"ती" एक सन्मान | Jivan Ek Katha | Marathi Katha
जीवन एक कथा । मराठी कथा
"ती" एक सन्मान
अनुजा एक सुंदर व सोज्वळ मुलगी, अनुजाचे आई वडील दोघेही उच्चशिक्षित होते. अनुजाचे वडील एका कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला होते. अनुजाच्या आईच देखील खूप शिक्षण झाले होते. परंतु अनुजाची आई कुठल्याही प्रकारची नौकरी न करता फक्त आपलं घर व परिवारास सांभाळत असे. घरात अनुजाला एक लहान बहीण ही होती. आई वडील व दोन्ही बहिणी. असा छोटा व सुखी त्यांचा परिवार होता.
अनुजाला एकही भाऊ नव्हता. आई-वडील दोघेही शिक्षीत व समजदार असल्याने त्यांचे विचार स्वच्छ असल्यामुळे ते मुलगा व मुलगी यांच्यात फरक मानत नव्हते. लागोपाठ दोन मुली झाल्या होत्या तरी ही. त्यांनी मुलगा नसल्याची खंत बाळगली नाही. ते दोन मुलीं मध्येच अतीशय आनंदी होते. त्यांना इतर नातेवाईक व मित्र मंडळीने सल्ला दिला की एक तरी मुलगा होऊद्या.
पण अनुजा चे आई-वडील दोन मुलींवर समाधानी होते. त्यांना आता तीसरे अपत्य नको होते. त्यांना छोटं कुटुंब हवं होतं. त्यांनी कुणाचही काहीच ऐकले नाही. ते दोघे आपल्या निर्णयावर ठाम होते. अनुजा व तिच्या बहिणीला चांगले शिक्षण द्यायचे व त्यांचे सर्व लाड पुरवायचे हे त्या दोघांनी मिळून ठरवले. तसा त्यांचा हा निर्णय स्वागतार्ह होता. अनुजा व तिची बहीण दोघी अद्याप लहान होत्या.
बालपणी महागडी खेळणं महागडी कापडं त्यांचे आई-वडील अगदी हौसेने पुरवत असत. आपल्या मुली नेहमी आनंदी असल्या पाहिजेत हिच त्यांची इच्छा होती. त्यांचे सर्व बालहट्ट पुरवली जात होती. अनुजा आता शाळेत जाण्या इतपत मोठी झाली होती. आपल्या मुली शिक्षणात कुठेच कमी पडायला नको. त्यासाठी अनुजाला एका चांगल्या शाळेमध्ये दाखल करण्यात आले.
शाळा सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण आहे अशाच शाळेत अनुजाला दाखल करण्यात आले. अनुजा आता नियमित शाळेत जात असे. ती अभ्यास ही व्यवस्थित करू लागली. तिचं शाळेत चांगले मन रमत होते. अनुजाला शाळेत दोन वर्षे पूर्ण झाली होती.
अनुजा अभ्यासात हुशार झाली होती. आता तिच्या पाठोपाठ तिच्या बहिणीला ही त्याच शाळेत दाखल करण्यात आले होते. दोघी बहीणी हसत-खेळत शाळेत जाऊ लागली. दोन्ही बहिणी अभ्यासात व्यवस्थित लक्ष देत असतं. त्यांचे आई-वडील ही त्यांच्या शिक्षणात कुठेच कमी पडायला नको म्हणून विशेष लक्ष देत असतं. मुलींना कुठलीच गोष्ट कमी पडायला नको.
त्यांचा सांभाळ व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून आईने उच्च शिक्षीत असुनही कुठलीच नोकरी पत्करली नाही. आई पुर्ण वेळ आपल्या मुलींना देत असत. हळूहळू दोन्ही बहिणी मोठ्या होत होत्या. शिक्षणात ही त्या कुठेच कमी पडत नव्हत्या. दोघीही अभ्यासात अतीशय हुशार होत्या. त्यांच्या आई-वडिलांना ही त्यांच्यावर खूप गर्व होता. अनुजा आता मोठी झाली होती.
ती आता कळती झाली होती. आई-वडील आपल्यासाठी घेत असलेली मेहनत तिला दिसत होती. समाजात इतर काही लोक मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्त्व देतात. मुलगा मुलगी यांच्यात भेदभाव करतात. एका पाठोपाठ मुलीच झालेल्या तर मुलगा होण्यासाठी नको ते उपाय करतात.
कित्येक लोक तर मुलींना पोटातच संपवतात . पण आपल्या आई-वडिलांनी असे केले नाही हे ती चांगल्याप्रकारे जाणत होती. आपल्या आई-वडिलांसाठी आपणच मुलगा व आपणच मुलगी आहोत. आई-वडीलांनी आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडु दिली नाही हे ही ती जाणत होती. त्यामुळे आता आपणही आई-वडिलांना कधीच नाराज करायचं नाही असे तिने ठरवले.
आई-वडीलांचे सर्व स्वप्न पूर्ण करायचे ठरवले. आई-वडिलांना मान खाली घालावी लागेल असं मुळीच वागणार नाही. आई-वडिलांना नेहमी आपल्यावर गर्व असला पाहिजे असेच वागायचे तिने ठरवले. व समाजात ही तिला दाखवायचे होते की मुली सुद्धा प्रगती करू शकतात. मुलीही आई-वडिलांच नाव मोठं करू शकतात. अनुजा आता तिने ठरवल्या प्रमाणे तिचं आयुष्य जगत होती.
कधिही चुकीचे पाऊल उचलायचे नाही हे तीने ठरवले होते. व त्याप्रमाणे ती वागत ही होती. बघता बघता अनुजा दहावी पास झाली होती. दहावीत तिने खूप छान मार्क्स मिळवले होते. तिच्या या कर्तुत्वावर तिचे आई-वडील अतीशय आनंदी होते. पुढील शिक्षणासाठी तिला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. ति नियमित महाविद्यालयात जाऊ लागली.
अनुजा महाविद्यालयातील शिक्षणात ही कुठेच कमी पडत नसे. महाविद्यालयात तिचे नवं नवीन मीत्र मैत्रीणी झाले होते. त्यांच्यासोबत आता नियमित अभ्यास करणे. हसणे खेळणे, कधी तरी फिरायला जाणे चालु होते. अनुजाच्या वर्गात एक मुलगा होता "रोहन".
रोहन व अनुजा यांच्यात चांगली मैत्री होती. तसा रोहण हि चांगल्या घरचा मुलगा होता. तो ही अभ्यासात अतीशय हुशार होता. सुसंस्कारी होता. हळूहळू दोघांची मैत्री खुप घट्ट झाली होती. दोघेही आपला इतर वेळ एकमेकांसोबत घालवत असे.
नकळत रोहन कधी अनुजाच्या प्रेमात पडला हे त्यालाच समजले नाही. एक दिवस नरहावुन त्याने अनुजाकडे प्रेमाची मागणी घातली. रोहनचा स्वभाव पहाता ती त्याला नकारु शकत नव्हती. पण तिला आयुष्यात या मार्गावर जायचे नव्हते. आई-वडिलांना खाली मान घालावी लागेल असं तिला मुळीच वागायचे नव्हते. आई-वडिलांना तिच्याकडुन असलेल्या अपेक्षा हे ति जाणत होती.
आई-वडिलांच्या स्वप्नापेक्षा दुसऱ्या कुठल्याच गोष्टींवर तिला लक्ष्य द्यायचे नव्हते. तस तिने रोहनला बोलुन दाखवल्या की माझ्या आई-वडिलांना मुलगा नाही. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. त्यामुळे त्यांना खाली मान घालावी लागेल असं मी काहीच करणार नाही.
त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मी मोडणार नाही. असे सांगितले. पण रोहनचा चांगला स्वभाव पहाता त्याला आयुष्यभर एक चांगले मित्र मैत्रीण म्हणून नेहमी सोबत राहू याचे वचन दिले.
अशाप्रकारे अनुजाने आई-वडिलांचा तिच्यावर असलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. तिच्यावर असलेला गर्व अबाधित ठेवला.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा