बीज प्रेमाचे | Jivan Ek Katha | Marathi Katha

जीवन एक कथा । मराठी कथा

बीज प्रेमाचे


    "ती" ग्रामीण भागातील सर्वसाधारण घरातील मुलगी होती. निसर्गाने बहाल केलेल सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर झळकत होत. ती नुकतीच दहावी उत्तीर्ण झाली होती. दहावी पर्यंत शाळा गावातच असल्याने कधी गाव सोडून बाहेर जाण्याचा प्रसंग आलाच नाही. पण पुढील शिक्षणासाठी त्यांच्या गावात महाविद्यालय नव्हते. घरातील इतर सर्व अशिक्षीत असल्याने तिला शिकण्याची खुप इच्छा होती.

    तिच्या गावापासून जवळपास विस ते पंचवीस किलोमीटर दूर एक महाविद्यालय होते. आजुबाजुच्या सर्वच खेड्यातील मुले तिथे शिकायला येत असे. तेवढ्या भागात ते एकच महाविद्यालय होते. तस ते महाविद्यालय खुप चांगले होते.

    तिने दहावी नंतरच पुढील शिक्षण त्याच महाविद्यालयात घेण्याचे ठरवले. तीने तिच्या वडिलांसोबत जावून त्या महाविद्यालयात प्रवेश घेतला तिच्या गावातील इतर मुला-मुलींनी ही तिथेच प्रवेश घेतला होता. दहावीला सोबत असणारे मित्र-मैत्रिणी तिच्यासोबत असल्याने तिला गावापासून महाविद्यालयापर्यंत जाण्यास सोबत झाली होती.

    तस तीच नाव "सविता", सविताला शिकण्याची खुप जिद्द होती. त्यामुळ तिने नियमित महाविद्यालयात जान्याच ठरवल. सविता व तिच्या जुन्या मैत्रिणीं सोबत रोज कॉलेजला जाऊ लागली. सर्वजन गावापासून ते कॉलेजपर्यंत बसनेच प्रवास करत असत. रोज सकाळी उठने सर्व आवरून बस स्टॉपवर जावून बसची वाट बघणे. बस आल्यावर त्यातून कॉलेजला जाने व कॉलेज सुटल्यावर परत तेथील बस स्टॉपवर बसची वाट बघत थांबने व बस आल्यावर घरी जाने असा तिचा दिनक्रम सुरु झाला होता.

    अभ्यासू वृत्ती असल्याने वर्गात नेहमी पुढच्याच बाकावर बसत असे. सविताला गरीबाची जाणीव असल्याने ती शिक्षणात चांगल लक्ष देत होती. अगदी हलाखीच्या परीस्थितीत आई-वडील आपल्याला शिकवत आहेत याची तिला जाणीव होती.

    सविता अभ्यासात हुशार आहे व ती अभ्यासात कुठेच कमी पडत नव्हती. आपण तर शिकलो नाही पण आपल्या मुलीला शिक्षणात कुठेच कमी पडू द्यायच नाही हे तिच्या आई-वडिलांनी ठरवले होते. काबाड कष्ट करून तिला शिक्षणासाठी लागणारी सर्व गरज पूर्ण करत होते. याच गोष्टीची जाणीव ठेवून सविता नियमित कॉलेज व नियमित अभ्यास करत असे.

    सविताच नियमित कॉलेज सुरु झाले होते पण ती सध्या गावातीलच इतर मैत्रिणींसोबत राहत होती. त्यांच्या वर्गात इतर खेड्यातील मुलीही होत्या. काही दिवस उलटून गेले, हळूहळू सविताची इतर मुलिंसोबत चांगली ओळख होत होती. काही अभ्यासू मुलिंसोबत तिची चांगली मैत्री ही झाली होती. आता जेवणाच्या सुट्टीच्या वेळेस ती तिच्या नविन मैत्रिणींसोबत जेवत असे. रिकाम्या वेळेत त्या सर्वजनी मिळून अभ्यास करत असे.

    सविताच्या गावातील काही मुलंही त्याच महाविद्यालयात होते. कधी काळी काही गरज पडली तर तेवढ्यापुरते त्यांच्याशी तीच बोलन ही होत असे. पण त्या मागे कधीच दूसरा दृष्टिकोण नसायचा.

    सविताच्या वर्गात आणखी एक मुलगा होता "महेश". महेश हा दूसऱ्या खेड़े गावातून येत असे. महेश हा सुद्धा एका सर्व साधारण घरातील मुलगा होता. महेश अभ्यासात फार हुशार नव्हता पण त्याला शिक्षणाची खुप आवड होती. तस महेश च गाव त्याच्या महाविद्यालयापासून अवघ तिन किलोमीटर अंतरावर होत. त्यामुळ महेश ही नियमित कॉलेजला येत असे.

    महेश मुलगा असल्याने घरातील अर्धी जिम्मेदारी त्याच्यावर आली होती. महेशला कॉलेज व्यतीरीक्त घरी जावून शेतीही बघावा लागायची. त्यामुळ त्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळ मीळत नसे. पण तो शिक्षनाला ही तेवढच महत्त्व देत असत. महेशला घरापासून महाविद्यालय जवळ असल्याने कधी तो पायी जात तर कधी कुनाच्या तरी गाडीला हात देवून त्याचा गाडीवर जात असे.

    महेशला शिकण्याची खुप जिद्द होती. त्यामुळ तोही वर्गात पहिल्या रांगेत पहिल्याच बाकावर बसत असे. नविनच महाविद्यालय असल्याने त्याची अजुन कुणाशी फारशी ओळख झालेली नव्हती. त्याच्या गावावरून येणारी मूल व तो ज्या बाकावर बसायचा ती मूल त्याची मित्र बनली होती. त्याच्यासोबत जी मूल बसायची ती सुध्धा हुशार मूल होती त्यामुळ महेशने त्यांच्याशी चांगली मैत्री करून घेतली. तो ज्या रांगेत बसायचा त्या रांगेत आणखी पाच मुले होती. ते सर्व एकमेकांची चांगले मित्र बनले होते. ते सर्व नेहमी एकत्र असायचेत. ती सर्व मुले वेगवेगळ्या गावातुन आलेली होती.

    सर्वच शेतकरी कुटुंबातील असल्याने सर्वच मुले शेती संभाळून शिक्षण घेत होते. त्यातील दोन मुले ही सविताच्या गावातीलच होती. ते सविताला चांगल्या प्रकारे ओळखत होते. व सविताही त्यांना चांगल्या प्रकारे ओळखत होती. तसा महेशचा अजुन वर्गातील कुठल्याच मुलीशी संपर्क आला नव्हता. मुलींशी बोलायला तो थोडा घाबरत असे. त्यामुळ कुठली मुलगी कुठल्या गावातून येते याची अजीबात कल्पना त्याला नव्हती. शिवाय त्याला मुलींची नाव सुध्दा माहित नव्हती.

    अकरावीची पाच-सहा महीने निघून गेली. सहामाही परीक्षा झाली व काही दिवस सर्वांना सुट्टी मिळाली. सुट्ट्यानंतर परत कॉलेज सुरु झाले. सर्व नियमित कॉलेजला येवू लागली.

    एक दिवस अचानक नकळत महेशची नजर सविता वर गेली. सविताच सौंदर्य नावाजन्यासारख होत सविता दिसायला खुप सुंदर होती. महेशची सवितावर पहिली नजर पडताच सविता महेशच्या मनात उतरली. पण अजुन महेशला तीच नाव व गाव काहीच माहित नव्हते.

    महेश आता रोज न चुकता सविताकड़े बघत असे. तीच लावंण्या सारख रूप बघण्याचा मोह त्याला आवरत नव्हता. जनु महेश तिच्या प्रेमातच पडला होता. सविताही पहिल्याच बाकावर बसत असल्याने महेशला तिच्याकड़े बघन सोप्प जात होत. 

    महेशला तीच नाव व गाव जानुन घ्यायच होत. महेश आता तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होता. ती कुठल्या मुलिंसोबत जास्त रहाते हे त्याने माहित करून घेतल. पण अजूनही त्याला तीच नाव माहित झालेल नव्ह्त. 


    एक दिवस वर्गात शिक्षक शिकवत असतांना त्यांनी एक प्रश्न विचारला. त्याच उत्तर देण्यासाठी सविताने हाथ वर केला. शिक्षकांनी तिला उत्तर देण्यास सांगीतले. तिने दिलेल उत्तर हे बरोबर होत. शिक्षकांनी त्यावेळी तिला तीच नाव विचारल. इकडे महेशची नजर तिच्यावरच होती. तिने नाव सांगताच महेशने ते लक्षपूर्वक ऐकून घेतले. तीच नाव सविता हे आता महेशला माहित झाले होते. पण अजूनही ती कुठल्या गावावरून येते हे त्याला माहित नव्ह्त.

    एक दिवस कॉलेज सुटल्यावर महेशने तिच्यावर लक्ष ठेवायच ठरवल. कॉलेज सुटल्यावर सविता व तिच्या मैत्रिणी त्यांच्या गावाकडे जाणारी बस जिथे थांबते तिथे जावून बसची वाट बघत उभी होती. महेश ही तिच्यावर लक्ष ठेवूनच होता. महेश त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभा होता. पण तो चोर नजरेने सारख सविता कड़े बघत होता. त्याने त्याच्या मित्रांना जरा ही शंका येवू दिली नाही.


    थोडाच वेळात बस आली सविता त्या बस मध्ये बसली. व त्याच बस मध्ये महेशच्या शेजारी बसणारे त्याचे दोन मित्र ही बसलेत. पण ती बस फक्त एका गावात जाणारी नव्हती. त्यामुळ अजुनही महेशला सविता नेमक्या कोणत्या गावाची हे पक्क समजू शकले नाही. 

    ती कुठल्या गावाची याचा शोध कसा घ्यावा हे त्याला उमगत नव्हते. त्याचे  मित्र जे त्याच बस मध्ये गेलेत त्यांना नक्की माहीत असाव की सविता कुठल्या गावात उतरती, पण त्यांना विचारायच कस हा एक मोठा प्रश्न होता. जर त्यांना विचारल तर त्यांना वेगळाच संशय नको यायला.

    महेशने काही दिवस वाट बघितली तोपर्यंत त्याच तिच्याकडे बघणे सुरूच होते. एक दिवस न रहावुन महेशने त्याच्या एका मित्राला विचारलेच. त्याच्या मित्राने त्याला कुठलाही विचार न करता ती ज्या गावात रहाते त्या गावाचे नाव सांगीतले. आता महेशला सविताच गाव माहित झाले होते. 

    सध्यातरी महेश फक्त सविताला बघन्यातच खुश होता. महेशच कॉलेज मध्ये असताना सारख सविताकड़े बघणे सुरु असायचे.

    एक दिवस ही बाब सविताच्या लक्षात आली. सविताच्या मनात प्रश्न उद्भवला की हा मुलगा खरच सारख आपल्याकडे बघतो का?. व का बघत असेल याच शोध सविताला घ्यावा वाटला. आता सविता ही महेश वर लक्ष ठेवून होती सविताही थोड्या थोड्या वेळाने महेशकड़े बघू लागली कि हा अजूनही माझ्याकडेच बघत आहे का?. 

    अधून-मधून त्या दोघांची नजरानजर होत असे. तस महेश चांगला मुलगा आहे हे तिला माहीत होते. त्यामुळ तिला त्याचा अजीबात राग नव्हता. अस खुप दिवस सुरु राहिले. सविताच महेशकड़े बघण्याच प्रमाण वाढत चालल होत. वर्गातून बाहेर आल्यवर ही सविता महेशवर नजर ठेवून होती. वर्गात असल्यावर शिक्षक शिकवत असताना ही अधून-मधून सविता महेश कड़े बघत असायची. आता महेशला ही जाणवत होत की सविता आपल्याकडे बघत आहे. दर दहा-पंधरा मिनिटात दोघातुन कोणीतरी एकमेकांकडे बघायच. दोघांचही एकमेकांकडे बघण्याच प्रमाण खुप वाढत गेल.

    सविताला आता महेशकड़े बघण्याची सवयच झाली होती. जनु एकप्रकारची नशाच झाली होती. काही वेळ निघून गेला की आपोआपच तिची नजर महेश वर जात असे.

    नुकतीच दहावी पास झालेली सविता फक्त सोळा वर्षांची होती. हे वय तीच प्रेमात पडण्याच होत. या वयात नकळत कुणाचाही पाय घसरू शकतो. सविताच पण असच काहीतरी झाल. या कवळ्या वयात तिचाही पाय घसरलाच. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. तिच्यातील प्रेम भावना जाग्या झाल्या होत्या.

    महेशकड़े बघता बघता तीला त्याच्यावर प्रेम झाल होत. सविताला महेश खुप आवडत होता, अगदी मनापासून सविताचे प्रेमांकुर महेश साठी उमलत होते. तिच्या कवळ्या हृदयात महेश साठी जागा तयार झाली होती. तस महेशच ही तिच्यावर प्रेम जडल होत. पण अजुन महेशला हे माहित नव्ह्त. सविताच महेशकड़े बघणे सुरूच होते. त्यांची नेहमीच नजर एकमेकांना भिडायची. पण आता जेव्हा ही त्यांची नजर एक होत तेव्हा सविता लाजुन नजर चोरु लागली. व तिचा चेहरा खुलत असे.

    महेश जेव्हा सविताकड़े बघत असे तेव्हा तिच्या नजरेत आता वेगळाच इशारा दिसत असे. एव्हाना महेशला ही समजून गेले होते की सविताला ही त्याच्या मध्ये रस आहे. सविता हे त्याच्यावर प्रेम करत आहे. आता महेश मनात कुठलीही भीती न बाळगता सविता कड़े बघत असे. अजुन त्याने सविताशी बोलण्याची हिम्मत केली नाही. व त्याने कुणालाही तस समजू दिले नाही.

    त्यांची आकरावीची वार्षिक परीक्षा सुरु झाली होती. परीक्षा चालू असतानाही दोघांच एकमेकांकड़े बघन चालूच असायच. परीक्षा संपली दोन महीन्यांची सुट्टी लागली. रोज एकमेकांकडे बघत राहणारे महेश आणि सविता दोन महिन्यासाठी नजरेआड़ जाणार होते. परिक्षेच्या शेवटच्या दिवशी दोघांनी एकमेकाना मनसोक्त बघून घेतल. त्यादिवशी महेश, सविता बस मधे बसून जात नाही, तोपर्यंत तिथेच थांबला होता. एकदाची सविता बसमध्ये बसून निघाली तिचीही नजर महेशवर होती. महेश थोडा नाराज होउन तोही घरी जायला निघाला.



    दोघेही त्यादिवशी खुप नाराज होते. कारण दोघांना एकमेकांची जनु सवयच झालेली होती. महेश सुट्टीमध्ये शेतातली कामे आवरत होता. त्याला सारखी सविताची आठवण येत असे. असच तिकडे सविताच ही होत असे. दोन महीने त्यानी असेच काढलेत.

    आज त्यांच कॉलेज सुरु होणार होत. आता दोघेही बारावीच्या वर्गात गेले होते. कॉलेजचा पहिला दिवस. दोघही खुप आतुरतेने कॉलेजला आलेत. त्यांची जेव्हा एकमेकांवर नजर पडली, तेव्हा ते दोघ खुप खुश झाली. दोन महिन्याच्या दुराव्या नंतर आज ते दोघ एकमेकांसमोर आले होते. त्या दोघांच पूर्वीप्रमाणे सर्व सुरु झाले. जनु ते कॉलेजला फक्त एकमेकांना बघण्यासाठीच येत असे.

    पण बारावीच वर्ष असल्याने त्यांनी अभ्यासातही तेवढच मन रमवल होत. बारावीची दोन महीने उलटून गेली. "कुठवर फक्त एकमेकांकडे बघत रहायच". आता तरी आपल प्रेम सविताकड़े व्यक्त कराव! हा विचार महेशने केला. सविताही त्याच्यावर प्रेम करते तिलाही तो अगदी मनापासून आवडतो हे त्याला ज्ञात होत. वेळ निघून जाण्यापुर्वी त्याने सविताशी बोलायच ठरवल. पण त्यापूर्वी त्याने आपल्या मित्रांना याची कल्पना देण्याच ठरवल. तो ज्या मुलांसोबत रहायच ते सर्व आता चांगले जिवलग मित्र झाले होते.

    त्याने त्यातील दोघांना सविता बद्दल सर्व सांगीतल. त्याच सवितावर प्रेम आहे व सविताची पण तशीच प्रतिक्रीया आहे हे ही त्यांना सांगीतल. ही गोष्ट महेशच्याच बाकावर त्याच्या शेजारी बसनाऱ्या एक मित्राला समजली. "त्याचा वेगळाच गैरसमज झालेला होता",. 

    "वर्गात असताना जेव्हा सविता महेशकड़े बघायची तर त्याच्या शेजारील मुलाला अस वाटायच की ती त्याच्याकडेच बघत आहे" पण वर्गाबाहेर जेव्हा दोघेही सोबत नसायचे तेव्हा सविताची नजर ही महेशकड़े असायची हे महेशला चांगल माहित होते. वर्गातून बाहेर आल्यावर सविता ही महेशच्या नजरेसमोरच असायची. 

    महेश थोडाही नजरेआड़ झाला तरी लागलीच त्याचा पाठलाग करुन तो जिथे असायचा तिथे जावून उभी रहात असे. कॉलेज सुटल्यावर महेश जोपर्यंत कॉलेज मध्ये थांबायचा तोपर्यंत सविताही कॉलेज मध्ये थांबायची. हे सर्व महेशला चांगले माहित होते. पण तरी महेश थोडा संभ्रमात पडला होता. त्याने खरच सविता त्याच्याकड़े बघती का?. एक दिवस त्याने सविताची परीक्षा घेन्याच ठरवल.

    सविता व महेश दोघेही कॉलेज मध्ये आली. पहिला तास सुरु झाला. नेहमीप्रमाने त्यांच एकमेकांना बघन सुरु झाल. पण त्याला आज तिची परीक्षा घ्यायची होती. पहिला तास सुरु झाला. तो आज सविताची परीक्षा घेणार याची तिला जाणीव होवू दिली नाही. पहिला तास झाला दूसरा तास सुरु होण्यासाठी पाच मिनिट वेळ असायचा. पहिला तास संपला.

    महेश उठून लगेच वर्गाच्या बाहेर गेला. सविताने त्याला बाहेर जाताना बघितल. सविता ही लागलीच उठून बाहेर गेली. महेशला ही हेच बघायच होत. दूसरा तास सुरु झाला. महेश परत वर्गात आला त्या पाठोपाठ सविताही आत आली. महेश अस प्रत्येक तासाला करू लागला. सविता ही त्याच्या मागोमाग तसच करत होती. पण सविताला प्रश्न पडला की आज महेश अस का करतोय.

    प्रत्येक तासाला बाहेर जावून उभा राहतो. सविता थोड़ी घाबरली होती. तिला वाटल महेशला बर वाटत नसावा म्हणून तो अस करत असावा. सविताला महेशची काळजी वाटू लागली. कॉलेजचे सर्व तास संपले. सविता महेशवर लक्ष ठेवून होती. महेश वर्गातून बाहेर पडला. त्याच्या मागे लागलीच सविताही बाहेर पडली.

    एरवी कॉलेज सुटल्यावर अर्धा-एक तास मित्रांसोबत थांबनारा महेश दोन मिनिट मित्रांना भेटून लगेच घरी जाण्यासाठी निघाला. त्याला बघायच होत सविताही लगेच कॉलेज मधून बाहेर पडती का?. महेश त्याच्या एका मित्राला घेवुन कॉलेजच्या एका गेटमधून बाहेर पडला. सविता खुप बेचैन झाली. 

    महेश कुठल्या तरी अडचणीत असल्याच तिला जाणवत होत. तिला अजीबात राहावल नाही. तिला महेश काय अडचणीत आहे ते माहित करून घ्यायच होत. तीही लागलीच त्याच्या मागे कॉलेज मधून बाहेर निघली. ती महेशच्या मागावरच होती. महेशने मागे वळून बघितले त्याला सविता त्याच्या मागे येताना दिसली. त्यांच्या कॉलेजला दोन गेट होती.

    महेश पुढे जावून कॉलेजच्या दूसऱ्या गेटने आत शिरला. हे सविताने बघितले. सविता लगेच माघे फिरली व ज्या गेट मधून ती बाहेर आली होती त्याच  गेटने ती परत आत गेली. महेश कॉलेज मध्ये आल्यावर त्याने सविताला कॉलेज मध्ये परत आलेल बघितल. आता महेशला पूर्ण खात्री झाली होती की सविता ही आपल्यावरच प्रेम करते. व त्याच्या मित्राचा गैरसमज झाला आहे. पण सविता थोड़ी घाबरलेली दिसली. तो कॉलेज मध्ये परत आल्यावर मित्रांसोबत नेहमी सारख हसून खेळून बोलू लागला. सविताने त्याला खुश बघितल्यावर तिनेही सर्व काही अलबेल असल्याच समजुन घेतल. व ती चिंतामुक्त झाली.

    महेशने त्याच्या मित्राला समजवन्याचा प्रयत्न केला की सविता ही माझ्यावरच प्रेम करते तशी मी खात्री केली आहे.  पण त्याचा मित्र काही केल ऐकायला तयार नव्हता. शेवटी महेशला सविताच्या प्रेमावर पूर्ण विश्वास होता. त्याने त्याच्या मित्राला पुढाकार घेण्यास सांगितला."तू पहिले जा व तुझ प्रेम व्यक्त कर!" अस महेश ने त्याला सांगीतले.

    तो ही तिला विचारन्यास तयार झाला. बघता बघता महिना लोटून गेला. पण त्याने अजुन काही सविताला विचारले नव्हते. शेवटी महेशने त्याला विचारले "काय झाले?, विचारल का तू सविताला?" त्यावर तो बोलला "अजुन नाही विचारल" महेश बोलला तू नसेल विचारणार तर मला तरी विचारू दे!.

    महेश ने त्याला पंधरा दिवसाचा वेळ दिला. त्या पंधरा दिवसात त्यांची सहामाई परीक्षा होणार होती व नंतर दिवाळीची सुट्टी लागणार होती. महेशने त्याला तस स्पष्ट सांगीतले. "दिवाळीपर्यन्त जर तू नाही विचारल तर दिवाळीनंतर कॉलेज सुरु झाल्यावर मी तिला विचारेल". त्याचा मित्र यासाठी तयार झाला.

    महेशच्या मित्राची काही केल्या त्या पंधरा दिवसात बोलण्याची हिम्मत झाली नाही. दिवाळी निघून गेली. आता महेश त्याच प्रेम व्यक्त करणार होता. तस त्याने एक वेळेस त्याच्या मित्राला विचारून घेतले. त्याचा मित्रही बोलला माझी तिला बोलण्याची हिम्मत होत नाहीये. व त्याने यातून माघार घेतली. आता महेश सविताला प्रेमाची मागणी घालणार होता. 

    एव्हाना त्याच्या वर्गातील भरपूर मुलांना त्याच्या प्रेमाची कल्पना होती. त्याच्या बाकावर बसनाऱ्या सविताच्या गावातील दोन मुलांना ही कल्पना होतीच. -

    दोन दिवसात महेशने सविताला विचारण्याची तयारी केली. पण जे घडू नये असच काहीतरी घडले होते. "दिवाळीच्या सुट्टी मध्ये सविताला बघायला पाहुने आले होते, व सविताच दुसरीकडे लग्न  ही जमल होत." ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागात मुलींची लग्न लवकर करत असे. सविता ही आई-वडिलांच्या विरोधात जावू शकत नव्हती. पण तीच लग्न जमल आहे हे तिने महेश ला जाणवू दिले नाही.

    सविताच्या गावातील मुलांनी ही बाब महेशला सागीतली. हे ऐकून महेशला चांगलाच धक्का बसला. व आपण सविताला बोलण्यास खुप उशीर केल्याचा पश्चाताप त्याला होवू लागला. सविताच लग्न होणार त्यामुळ आता सविताला प्रेमाची मागणी घालायचा विचार सोडून दिला होता. पण सविताच त्याच्या कड़े पुर्विप्रमाने बघन लाजन सुरु होत.

    महेशला ही तीच्याकड़े बघण्याचा मोह आवरत नव्हता. एवढ्या दिवसात ते दोघ एकमेकांना एक शब्द ही बोलले नव्हते. फक्त नजरेतूनच सर्व खेळ सुरु होता. बघता-बघता बारावीची वार्षिक परीक्षा सुरु झाली. महेश व सविताने व्यवस्थित पेपर दिलेत. "सुट्टी मध्ये सविताच लग्न होत". महेश ने सविताचा विचार करन सोडून दिले होते. कारण काही केल्या ती त्याला भेटणार नव्हती.

    आज त्यांचा बाराविचा निकाल लागणार होता. आता पूर्वीप्रमाणे महेशला सविताची आठवण येत नव्हती. निकालच्या दिवशी सविता येइल व आपल्याला बघायला मिळेल असा विचार सुद्धा तिच्या मनात येत नव्हता. 

    पण लग्न होवून ही सविता त्याला विसरली नव्हती. सविताला चांगलच  माहित होत की निकालाच्या दिवशी महेश निकाल घ्यायला नक्की येइल. सविताला एकदा मनभरुन महेशला बघायच होत. निकाल लागायच्या दिवशी सविता कॉलेज मध्ये पोहचली. तिने तिचा निकाल घेतला तिला महेश काही दिसला नाही.

    महेश येईलच हे ती चांगल जानत होती, ती  बाजुला जावून महेश येण्याची वाट बघू लागली. महेश आला त्याने त्याचा निकाल घेतला. सविता त्याची वाट बघत आहे याची जराही त्याला कल्पना नव्हती. सविताने त्याला बघितल व त्याच्या समोर आली. महेशची नजर सवितावर गेली.

    यावेळी तीच रुपच वेगळ होत. अंगात साड़ी नेसलेली गळ्यात मंगळसूत्र होत. महेशने तिला अस बघून त्याच्या डोळ्यात पाणी आल. व तो लागलीच घरी जाण्यास निघाला. पण सविताने मध्येच त्याला अड़वल व त्याच्या सोबत बोलत उभी राहीली. सविताच महेशवर आतोनात प्रेम होत. त्यामुळ तिला शेवटी का असेना एकदा तरी त्याला बोलायच होत.

    दोन-पाच मिनिट ते दोघ बोलत उभी राहिली. पण प्रेमाचा विषय त्या दोघांनी ही घेतला नव्हता. बोलता-बोलता "सविताच्या डोळ्यात पाणी येवू लागल". शेवटी कस तरी स्वतःला संभाळत सविताने महेशचा निरोप घेतला. सविताच्या डोळ्यात पाणी आलेल महेशनेही बघितल होत.

    पण आता सर्व वेळ निघून गेली होती. सविता महेश दोघेही बारावी चांगल्या मार्काने पास झाली होती पण त्यांच्या "पहिल्या प्रेमात दोघेही नापास झाली होती". "उमलत्या वयात दोघांच्या प्रेमाचे बिज पेरले गेले होते, पण ते उमलायचेच राहून गेले". त्यादिवसानंतर सविताला महेशला कधीच एकमेकांचा चेहरा बघायला नाही भेटला. त्यांच प्रेम अर्ध्यावरच थांबले.....!!!! 


Jivan Ek Katha हा Marathi Katha blog आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना नक्की share करा .

 धन्यवाद


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेम आणि मैत्री | Jivan Ek Katha | Marathi Katha

आईची माया | Jivan Ek Katha | Marathi Katha

"ती" एक सन्मान | Jivan Ek Katha | Marathi Katha