विदेशी मैत्रीण प्रेमिका | Jivan Ek Katha | Marathi Katha
जीवन एक कथा । मराठी कथा
विदेशी मैत्रीण प्रेमिका
मनोजला फेसबुक वर नव-नविन मित्र मैत्रिणी बनवण्याची आवड होती. तो नेहमी फेसबुकवर नविन मित्र बनवून त्यांच्याशी बोलत असे. तसा मनोज बोलण्यात हुशार होता. त्यामुळे त्याची मैत्री ही फार लवकर होत असे. मनोज तसा २०-२१ वयातील तरुण होता त्याच शिक्षणाच वय होत.
एक दिवस असेच मनोजच्या डोक्यात आले, का नाही आपण या आवडीचा काहीतरी शिकण्यासाठी फायदा करून घेतला पाहिजे. त्याने इंग्रजी भाषा, जीचा सर्विकडे वापर होता ती इंग्रजी भाषा अस्खलीत बोलायला शिकण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने फेसबुक वर विदेशी मित्र बनवण्याचे ठरवले.
त्याने विदेशी मुलांना फेसबुक वर मैत्री करण्यासाठी विनंती पाठवने सुरु केले. काही मुले विनंती स्वीकारत होते तर काही नकारत ही होते. ज्यांनी विनंती स्वीकारली अशा मित्र मैत्रिणीशी तो बोलायचा प्रयत्न करत होता. त्यातून त्याला हे जाणवले की, मूल जास्तकरून उत्तर देत नव्हते. सहाजीक आहे, मनोज एक मुलगा असल्याने एक मुलगा त्या मध्ये जास्त आवड दाखवत नव्हता.
जरी मनोज चा उद्देश इंग्रजी भाषा शिकण्याचा होता पण समोरच्या व्यक्तीचा तसा कुठलाच हेतु नसायचा. ही बाब मनोजला चांगली समजली. आता त्याने विदेशी मुलींसोबत बोलन्यास सुरुवात केली. त्यातही त्याला अडचण येतच होती.
एक तर काही मुली काही केल्या बोलत नव्हत्या. आणी ज्या बोलायच्या त्यांना मनोजच इंग्रजी फारस समजत नव्ह्त. कारण अजुन मनोज तेवढ्या चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलू शकत नव्हता. हळूहळू त्याला विदेशी लोकांसोबत कस बोलाव हे समजू लागले. तो त्याप्रकारे बोलूही लागला.
आता त्याची मैत्री बऱ्यापैकी होत होती. त्याने मोजक्याच मुलिंसोबत बोलायचे ठरवले. तस एक मुलगी छान प्रकारे त्याच्याशी बोलत होती. आणी मनोजला ती तसा वेळ ही देत होती. तस मनोज आणखी दोन तिन मुलिंसोबत ही बोलत होता. पण त्यांच्याशी तस जास्त बोलन होत नसे. ज्या मुलीसोबत मनोज जास्त वेळ बोलायचा तीच नाव "जैस्मिन" होत.
मनोज आणी जैस्मिन ची मैत्री चांगली जमली होती . पण जैस्मिन खुप रागीट होती. छोट्या छोट्या गोष्टीवर राग येने हे तीच रोजच होत. पण काहीतरी शिकायच आहे म्हणून मनोज सहन करू लागला. पण त्याने आता दूसरी चांगली मुलगी शोधण्याचा प्रयत्न चालू ठेवला. जेणेकरून त्याला चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलता येइल. एक दिवस मनोज जैस्मिन सोबत बोलत होता. त्यावेळी जैस्मिन ने तिची सध्याची असलेली वाईट परीस्थिती सांगितली.
ती किरायच्या रूम मध्ये राहत होती. व चार पाच महिन्यांपासून तिने किरायचे पैसे दिले नव्हते. तीला थोड़ी पैशांची गरज आहे सांगितले. तिने मनोजला विचारले माझी काही मदत करू शकतोस का? त्यावर मनोज बोलला आपण दोघ वेगवेगळ्या देशात राहतो मी कशी मदत करू शकतो. जवळ असतो तर नक्कीच काही तरी केले असते.
तिने मनोजाला ऑनलाइन पैसे पाठवन्यासाठी सांगितले. त्यावेळी मनोज ने स्पष्ट नकार नाही दिला पण त्याने सांगितले सध्या माझ्याकडे ही पैसे नाहीयेत थोड़े दिवसात जमल्यावर पाठवेल. एवढ्या दूरच्या व्यक्तीला पैसे पाठवायचे? ज्या व्यक्तीला कधी बघितले ही नाही भेटलो ही नाही. तिच्यावर कसा विश्वास ठेवायचा. मनोजची फसवणुक होण्याची शक्यता नकारता येत नव्हती. आता त्याने तिच्याशी बोलने कमी केले. कारण तिचा उद्देश मनोजच्या लक्षात आला होता.
मनोज दूसरी मैत्रीण शोधू लागला. जी साफ़ मनाची असेल. जीचा फक्त मैत्री हाच एक उद्देश असेल. जैस्मिन सोबत बोलन आता तो टाळू लागला. कारण जेव्हाही जैस्मिन सोबत बोलन होत असे ती फक्त पैश्यांचीच मागणी करत असे.
एवढ्या दिवसात मनोजला दूसरी मैत्रीण मिळाली होती. तीच नाव "लुईस" होते. लुईस ही खुप शांत व समजदार मुलगी होती. तिचे आणी मनोजचे खुप छान प्रकारे जमत असे. दोघांचे विचार ही खुप मिळत असे. लुईस व मनोज ची मैत्री घट्ट होत चालली होती. मनोजला अजीबात जाणवत नव्हते की तो एका विदेशी मुलीसोबत बोलतोय.
मनोजच्या आयुष्यात खुप मित्र मैत्रिणी येउन गेले मनोजचा मित्रपरीवार खुप मोठा होता. फेसबुकवर ही त्याने भरपूर मित्र मैत्रीण जमवले होते. पण लुईस त्या सर्वांपेक्षा वेगळीच होती. त्याच्या आयुष्यात लुईस ही त्याची सर्वश्रेष्ठ मैत्रीण ठरली.
एकमेकांपासून सात समुद्र पार होते. पण त्यांची मैत्री एवढी घट्ट झाली होती की त्यांना तस अजीबात जाणवत नव्हते. अधून-मधून मनोजला जैस्मिनचे संदेश ही येत होते पण मनोज तिला जास्त बोलत नव्हता. इकडे लुईस आणि मनोज एवढे चांगले मित्र झाले होते की आता ते एकमेकांचे फोटो सुद्धा एकमेकांच्या फेसबूकवर टाकत असे.
एकदिवस जैस्मिनने मनोजच्या फेसबुकवर लुईसचा फोटो बघीतला. आगोदरच रागीट असलेली जैस्मिन मनोजवर चांगलीच भडकली. मनोजने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. जशी तू माझी मैत्रीण आहे. तसच ती ही माझी मैत्रीण आहे. त्यात एवढ चिडायला काय झाले?. त्यावर जैस्मिन बोलली तू कुणाशी ही बोल पण लुईस सोबत नको बोलूस. तुला मी हवी असेल तर तिच्याशी बोलण बंद कर. मनोजला काही समजत नव्हते. एकीकडे मनोजची लुईस सोबत खुप छान मैत्री जमली होती.
तो काही केल्या लुईस सोबत बोलन बंद करणार नव्हता. पण मनोजला जैस्मिन का लुईस सोबत बोलू नको सांगतिये ते जानुन घ्यायचे होते. मनोज ने खुप प्रयत्न केले जैस्मिन कडून कारण माहित करून घेण्याचे.
त्यानंतर त्याला जे समजले ते ऐकून त्याला एक म्हण स्वतः अनुभवायला मिळाली ती म्हणजे "जग केवढे तर माझ्या मुठीत माव्हेल एवढे". म्हणजे मनोज च्या त्या मैत्रिणी. जगात नविन मित्र मैत्रिणी बनवायला निघालेल्या मनोज ला दोन मैत्रिणी मिळाल्या त्या दोघी एकमेकींच्या खुप जवळच्या होत्या.
जैस्मिन आणी लुईस या एकमेकींना चांगल ओळखत होत्या. त्या एकमेकींच्या नात्यात होत्या. शिवाय एकाच महाविद्यालयात शिकायला होत्या. महाविद्यालयात असताना त्यांच्यात खुप मोठा वाद झालेला होता. त्याच कारनावरून जैस्मिन मनोज ला तिच्याशी बोलू नकोस सांगत होती.
जैस्मिन मनोजला बोलली एकतर तू तीचा मित्र बनुन राहू शकतो किवा माझा. तसही जैस्मिन चा मनोजला फसवन्याचा उद्देश होता. आणी लुईस सोबत त्याची मैत्री खुप चांगली होती. त्याने जैस्मिनला स्पष्ट सांगितले काही केल्या मी लुईस सोबत मैत्री तोडू शकत नाही.
त्यादिवसापासुन जैस्मिन आणी मनोज एकमेकांना बोलत नाहित. मनोज आणी लुईसची मैत्री आता खुप घट्ट झाली होती. त्या दोघांच आता रोज बोलण होत असे. एक दिवस जरी बोलण झाल नाही तरी दोघ बेचैन होत असे. आतापर्यंत मनोजची इंग्रजी चांगलीच पक्की झाली होती. जिथे मनोज बोलायला चुकायचा तिथे लुईस त्याला समजवून सांगायची.
मनोज आणी लुईस ला एकमेकांची एवढी ओढ़ लागली होती की त्यांना एकमेकांना बघायच होत. एक दिवस त्यानी विडियो कॉल करायचे ठरवले. ते दोघेही विडियो वाल वर बोलले. लुईस तशी दिसायला खुप सुंदर होती. लुईस ला ही मनोज खुप देखना वाटला.
आता ते नेहमी विडिओ कॉल किवा साधा कॉल करून बोलायचे. लुईसने तिच्या सर्व मित्र मैत्रिणीना मनोज बद्दल सांगितले. तिच्या मित्रांकडून ही मनोजचे कौतुक केले जात असे. लुईस आणी मनोज मध्ये खुप जवळीक वाढत होती. रोज बोलन होत असल्याने त्यांना एकमेकांशिवाय राहवत नव्ह्त. त्या दोघांना भेटण्याची खुप इच्छा होती पण दोघेही साधारण घरातील असल्याने एवढ दुरचा प्रवास करणे शक्य नव्ह्त. त्यामुळ ते विडियो कॉल वरच बोलून मन भरवत असे.
त्या दोघांची मैत्री हळूहळू प्रेमाच्या रस्त्यावर उतरत होती. पण त्यांच्या प्रेमाला शेवट नव्हता याची त्यांना जराही कल्पना येत नव्हती. कारणकितीही घट्ट प्रेम झाले तरीही ते दोघ एकमेकांना कधीच भेटू शकत नव्हते. एव्हाना त्या दोघानी प्रेमाचा स्वीकार केला होता.
त्यांच्या मध्ये प्रेमाच्या गप्पाही खुप छान रंगत. दोघेही वेगवेगळ्या देशातील होते दोघांची संस्कृतीही खुप वेगळी होती. तरीही त्या दोघांच एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. लुईसला आई वडील नव्हते. आणी मनोज ने तिच्या मनावर अभीराज्य गाजवले होते.
मनोज ही लुईसच्या सर्वश्रेष्ठ मित्रां मध्ये होता. मनोज लुईसला खुप जीव लावत असे. लुईसच्या आयुष्यात मनोज हा पहिलाच व्यक्ति होता जो तिची एवढी काळजी करायचा. त्यामुळ लुईस मनोज वर जिवापाड प्रेम करत असे.
लुईस आणी मनोज हे दोघे लग्न करण्यासाठी तयार होते. पण त्या दोघांची ही परिस्थिती बेताची असल्याने हे त्यांना शक्य नव्हते. त्या दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला होता. दोघेही त्या तयारीत लागले होते. ते दोघेही आता खुप मेहेनत करत होते.
त्यांना पैसे जमवायचे होते. सहाजीकच आहे एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी खर्चही खुप लागणार होता. कामाचा तनाव दोघंवरही खुप होता. त्या दोघांना एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नव्हता. त्यात कामाचा तनाव असल्याने दोघांची ही खुप चिडचिड होत असे. दोघांचे अधून मधून भाण्डंण व्हायला लागली. लुईस मनोजला खुप समजुन घेण्याचा प्रयत्न करत असे. पण जनु आता मनोजला वाद घालण्याची सवय झाली होती. त्यांच्या मध्ये नेहमी वाद व्हायला लागली.
लुईस या सर्व गोष्टीला वैतागली होती. पण तिला मनोज च प्रेम गमवायच नव्ह्त. मनोज ला ही ती हवीच होती. तो वाद घालायचा पण प्रेम ही तेवढच करायचा. लुईस त्याला नेहमी समजवायची की माझ्याशी वाद नको घालुस. मी जर एकदाची तुझ्या आयुष्यातन गेली तर तू किती काही केल तरी मी तुला भेटणार नाही. मला या गोष्टीचा खुप त्रास होतोय.
मला तुझी साथ हवी आहे , नको वाद घालत जाउस. मनोजला ला ही ती पत्नी म्हणून हवीच होती पण त्याचा स्वभाव आता चिडचिडा झाला होता. मनोज आणी लुईसच्या प्रेम प्रकरनाला जवळजवळ दोन वर्ष उलटून गेली होती. एवढ्या दिवसांची साथ त्यांना तोडायची नव्हती. पण काळाला हे मान्य नव्ह्त. मनोजच शिक्षण पूर्ण होउन तो आता कमवता झाला होता.
त्याचे आई वडील त्याच्या लग्नासाठी मुलगी शोधत होते. तो ही त्याच्या आई वडिलांच्या पुढे जाऊ शकला नाही. आणी तो हे ही जानत होता लुईस सोबत लग्न हे फक्त स्वप्नच राहील. त्याच्यासाठी मुलगी बघताय हे त्याने लुईसला समजू दिले नाही. पण त्याच तिच्यावरच प्रेम अजूनही तेवढच होत. मनोजच इकडे लग्न जमले. मुलगी छान होती. तो ही गोष्ट लुईसला सांगू शकत नव्हता. पन लुईसमुळे त्याच्या वैवाहीक जीवनात कसली अडचन नको व्हायला.
तो चिंतेत होता. काय करावे त्याला काहीच सुचत नव्हते. त्याच वाद घालन काही बंद होत नव्हते. यामुळ लुईस त्याच्या सोबत बोलण टाळत असे. मनोजला ही लग्नानंतर काही दिवस लुईस सोबत बोलन बंद करावे लागणार होते. कारण नविन वैवाहिक जीवनात त्याच्या पत्नीच्या नजरेतून त्याला उतरायचे नव्हते.
एक दिवस त्याने खुप हिम्मत केली व लुईसला सांगीतले "माझ लग्न जमल आहे" लुईस खुप नाराज झाली. हे ऐकून लुईसला चांगलाच धक्का पोहचला लुईस खुप रडायला लागली. कारण ज्या मनोजला तिने आपल सर्वस्व मानल होत तोही आता तिचा राहणार नव्हता. ही गोष्ट तिला सहन होत नव्हती.
मनोजने तीला खुप समजवल. व तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण तिने मनोजला आयुष्यभर मैत्री निभवायला सांगीतली. मनोज त्यासाठी तयार होता. मनोजच लग्न थोड्या दिवसांवर येउन पोहचल. त्याला काही दिवसासाठी लुईस सोबत बोलन बंद करायच होत. लुईस ऐकायला तयार नव्हती. त्यावरून त्यांच्यात खुप वाद होत असे. दोन चार दिवस असच चालल आणी शेवटी लुईसने बोलायच बंद केले. मनोजचे लग्न झाले पण त्याला सारखी लुईसची आठवण येत असे.
त्याच्या लग्नाला १ वर्ष होउन गेले पण तो अजुन ही लुईसला विसरला नव्हता. आतापर्यंत त्याच्यापत्नीचा ही त्याच्यावर चांगला विश्वास बसला होता. एक दिवस त्याने त्याच्या पत्नीला लुईस बद्दल सांगायची हिम्मत केली. त्याने सांगीतले माझी एक विदेशी मैत्रीण होती.
आमच खुप जमायच पण लग्ना अगोदर तिच्या सोबत बोलण बंद केल. मनोजच्या पत्नीने लुईस सोबत बोलायला परवानगी दिली. आणी तिलाही उत्सुकता होती मनोजच्या विदेशी मैत्रिणीला बघायची. मनोज लुईसला फेसबुकवर शोधू लागला त्याला काही केल्या लुईस सापडत नव्हती. मनोजने तिच्या मैत्रिणीला ही सांगितले तिला बोलायला .
आशा आहे मनोजला त्याची विदेशी मैत्रीण लुईस हि लवकरात लवकर परत मिळो.....!!!!



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा