पैज मित्राची प्रेयसी पटवण्याची | Jivan Ek Katha | Marathi Katha

जीवन एक कथा । मराठी कथा 

पैज मित्राची प्रेयसी पटवण्याची


    योगेश शिक्षणात खुप हुशार मुलगा होता. पदवी पर्यन्तचे शिक्षण गावाकडेच झालेले. त्याला अजुन खुप शिकायचे होते. त्यामुळे पुढील उच्च शिक्षनासाठी त्याला मोठ्या शहरात जाउन शिक्षण घेण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने तशी तयारी ही केलेली होती. नविन मोठ्या शहरात सर्व नविन असणार हे त्याला ज्ञात होत.

    कुठल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा याची त्याने निवड केली होती. पण त्यापूर्वी तेथे राहण्याची सोय कोठे व कशी असेल याची चौकशी त्याने सुरु केली. नविन शहरात, सर्वच त्याच्यासाठी अनोळखी होते. नविन महाविद्यालय व त्याच्या वर्गातील सर्व मुले ही अनोळखी असणार होते. 

    वेग-वेगळ्या गावातून शहरातून आलेली सर्व त्यासाठी नविनच असणार. त्यामुळ नेमक कुनासोबत रहावे हे त्याला उमजत नव्हते. त्याला ज्या महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता तेथील प्रवेश प्रक्रीया सुरु झाली होती. पण अजुन तिथे रहायचे कुनासोबत हा त्याचा प्रश्न आणखी मिटला नव्हता.

    योगेश प्रवेश घेण्यासाठी त्या महाविद्यालयात पोहचला. तेथे इतर विद्यार्थी ही आलेले होते. तेवढ्यात योगेश ची नजर एका मुलावर गेली. त्या मुलाला योगेश खुप चांगल्या प्रकारे ओळखत होता. योगेश लागलीच त्याच्या जवळ गेला. तो ही योगेशला ओळखतच होता. योगेश आणि तो वेग-वेगळ्या गावातील होते. पण काही दिवसांपूर्वी ते दोघे एकाच शिकवणी मध्ये शिकत होती. त्यामुळ ते दोघही एकमेकांना खुप चांगल्या प्रकारे ओळखत असे. 


    योगेश ने त्याला विचारले इकडे कस काय येन केले. त्यावर तो बोलला की मी ही प्रवेश घेण्यासाठीच आलो आहे. योगायोग असा की दोघेही एकाच वर्गात प्रवेश घेणार होते. आता योगेश ही थोडा निश्चिंत झाला होता. कुणीतरी ओळखीच इथे राहील. त्या दोघांनीही प्रवेश प्रक्रीया पूर्ण केली. 

    न रहावुन योगेशने त्याला विचारले प्रवेश तर झाला पण इथे राहण्याची व्यवस्था झाली का.? त्यावर तो उत्तरला नाही. अजुन तरी नाही. सोबत कुणाला करावे याचाच शोध घेत होतो. त्याने योगेशला विचारले. योगेश ही त्याच शोधात होता.

    दोघेही रूमच्या शोधात होती. अनोळखी कुनासोबत राहन्यापेक्षा त्या दोघानी सोबत रहायच ठरवल. त्या दोघानी मिळून रूमची शोधाशोध सुरु केली. चांगली राहण्या योग्य अशीच रूम ते शोधत होते. एक चांगली रूम त्यांना मिळाली. घर मालकाला आगाऊ रक्कम देऊन रूम ताब्यात घेतली. 

    योगेश व त्याचा मित्र लगेच गावी परतले व दहा दिवसानंतर गरजेच लागणार सर्व सामान घेउन परत तिथे राहण्यासाठी आलेत. कॉलेज सुरु होण्यासाठी दोन दिवस बाकी होते. आले तो दिवस पूर्ण साफसफाई करण्यात व सामान लावन्यातच गेला. दूसऱ्या दिवशी जेवणासाठी चांगल्या प्रकारची मेस ही लावून घेतली. व आजुबाजुचा परिसर ही निट जानुन घेतला. 

    उद्या सकाळी त्यांच कॉलेज सुरु होणार होते. पहिल्याच दिवशी उशीर नको म्हणून लवकर झोपी गेले. सकाळीस लवकर उठून तयारी केली व कॉलेज ला गेले. आज सर्वांचाच पहिला दिवस असल्याने कॉलेज मध्ये शिक्षकांनी सर्वांची ओळख करून दिली.

    हळूहळू योगेशचे नियमित वर्ग सुरु झाले. त्यासोबतच तो नविन मुलांसोबत ही ओळख करून घेत होता. सर्वच विद्यार्थी नविन व वेगवेगळ्या गवाकड़ील असल्याने सर्व एकमेकांसोबत ओळख करून घेण्यास उत्सुक होते. नविन ठिकाणी नविन कॉलेज मध्ये सर्वानाच नवनविन मित्र बनविण्याची इच्छा होती.

    काही दिवस उलटून गेल्यावर सर्व मूल एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखायला लागली व त्यांच्या मध्ये चांगली मैत्री ही झाली होती. कॉलेज संपल्यावर एकमेकांच्या रूम वर जाने गप्पा मारने, टिंगल टवाळी करणे सुरु झाले. त्यात योगेशचे ही भरपूर मित्र झालेत. 

    तोही इतर मुलांच्या रूमवर जात असे व त्याच्या कड़े ही इतर मूल येत असे. सर्वच तरुण वयातील असल्याने कुणाला प्रेयसी आहे किवा नाही या विषयावर ही त्यांची चर्चा होत असे.एखाद्या सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला जाने. हे त्यांच नियमित चालू होते.

    बघता बघता एक वर्ष सरून गेले. नविन कॉलेज मधे योगेशला खुप चांगले मित्र भेटले होते. त्यांच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा ही उरकल्या होत्या. शेवटच्या पेपरच्या दिवशी सर्वानी एकमेकांची भेट घेतली व सुट्टी नंतर परत केव्हा कॉलेज ला यायचे हे त्यांच्यात ठरले. योगेश ही परीक्षा संपल्यावर सुट्ट्या मध्ये गावाकडे आला. 

    काही दिवसात त्याच्यासोबत रूम मध्ये राहणारा त्याचा मित्र त्याला बोलला की मी आता परत येऊ शकत नाही. त्याच्या परिवारात काहीतरी अडचन असल्याने तो काही दिवस कॉलेज करनार नव्हता. 

    योगेशसोबत रूमवर राहणारा मित्र येणार नव्हता. म्हणजे आता योगेश चांगलाच अडचणीत सापडला. योगेशला एकट्याला त्या रूमवर रहाने परवडनार नव्हते. त्यासमोर आता एकच पर्याय होता एक तर दूसऱ्या कुणाच्या रूमवर रहायला जाने किवा नविन जोड़ीदार बघणे. 

    तस आता योगेश चे भरपूर मित्र झाले होते. व त्यातीलच एक मित्राच्या रूमवर जागा ही शिल्लक होती त्यामुळ आपल्या रूमवर कुनाला बोलवन्यापेक्षा आपणच दूसऱ्या मित्राच्या रूमवर रहायला जाऊ हे योगेशने ठरवले.

    कॉलेजचे दुसरे वर्ष सुरु झाले. ठरल्याप्रमाणे योगेशने रूम बदलली व तो दूसऱ्या मित्राच्या रूमवर रहान्यास गेला. रूम मोठी होती व तेथे त्यांच्याच वर्गातील आणखी तिन चार मुले राहत होती. एकाच वर्गातील चार पाच मूल एका रूम मध्ये राहत होती. त्यांच्या मध्ये खुप चांगली मैत्री झालेली होती. हसी मजाक हे तर त्यांच रोजच ठरलेले होते. एकमेकांची मजाक उडवने. एकमेकांना चिडवने हे नेहमी चालत असे.



    एकमेकांच्या प्रेयसी बद्दल ही ते सर्व सांगत असे. वैयक्तिक आयुष्यातील गोष्टी ही एकमेकांना नि-संकोच पणे सांगत असे. तस योगेशला ही प्रेयसी होती. पण ती त्याच्या गवाकड़ील होती. रोज संध्याकाळी ते दोघ एकमेकांसोबत बोलत असे.

    योगेशच्या रूमवर आणखी एक मुलगा होता. "नितिन" नितीनला ही एक प्रेयसी होती. त्याची प्रेयसी ही त्याच्या जुन्या कॉलेज मधील त्याची वर्ग मैत्रीण होती. नितिन ही रोज न चुकता त्याच्या प्रेयसी सोबत फोनवर बोलत असे. योगेश च्या वर्गातील इतर मुलेही त्यांच्या रूमवर येत असत. 

    एकमेकांच्या प्रेयसीच्या गापा ही ते मारत असे. कुणाची प्रेयसी किती सुंदर कुणाची कशी यावरून एकमेकांची खिल्ली ही उडवत. पण मित्रच असल्याने या गोष्टी सहन कराव्याच लागतात. शेवटी मैत्री हे नातच अस असत. या मध्ये कुठलाच राग नसतो.

    एक दिवस योगेश , नितिन व त्यांचे आणखी दोन मित्र संध्याकाळी गप्पा मारत बसले होते. गप्पा मारता मारता एकमेकांची खिल्ली उडवने सुरु झाले. आणि विशेष म्हणजे त्या दिवशी सर्वानी नितिनलाच चांगल धारेवर धरले होते. सगळे मिळून नितिनची मजा घेत होते. तेवढ्यात नितिनच्या प्रेयसी चा त्याला फोन येत होता. काही केल्या नितिनचे मित्र त्याला फोन घेऊ देत नव्हते. उलट त्याच्या प्रेयसी वरुन त्याला चिडवने चालू केले.

    नितिन चांगलाच चिडला होता पण मित्र असल्याने त्याला त्याचा राग व्यक्त करता येत नव्हता. योगेश, नितिन आणि त्याच्या मित्रांमध्ये नविन विषयावर चर्चा सुरु झाली. ती म्हणजे मुली पटवन्यात कोण किती पटाइत आहे यावर. जो तो आपली हुशारी दाखवत होता. 

    आधीच चिडलेला नितिन गप्प बसून इतर मित्रांच्या गप्पा ऐकत होता. नितिन त्यांना चिडवण्याचा प्रयत्न करत होता. नितिन त्यांना बोलला मुली पटवन एवढ सोप्प नसत उगच एवढ फेकफाकी नका करू. तेवढ्यात एक अवलिया नितिन ला आणखी डीवचण्याचा प्रयत्न करत होता. तो बोलला तू सांग कुठली मुलगी पटवून दाखवू.

    नितीनला त्याच्या प्रेयसिवर खुप भरोसा होता. त्याला माहित होते त्याची प्रेयसी त्याच्यावर खुप प्रेम करते आणि ती आता दुसर कुणाच्या प्रेमात कशी पडेल. क्षणाचा ही विलंब न करता नितिनने सर्वाना चैलेंज केली. एवढेच जर तुम्ही सर्व मुली पटवन्यात माहिर असाल तर माझ्याच प्रेयसी ला पटवून दाखवा. 

    नितिन ला चिडलेले बघून त्याला आणखी चिडवायला सर्वाना मजा येत होती. मजाक चा विषय म्हणून सर्वानी नितिनची चैलेंज स्वीकारली. पण नितिनची प्रेयसी ही त्याच्या जुन्या कॉलेज मधील होती. व ती गावाकडेच रहायची. योगेश आणि त्याचे मित्र कधीच नितिनच्या गावाला गेले नव्हते. किवा नितिनच्या प्रेयसीला कधी बघितले ही नव्हते. मग तिच्याशी संपर्क कसा साधायचा हा प्रश्न पडला. 

    त्यावर त्या सर्वांच ठरल की नितिन कडून तिचा नंबर न घेता तिला फेसबुक वरून संपर्क साधायचा. नितिन यासाठी तयार झाला. त्या सर्वांनी नितिन कडून वचन घेतले. की चैलेंज केली आहे. कुठल्याही प्रकारची चीटिंग करायची नाही. तुझ्या प्रेयसीला अजीबात सांगायच नाही. नितिनने ही त्यांना वचन दिले की मी तिला अजीबात काहीच सांगणार नाही. नितीनला त्याच्या प्रेयसीवर तेवढा विश्वास होताच. 

    ठरल्याप्रमाणे योगेश व त्याच्या इतर दोन मित्रांनी नितिन समोर त्याच्या प्रेयसीला फेसबुक वरुन विनंती पाठवली. रात्रीचे एक वाजले होते. कुठ तरी आता नितिनच्या प्रेयसीला पटवन्याच्या चैलेंज वर त्यांचा दिवस  संपला  होता. सर्व जन झोपी गेले. 

    दूसऱ्या दिवशी सर्व नियमित कॉलेज ला गेले. दिवसभर कॉलेज करून रूमवर परतले. रात्रीच्या गोष्टी मजाक मध्ये सुरु होत्या म्हणून त्याचा जास्त कुणीच विचार करत नव्ह्त. नितिनने दिलेल्या चैलेंजला कुणी जास्त मनावर नव्ह्त घेतल. 

    कॉलेज वरुन आल्यावर योगेश हात पाय धुवून आपल्या जागेवर मोबाइल चाळत बसला होता. तोच त्याने फेसबुक वर बघितले की नितिनच्या प्रेयसीने त्याची विनंती स्वीकारली होती. लागलीच योगेश नितीनला जळवन्या साठी त्याच्या जवळ गेला. व त्याला दाखवले "बघ तुझ्या प्रेयसी ने माझी विनंती स्वीकारली" त्यावर ही नितिन माघे सरकला नाही. 

    तो अजुन त्याच्या चैलेंज वर ठाम होता. नितीनला त्याच्या प्रेयसी वर खुपच जास्त विश्वास होता. नितिन योगेशला बोलला फक्त विनंती स्वीकार केलिये. फेसबुक मित्र म्हणून कुणीही विनंती स्वीकार करू शकत. तू तिला पटवून दाखव मग खर!.

    योगेशच्या मनात तस काही नव्हते. योगेशला आधीच त्याची प्रेयसी होती. त्यामुळ तो दूसऱ्या मुलीचा विचार करत नसे. पण नितिनची चैलेंज पूर्ण करण्यासाठी त्याला पुढे सरकावे लागले. दोन दिवस उलटून गेले नितिन जवळ कुणीच त्या चैलेंज चा विषय घेतला नाही. 

    नितिनला वाटले सर्वानी हार मानली की काय. एक दिवस नितिन ने स्वतःहुन योगेशला व इतर दोघाना विचारले. काय झाल चैलेंज च हार मानली का? त्यावर ते तिघ म्हणाले हार तर मानली नाही. पण तुझ्या प्रेयसीला पटवन हे योग्य वाटत नाही.

    नितिन चैलेंज माघे घेण्यास तयार नव्हता. शेवटी योगेश ही माघे सरकला नाही. त्यानेही नितिनला शब्द दिला आता चैलेंज जिंकुनच राहिल. हळूहळू योगेश तिला संदेश पाठवायला लागला. तीही त्याला चांगल्या प्रकारे प्रतीउत्तर देत असे. योगेश दिसायला देखना होताच शिवाय बोलायला ही पटाइत होता. त्यामुळ त्याला नितिनच्या प्रेयसी सोबत बोलायला जास्त अवघड गेले नाही. 

    त्या दोघां मध्ये रोज बोलन होत असे. योगेशने तिला जरा ही जाणवू दिले नाही की तो नितिनचा मित्र आहे. हळूहळू दोघांची मैत्री घट्ट होत गेली. योगेश आता नितिन ने दिलेली चैलेंज जिंकण्यापासून काही अंतर दूर होता.

    आतापर्यंत जे काही बोलन योगेश आणि नितिनच्या प्रेयसी मध्ये झाल होत. ते सर्व योगेशने नितीनला सांगितले. तरीही नितिन माघे सरकन्यास तयार नव्हता. 

    योगेशही माघे सरकनार नव्हता. त्याने आता नितिनच्या प्रेयसीला त्याची प्रेयसी बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली. नितिनची प्रेयसी योगेशला चांगला प्रतिसाद देत असत. त्यावरून योगेशला एवढच समजले की तिला नितिन मध्ये फारसा रस नाहीये. सोबत आहे म्हणून आहे फक्त एवढच. 

    आता योगेश आणी नितिनची प्रेयसी दोघे अधून मधून फोनवर ही बोलत असे. ही बाब नितीनला माहित झाली. नितिन आता मात्र त्याच्या प्रेयसिवर चांगलाच भडकला आधीच त्याची प्रेयसी मनापासून त्याच्यावर प्रेम करत नव्हती. त्यात असे वाद सुरु झाले. त्यामुळ आता तिच्या मनात नितिनसाठी जरा ही जागा शिल्लक नव्हती. पण तिच्या मध्ये आणि नितिन मध्ये वाद होत आहेत हे योगेशला माहितच झाले नाही.

    काही दिवस निघून गेलेत. एव्हाना नितिन ची प्रेयसी योगेशच्या प्रेमात केव्हाच पडली होती. याची जाणीव योगेशला झाली नव्हती. योगेशला फक्त पैज जिंकायची होती त्यामुळ तो जास्त विचार करत नव्हता. योगेश फक्त त्याच्या जुन्या प्रेयसी वरच प्रेम करत होता.

    आज तो दिवस उगवला. आज योगेश पैज जिंकण्याच उद्दिष्ट मनात ठेउन तिच्याशी बोलत होता. बोलता बोलता योगेशने मुळ मुद्द्यावर हात घातला. योगेशने तिला प्रेमासाठी मागणी घातली. तिनेही क्षणाचा विलंब न करता लागलीच होकार दिला. योगेश ने तिला विचारले की एवढ्या लवकर होकार देऊन पण टाकला. 

    ती बोलली हो. ती बोलली "खर तर मी खुप आधीच तुझ्या प्रेमात पडलीये" पण तू विचारायला खुप वेळ लावला. योगेशला आणखी प्रश्न पडला, एवढ्या लवकर कस की प्रेमात पडली. तिने सांगितले. तू आहेच एवढा देखना. आणि त्यात तुझा स्वभाव ही एवढा छान असताना कुठलीही मुलगी सहजच तुझ्या प्रेमात पडेल!.

    पण तिला योगेशने हे फक्त पैज जिंकण्यासाठी केले हे माहीत नव्हते. योगेशच्या आणि तिच्या प्रेमाला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली. योगेश आता पैज जिंकला होता. त्याने आठ दहा दिवस असेच जाऊ दिले. नंतर नितीनला एकांतात बसवले व सांगितले की तू दिलेली पैज मी जिंकलो आहे. तस त्याने दाखवून दिल. नितिन अनुत्तर राहिला काहीच न बोलता निघून गेला.

    नितिन खुप दुखी झाला. दुःख त्याला पैज हरन्याचे नव्हतेच. दुःख या गोष्टीचे होते जिच्यावर प्रेम केले ती दुसऱ्या सोबत गेली. योगेश सोबत पैज लावणे नितिनला चांगलेच महागात पडले. नितिनला खुप पश्चाताप झाला. पण त्याच्या मनातून ती आता कायमची उतरून गेली होती. 

    तिला आता कुठ तरी तिच्या मनासारखा प्रियकर भेटला होता. ती योगेशवर खुप मनापासून निस्वार्थ प्रेम करू लागली. याची जाणीव योगेशला ही झाली. पण योगेशच त्याच्या पहिल्या प्रेयसीवरच प्रेम होते. काही केल्या तो त्याच्या पहिल्या प्रेयसीला सोडणार नव्हता. 

    नितिनची प्रेयसी आता आणखी जास्त योगेशच्या प्रेमात पडत चालली होती. काही केल्या तिला दूर करायच होत. पण तिला समजवायच कस हे योगेशला समजत नव्हते. कारण जर तिला सत्य सांगीतल की पैज जिंकायची होती म्हणून तुझ्यासोबत प्रेमाच नाटक केल तर ती हे सहन करू शकणार नाही हे तो जाणत होता.

    योगेशला काही उमगत नव्हते एक दिवस त्याने धाडस दाखवले. आणि सर्व प्रकार तिला सांगितला. ती योगेशवर चांगलीच चिडली. योगेश ने तिची माफ़ी ही माघितली. चार पाच दिवस निघून गेले. तिने स्वतःहुन योगेश ला फोन केला व तीच किती प्रेम आहे त्याच्यावर हे सांगितले. 

    ती काही केल्या त्याला सोडायला तयार नव्हती. ती योगेशला सांगू लागली तू पहिल्या प्रेयसीला सोडून दे पण माझ्या सोबतच रहा. योगेश काही केल्या पहिल्या प्रेयसीला सोडू शकणार नव्हता. 

    योगेशने नितिनच्या प्रेयसीला खुप समजवण्याचा प्रयत्न केला. काही केल्या ती ऐकायला तयार नव्हती. योगेशने तिला स्पष्ट सांगितले मी माझ्या प्रेयसीवर खुप प्रेम करतो मी तिला नाही सोडू शकत. त्यावर नितिनची प्रेयसी म्हणाली ठीक आहे तिला नको सोडू. आणि मलाही नको सोडू. तू तिच्यावर जेवढ प्रेम करशील तेवढच माझ्यावर ही करत जा. "ती तुझ्या आयुष्यात असली तरी चालेल पण मला तू हवा आहेस"!.

    ही गोष्ट योगेशच्या प्रेयसीला माहित नव्हती. योगेशच्या मनात भीती होती जर ही गोष्ट आपल्या पहिल्या प्रेयसीला समजली तर तिला हे सहन होणार नाही. तिचा योगेश वर खुप विश्वास होता. योगेशने ठरवले की काही दिवस नितिनच्या प्रेयसी सोबत राहू व नंतर हळूहळू तिला दूर करू!. 

    योगेश एक दोन वेळेस तिला भेटायला ही गेला. जेव्हा नितिनच्या प्रेयसी ने योगेशला समोर बघितले तेव्हा ती आणखी जास्त प्रेमात बुडाली. ती आता योगेश सोबत लग्न करण्याचे स्वप्न बघू लागली. पण योगेश यासाठी तयार नव्हता. योगेश तिला दूर करण्याचा प्रयत्न करत होता. पण ती योगेशच्या प्रेमात एवढी अकांठ बुडाली होती की तिला योगेश काही केल्या हवाच होता. तिचा रोज सकाळी पहिला फोन योगेशला असायचाच. 

    आता काही दिवसात योगेश गावी जाणार होता. आणि सहाजिकच तिकड़ गेल्यावर तो त्याच्या प्रेयसीला भेटणारच होता. तशी कल्पना त्याने नितिनच्या प्रेयसीला दिली. व तिला सांगितले की मी जोपर्यंत तिकडे आहे तोपर्यंत फोन करू नकोस.


    नितिनच्या प्रेयसी साठी हाच तर खरा सुवर्ण क्षण होता. तिला योगेश आणि त्याच्या प्रेयसी मध्ये भांडण लावायचे होते. जेणेकरून योगेश त्याच्या प्रेयसी पासून दूर होइल . आणी त्यानंतर योगेश फक्त तिच्या एकटीचा असेल. योगेश गावी गेला. व लागलीच दूसऱ्या दिवशी त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला. हे नितिनच्या प्रेयसीला आधीच माहित होत.

     तिने त्यादिवशी नेहमी प्रमाने सकाळी योगेशला फोन केला. योगेश त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी निघणार होता. त्याने नितिनच्या प्रेयसीचा फोन घेतला नाही. ती समजुन गेली की योगेश त्याच्या प्रेयसी सोबत असावा म्हणून फोन घेत नाहीये. 

    योगेश त्याच्या प्रेयसीला भेटला . खुप दिवसा नंतर भेटल्याने दोघ एका निवांत ठिकाणी गप्पा मारत बसले. थोडा वेळात नितिनच्या प्रेयसीचा योगेशला परत फोन आला. त्याने बघून कट केला व मोबाइल बाजूला ठेउन दिला. तीने परत फोन केला. याने तोही घेतला नाही. 

    योगेशच्या प्रेयसीने न राहून विचारले कुणाचा कॉल येतोय आणी तू घेत का नाहीये. योगेशने सांगितले मित्र आहे असाच बोर करतोय. नितिनच्या प्रेयसीच कॉल करन काही थांबत नव्हते. योगेशच्या प्रेयसीला कुठे तरी शंका येत होती. 

    शेवटी तिने योगेश कडून मोबाइल मागीतला. योगेश मोबाइल देत नव्हता. आता तर त्याच्या प्रेयसीची शंका आणखीनच वाढली. तिने जबरदस्ती मोबइल हिसकावून घेतला. नितिनच्या प्रेयसीच कॉल करन काही थांबल नव्ह्त. आता योगेशला चांगलाच घाम फुटला. 

    नितिनच्या प्रेयसीचा कॉल आला. योगेशच्या प्रेयसीने तो घेतला व कानाला लावला. तिकडून मुलीचा आवाज ऐकला. व तिच्या डोळ्यात पाणी आले. योगेशने तिला फसवले हा तिचा समज झाला होता. आता तिने त्याचा मोबाइल तपासायला सुरुवात केली. 

    त्यात तिला एक मेसेज ही दिसला ज्यात नितिनच्या प्रेयसीने प्रेमाचा उल्लेख केलेला होता. योगेशच्या प्रेयसीचा संशय खरा ठरला. ती खुप रडली. योगेशने तिला घडला प्रकार सगळा सांगीतला पण ती काही केल्या ऐकायला तयार नव्हती. ती रागात निघून गेली. तिच्या मनात खुप राग होता. दोन दिवस थांबुन योगेश पुन्हा कॉलेज साठी निघून गेला. 

    तो फोनवर त्याच्या प्रेयसीला खुप समजवत असे पण आता ती काहीच ऐकण्याचा स्थितीत नव्हती. त्यानंतर त्याचे आणी नितिनच्या प्रेयसीचे ही जोरदार भांडण झाले. नितिनच्या प्रेयसीने योगेशच्या प्रेयसीला समजावून सांगण्याची हमी घेतली. 

    त्या दोघी एकमेकींना फोनवर बोलल्या. त्यांच्यात काय संवाद झाला हे योगेशला काहीच माहित नाही झाले. पण तेव्हा पासून त्याची प्रेयसी त्याचे फोन ही घेत नसे. व त्यानंतर त्याच्या प्रेयसीने तिचा चेहरा ही त्याला कधी दाखवला नाही. त्या दोघीं मध्ये काय बोलन झाले हे जानुन घेण्याचा त्याने खुप प्रयत्न केला. पण त्याला त्यातल काहीच माहित झाले नाही. 

    योगेशला दाट संशय आला की नितिनच्या प्रेयसीने उलटच काही तरी सांगितले असावे. तेव्हा पासून त्याने नितिनच्या प्रेयसी सोबत ही बोलन बंद केले. नितिनच्या प्रेयसीने खुप वेळा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण आता योगेश तिचा कॉल अजीबात घेत नव्हता.

    एक पैज जिंकण्याच्या नादात त्याने त्याची प्रेयसी गमवली होती. व त्याच्या मित्रानेही आती आत्मविश्वास दाखवत त्याची ही प्रेयसी त्याने गमावली.

    "त्यामुळ मित्रांनो कुठल्या गोष्टीची पैज लावायची व कुठल्या गोष्टीची पैज स्विकारायची याचा नक्की चांगला विचार करावा. मगच पैज लावावी".


Jivan Ek Katha हा Marathi Katha blog आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना नक्की share करा .

 धन्यवाद


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेम आणि मैत्री | Jivan Ek Katha | Marathi Katha

"ती" एक सन्मान | Jivan Ek Katha | Marathi Katha

प्रेम भंग | Jivan Ek Katha | Marathi Katha