याच्यासाठी ते काम नविन नव्हते.

     त्याचा प्रोजेक्ट लीडर त्याच्यावर खुश होता. कारण ज्या प्रोजेक्ट साठी दोन मुलांची गरज होती तो प्रोजेक्ट अमित एकटाच हताळत होता. तिन-चार दिवस निघून गेले अमित योग्यप्रकारे काम करत होता. तोच एक नविन मुलीला कामावर घेण्यात आले. त्याच्या प्रोजेक्ट लीडरने ही कल्पना अमितला दोन दिवस अगोदरच सांगितली. तस त्या मुलीला घ्यायच नव्ह्त पण. 

    कारण अजुन ती त्या क्षेत्रातिल काम तेवढ जानत नव्हती. पण तीला शिकायचे ते काम होते. तिन महीने बिनपगारी शिकाऊ कामगार म्हणून घेण्यात आले. दोन दिवसानी ती मुलगी हजर झाली. अमितने तिला मुलाखतीच्या वेळेस बघितले होते. ती नविन असल्याने अमित ज्या प्रोजेक्ट्वर काम करत होता तोच प्रोजेक्ट तिलाही देण्यात आला. 

    पहिल्या दिवशी तिलाही सर्व सांगण्यात आले. आतापर्यंत अमित त्या प्रोजेक्ट्वर खुप पुढे निघून गेला होता. अमितला पाहिले पासून ते काम येत होते व दिलेला प्रोजेक्ट ही अमित चांगल्या प्रकारे करत होता . हे सर्व बघून त्या मुलीला सर्व काम शिकवण्याची जिम्मेदारी अमितवर सोपवण्यात आली. आणि त्यासाठी तिला अमितच्या शेजारी बसवण्यात आले. 

    अमितने पहिल्या दिवशी तीच शिक्षण व नाव विचारले व स्वताची ही महिती तिला सांगितली. तस तीच नाव माधुरी. अमित तिला सर्व गोष्टी व्यवस्थित समजाऊन सांगू लागला. ती जिथे चुकत असे ते सर्व अमित तिला समजून संगत होता व त्यामघिल कारण ही स्पष्ट करत असे. 

    रोज सोबत एकाच प्रोजेक्ट्वर काम असल्याने व माधुरीला सर्व शिकवण्याची जिम्मेदारी असल्याने त्या दोघांच दिवसभर एकमेकांसोबत बोलण होत असे. दिवसा माघुन दिवस उलटत गेले. अमितच्या प्रोजेक्ट लीडर ने जानुन घेतले होते की अमित ईमानदारित सर्व काम करत होता. आणि माधुरीला आहे सर्व गोष्टी व्यवस्थित शिकवत होता. 

    आता प्रोजेक्ट लीडर त्यांच काम बघून जास्त लक्ष घालत नव्हते. अमित आणि माधुरी यांच रोज कामाच्या वेळी एकमेकांसोबत कायम संवाद होत असे. अमित आणि माधुरी मधे एक प्रकारची मैत्री झाली होती. दोघांच्या वयामधे फार अंतर नव्हता. एक दिवस माधुरिने अमितचा फोन नंबर घेतला. अधून मधून काही कामा निमित्त माधुरी अमितला कॉल करत असे. 

    जर एखाद दिवशी सुट्टी घ्यायची असली तरी पहिले अमितला कॉल करून सांगत असे व नंतर ऑफिस मधे सांगत असे. हळूहळू अमित आणि माधुरी मधील मैत्री घट्ट होत गेली. आता त्यांच्या मधे हसन खेळण एकमेकांची टिंगल उडवन चलत असे. माधुरी तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या सर्व गोष्टी अमितला सांगायची. तिच्या परिवारातली सर्व माहिती तिने सांगितली होती. 

    आता ते सहकारी कमी आणि मित्र जास्त म्हणून राहू लागले. पण कामाच्या वेळेस काम . कामा मधे कुठलीही चुक करत नसे. एक दिवस माधुरी गप्पा मारत असताना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगीतल. तिला एक प्रियकर होता. 

    तसे माधुरी आणि तिचा प्रियकर दहावी पर्यन्त एकाच शाळेत शिकलेले. पण शाळेत असताना त्यांच्या मधे तस काही नव्ह्त. दहावी नंतर दोघेही वेग-वेगळ्या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी गेले. जवळपास ५-६ वर्षानी ते दोघे सोशल साईट वर भेटले. एकाच शाळेतील असल्याने ते नेहमी एकमेकांसोबत बोलायचे. हळूहळू त्यांच्या मधे प्रेम संबंध निर्माण झाले.

     हे सर्व माधुरिने अमितला सांगितले. पण जेव्हा दोन वर्ष होउनही ते अजुन एकमेकांना भेटले नव्हते. कदाचित त्यामुळे त्यांच्या मधे प्रेम तर होते पण जिव्हाळा नव्हता. कारण माधुरी आणि तिच्या प्रियकरा मधे रोज भांडण होत असे. त्यांच्या मधे जे काही व्हायच ते माधुरी अमितला सांगायची. या गोष्टीमुळे माधुरी नेहमी तनावात असायची. 

    त्याचा परिणाम तिच्या कामावर ही होत असे. माधुरी कामावर असल्यावर ही त्याच कॉल करन सुरूच असायच. या सर्व गोष्टीला माधुरी वैतागली होती. एक दिवस तिने अमितला विचारले सर आता तुम्हीच यावर मार्ग सांगा. अमितने तिला विचारल. तुम्ही दोघे वेगवेगळ्या शहरात राहतात. तुम्ही दहावीला असतानाच एकमेकांना बघितलेले. 

    दोन वर्ष झाले अजुन एक भेट सुध्धा नाही. एक वेळेस एकमेकांना भेटा त्यातून तुमच्यात थोडा जिव्हाळा निर्माण होईल. तिने तस तिच्या प्रियकराला सांगितले पण तो भेटायला येण्यासाठी तयार नव्हता. ते हि तिने अमितला सांगितले. 

    अमितने परत तिला प्रश्न केला तुम्ही लग्न करणार अहात का? त्यावर ती म्हणाली मी तयार आहे मी माझ्या घरच्याना तयार ही करेल. पण तो लग्नासाठी नाही म्हणतोय. अमितने विचारले जर तो प्रेम करतो मग लग्नासाठी का नाही म्हणतोय?.  लग्न न करण्यासाठी कारण होते "जात" ते दोघेही वेगळ्या जातीचे होते. व त्याच्या घरचे परवानगी देणार नाही अस तो सांगत होता. 

    अमितला थोड हसायला आले. माधुरिने विचारले काय झाल सर?. त्यावर अमित बोलला तू एक मुलगी असून लग्नासाठी घरच्याना तयार करायची हिम्मत ठेवते. आणि तो मुलगा असून स्पष्ट नाही म्हणतोय. अमितने परत माधुरीला विचारल खरच त्याच तुझ्यावर प्रेम आहे का?. यावर माधुरी उत्तरली कधी वाटते आहे कधी वाटते अजिबात नाही.

     अमित तिला बोलला जर तो भेटू शकत नाही लग्नाला नाही म्हणतोय मग त्याच प्रेम की फोनवर बोलण्या इतकच मर्यादित आहे का.? जर तुला ही माहित आहे शेवट शुन्यच आहे तर मग का स्वताला त्रास करून घेतिये. तसही तुम्ही काही दिवसात वेगळ होणार अहात.

     आता जर तुला त्रास होत असेल त्याचा परिणाम तुझ्या कामावर तुझ्या भविष्यावर होत असेल तर तू आत्ताच थांबुन जा. हे कुठ तरी माधुरीला पटत होत. २-४ दिवस गेले परत माधुरिने अमितला कामावर आल्या आल्या त्यांच्यात झालेला वाद सांगितला. त्यावेळेस अमितने तिला सांगितले जाऊदे जास्त मनावर नको घेऊ कामावर लक्ष दे. 

    दुपार झाली माधुरी आणखी तनावातच दिसत होती. ऑफिस सूटन्याच्या दोन तास पहिले अमितने परत एकदा मधुरिची अवस्था बघितली. अमितने तिला विचारल काय झाल. त्यावर ती बोलली काही नाही सर कालचाच वाद आता घरी गेल्यावर परत सुरु होइल. अमित तिला बोलला तुमच्यात जर काही घडनारच नाही तर सोडून का देत नाहीस त्याला. तुला एकट रहावत नसेल तर.

     आपण दोघ आता खुप दिवसांपासून सोबत आहोत मला तू चांगल्या प्रकारे ओळखतेस. माझ्या प्रेमाचा स्वीकार कर. तसही इतके दिवस झालेत आपण सोबत आहोत आपल्यात कुठलाच वाद झाला नाही. त्यावर माधुरीने नकार दर्शवला. अमित तिला हसत बोलला अग लगेच कुठ एवढ मनावर घेतेस मजाक करतोय राग मानु नकोस. 

    पण या गोष्टीचा माधुरिने वेगळाच विचार केला आणि खुप वेगळा अर्थ काढला. तितक्यात ऑफिस सुटायची वेळ झाली. जाताना अमित परत बोलला मी मजाक करतोय तू जास्त काही मनावर घेऊ नको. आणि ते घरी निघून गेले. रात्री उशीरा माधुरिने अमितला मेसेज केला "मी उद्या ऑफिसला येणार नाही". 

    दूसरा दिवस गेला. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी अमित कामावर आला आणि थोडाच वेळात माधुरी ही आली. नेहमी प्रमाणे बोलू लागली. तिने अमितला विचारल आपले प्रोजेक्ट लीडर आलेत का. अमित बोलला अजुन तरी नाही आलेत पण येतील थोडा वेळात. काही काम होत का अमितने विचारले. त्यावर ती बोलली हो. मी काम सोडतीये अस सांगितले. 

    अमितने विचारले अचानक का.? ती बोलली इथे पगार नाहीये मला. मी दुसरीकडे काम शोधत आहे. अमित बोलला ठीक आहे मग.तरी त्याला शंका वाटली म्हणून सहज विचारल. माझ्यामुळे तर सोडत नाही ना?. ती त्यावर बोलली नाही सर. तेवढ्यात त्यांचे प्रोजेक्ट लीडर आले. माधुरी लागलीच त्यांच्याकड़े गेली. व त्याना दोन दिवसापूर्वी घडलेला सर्व प्रकार सांगीतला. 

    थोडाच वेळात हा प्रकार वरीष्ठांना सांगितला. अमितला थोडीही शंका आली नाही की माधुरी हे सर्व सांगत असेल. थोडा वेळात अमितला ऑफिस मध्ये बोलावण्यात आले. अमितला विचारले दोन दिवसपुर्वी ऑफिस मधे काय घडल. अमितला काहीच समजल नाही. 

    त्यानंतर त्याला विचारले तू माधुरीला काही बोलला का.? त्यावर अमित थोड शॉक झाला. व त्याने स्पष्ट सांगितले. हो सर असे मी बोललो पण ते फक्त हसत हसत बोललो. तो एक मजाक होता. आणि आम्ही नेहमी एकमेकांची मजाक होत असायची. तिला तस त्यावेळेस पण बोललो होतो. त्याने कारण ही सांगितले . "ती रोज ऑफिसला आल्यावर तिच्या प्रियकराबद्दल सांगायची त्यांचे नेहमी वाद होत असायचे." तर मी सहज हसत बोललो दे त्याला सोडून आपण सोबत राहू. 


    त्यानंतर वरिष्ठांना अमितच थोड योग्य वाटल होत कारण त्या दोघांची मैत्री ही सर्वांना ज्ञात होती. पण आता ती अमितच्या नजरेतून उतरली होती. कारण समोर एक बोलली व मागे जाऊन वेगळच सांगितले. कुठ तरी अमितला पश्चाताप झाला की आपण हिच्याशी मैत्री करायला नको होती. सर्व प्रकार ऐकून घेतल्यावर ऑफिस मधील वरिष्ठांना समजले की अमित असे करु शकत नाही.

     कारण अमित हा खुप इमानदार मुलगा होता, पण या एका गोष्टीमुळे अमितला अपमानित वाटले. त्यानी वरिष्ठांना सांगितले माझ्यामुळे जर खरच कुणाला त्रास होत असेल तर तुम्ही मला कामावरून काढू शकता. पण अमितच काम एवढ प्रभावी होते की त्याला कामावरून काढायची अजिबात विचार नव्हता. 

    उलट त्याला धीर दिला व घडला प्रकार विसरून जायला सांगितले. अमित दोन दिवस सुट्टीवर गेला. तिथून आल्यावर त्याच्या जागेवर जाऊन काम सुरु केले. थोडा वेळात माधुरी आली. पण ती नेहमीच्या जागेवर बसली नाही. व तिने ऑफिस मधील सर्वांना सांगू लागली. हे सर्व बघून अमितला खुप वाईट वाटत होते. त्याला अपमानीत झाल्या सारख वाटले. 

    आणि त्याने स्वतःहुन काम सोडण्याची इच्छा वरिष्ठांना सांगितली. यावर त्याची वरिष्ठानी मनधरनी करायचा खुप प्रयत्न केला. पण अमित ऐकायला तयार नव्हता. 

    आणि शेवटी एवढ्या दिवसात मिळालेल काम एका छोट्याश्या चुकिमुळे. एक मजाक मुळे गमवावे लागले. व सोबतच कुठ तरी माधुरीला ही ती काही तरी चुकिच करत आहे हे  जानवल. आणि तिनेही ते काम सोडले. पण अमितची एक छोटीशी चुक  आणि माधुरीचा गैरसमज . यामूळे दोघांनाही काम सोडावे लागले.


Jivan Ek Katha हा Marathi Katha blog आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना नक्की share करा .

 धन्यवाद

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेम आणि मैत्री | Jivan Ek Katha | Marathi Katha

"ती" एक सन्मान | Jivan Ek Katha | Marathi Katha

प्रेम भंग | Jivan Ek Katha | Marathi Katha