अयशस्वी तो यशस्वी झाला | Jivan Ek Katha | Marathi Katha

जीवन एक कथा । मराठी कथा 

अयशस्वी तो यशस्वी झाला


     दिनेश अभ्यासात थोडा कच्चाच होता. अभ्यास करायच म्हटल की त्याच्या जीवावर यायच. लहानपना पासून तो असाच होता. अभ्यास करत नव्हता म्हणून मार ही खुप खात असे. यंदा त्याच दहावीच वर्ष होत.

    अभ्यासात कच्चा असल्याने दिनेशला शिकवणी लावण्यात आली. पण तीही त्याने जेमतेम पाच ते सहा महिनेच केली व अर्ध्यातच सोडून दिली. दहावीच वर्ष असल्याने घरचेही खुप चिंतेत होते. पण या गोष्टीच दिनेशला जराही गांभीर्य नव्हते. शाळेत ही तो नियमित जात नसे दोन तिन दिवस झाले की सुट्टी मारत असे. शाळेतील गृहपाठ ही अपूर्ण असायचा. शाळेतही खुप मार खात असे पण त्याला थोडाही फरक पडत नव्हता. 

    बघता बघता दहावीची परीक्षा जवळ आली अजूनही दिनेश त्याकडे गंभीर्याने बघत नव्हता. तो आपल्या वेगळ्याच धुंदीत असायचा. घरातील सर्व त्याला सांगुन सांगुन वैतागले होते. त्याच्याकडून जास्त अपेक्षाही नव्हती . कमीत कमी दहावी उत्तीर्ण झाला पाहिजे एवढीच अपेक्षा होती. परीक्षा थोड्याच दिवसांवर येउन पोहचली. 

    आता तो मित्रांसोबत आभ्यास करायला लागला. पण आभ्यास करायची सवय नसल्याने त्याच अजीबात मन लागत नसे. काय वाचतोय हेच त्याला समजत नसे. दहावीचे पेपर दोन दिवसांवर आले. त्याचा आभ्यास काहीच झाला नव्हता.

     दिनेश आता थोडा बेचैन झाला होता. काय कराव त्याला काहीच उमगत नव्हते. शेवटी त्याने शेवटचा पर्याय म्हणून परीक्षेत कॉपी करण्याचे ठरवले. आता त्याने पूर्ण लक्ष कॉपी कशी करायची यात घालवले. कॉपी व्यवस्थित लपवून ठेवता येइल यासाठी एक चप्पल बनवून घेतली. कुणाच्याही लक्षात येणार नाही अस त्या चपलेमधे कॉपी लपवायला जागा होती.

    दिनेशचा पहिला पेपर होता. कॉपी करण्याची पूर्ण तयारी त्याने करून ठेवली होती. इतर मूल अभ्यास करत होती पण हा कॉपी करण्याची तयारी करत होता. पेपरचा दिवस उजाडला. दिनेश पूर्ण कॉपीच्या भरवश्यावर होता. दिनेश पेपर च्या एक तास अगोदरच परीक्षा केंद्रावर पोहचला. सर्व मुलांची तपासणी सुरु होती. ज्या मुलांकडे कॉपी होती त्यांची कॉपी काढून घेण्यात आली. दिनेशला ही तपासन्यात आले पण त्याने चप्पलेमधे कॉपी लपवलेली होती. त्यामुळ तो सापडला नाही. 

    दिनेश परीक्षा हॉल मध्ये गेला व त्याच्या जागेवर जाऊन बसला. पहिलाच पेपर असल्याने त्याच्या मनात खुप भीती होती. यापूर्वी कधीच त्याने कॉपी केलेली नव्हती. नविन शाळेत परीक्षा असल्याने तो थोडा बिथरला होता. त्याच्याकड कॉपी करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

    वर्गातील शिक्षक पेपर वाटप करत होते. दिनेशला ही त्याचा पेपर भेटला. त्याने सर्व पेपर बघून घेतला. त्याने अभ्यासच केलेला नसल्याने त्याला काहीच येत नव्हते. आता तो कॉपी बाहेर काढण्याच्या तयारीत होता. त्याने निट बघून घेतले की वर्गातील शिक्षक काय करताय. त्यांची नजर चुकवून त्याने कॉपी बाहेर काढली. घाबरत घाबरत तो पेपर मधील कुठला प्रश्न कॉपी मध्ये आहे ते बघू लागला. फारसा अनुभव नसल्याने त्याचा खुप वेळ वाया जाऊ लागला. 

    जो प्रश्न सापडला त्याच उत्तर चोरून चोरून लिहिण्यात ही वेळ जात असे. तेव्हा त्याला समजले की यापेक्षा अभ्यास केला असता तर बरे झाले असते. पण आता पूर्ण वेळ निघून गेली होती. पश्चाताप करण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. कसाबसा त्याने कॉपी करून पेपर लिहिला. पण त्याचा वेळ खुप वाया गेला होता त्यामुळ पूर्ण पेपर ही नीट लिहिलेला नव्हता. 

    आज दिनेश नाराज झाला होता. त्याला आभ्यासच महत्त्व समजले होते. अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही याची त्याला जाणीव झाली. पण एक दिवस आड़ लागोपाठ पेपर असल्याने त्याचा अभ्यास होणार नव्हता. त्याने शक्य तेवढा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या डोक्यात काही जात नव्हते. दूसरा पेपर आला. जो थोडा आभ्यास झाला होता ते निट आठवत नव्हते. कस तरी आठवून दोन चार मार्कचा पेपर मनाने लिहिला. बाकीचा पेपर कॉपी करुनच लिहिला. अस करत करत एका माघुन एक पेपर येत गेले. सर्व पेपरचा थोडा थोडा अभ्यास व बाकी पेपर कॉपी करून लिहिले. 

    दिनेशचे सर्व पेपर संपले होते. तो दहावी उत्तीर्ण होईल अशी अपेक्षा उराशी बाळगुण होता. निकाल लागेपर्यंत दोन तिन महीने वेळ होता. तो मस्त निश्चिन्त होता. सुट्ट्या मध्ये गावाकडे गेला. खुप दिवसानी गावाकडे गेला होता तिकडे खुप मज्जा ही केली. दहावीचा निकाल काय लागल याचा विचार ही तो करत नसे. 

    गावाकडे मज्जा करून तो घरी परतला. थोड्याच दिवसात दहावीचा निकाल ही लागणार होता. मित्रांमध्ये गेल्यावर सर्वांची कुणाचा निकाल काय लागेल याची चर्चा होत असे . कुणी म्हणायच मला ७० टक्के मीळतिल तर कुणी ६० म्हणायच. दिनेशला साधा त्याचा अंदाज ही लावता येत नव्हता. 

    निकालाचा दिवस उजाडला. सर्वजण निकाल काय लागेल या चिंतेत होते. पण दिनेशला कुठलीच चिंता नव्हती. दुपार झाली जो तो आपला निकाल बघण्यासाठी जाऊ लागला. दिनेश ही त्याचा निकाल बघायला गेला. 

    दिनेशचा निकाल त्याच्या हातात पडला. आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच घडले. दिनेश तिन विषयात नापास झाला. दिनेश खुप नाराज झाला. कारण त्याचे सर्व मित्र उत्तीर्ण झाले होते. शिक्षणात दिनेश एकटाच माघे राहिला. त्याचे सर्व मित्र आता कॉलेज मधे जाणार. आणि दिनेश कॉलेजच्या आयुष्याला मुकनार होता. दिनेशला या गोष्टीचा खुप पश्चताप झाला. 

    त्याला अभ्यास करण्याच महत्त्व समजल होत. घरातील सर्व लोक नाराज होती. दिनेशला त्याची घोडचूक चांगलीच लक्षात आली. आता त्याने प्रमाणिक पणे अभ्यास करण्याचे ठरवले व पुन्हा राहिलेले दहावीचे पेपर द्यायचे ठरवले.

    दहावीची पुनः परीक्षा ही सहा महिन्यात होत असे. त्याने पुनः परीक्षेचा फॉर्म ही भरला. दिनेश आता जोमाने अभ्यास करायला लागला. त्याने राहिलेल्या तिन विषयांची शिकवणी ही लावली. पण त्याला समजण्यास थोड़ी अडचन येत होती. कधीही अभ्यास करत नसल्याने त्याला थोड अवघडच जात होत. त्याने हार नाही मानली तो अभ्यास करत राहिला. त्याचे सर्व मित्र कॉलेज मध्ये गेलेत आणि हा मागेच राहिला याची त्याला कुठे तरी खंत वाटत होती. 

    बघता बघता दहावीची पुनःपरीक्षा जवळ आली. दिनेश आता चांगली मेहनत घेत होता. यावेळी कॉपी च्या भरवश्यावर न राहण्याचा विचार करून तो अभ्यास करू लागला. दहावीचे पेपर सुरु झालेत. तो पूर्ण आभ्यास करून पेपर देत होता. एक एक करून तिन्ही पेपर झालेत. यावेळी एकही पेपरला कॉपी केली नाही. निकाल लागायला एक महिन्याचा आवकाश होता. तो निकाल लागण्याची आतुरतेने वाट बघत होता. यावेळी तो कुठेच गेला नाही. दहावी नापास झाल्याने त्याला अपमानित वाटत होते.

    आज त्याचा निकाल होता. सकाळ पासून तो थोडा नाराज होता. निकाल कय लागणार याच विचारात होता. शाळेत गेला निकाल हातात घेतला. यावेळी ही तो परत सर्व तिन्ही विषयात नापास झाला. सहाजिकच आहे एवढा आभ्यास करुनही परत नापास झाल्यावर तो खुप नाराज झाला. पण पूर्वी पेक्षा मार्क्स वाढलेले होते. त्याने मागचा व यावेळीचा निकाल चांगला बघितला. एकही कॉपी न करता स्वतःच्या हिम्मतीवर त्याने पूर्वी पेक्षा चांगले मार्क मीळवले होते. 

    त्याने जरा ही हार न मानता सकारात्मक विचार केला. जर आणखी चांगला आभ्यास केला तर आपण नक्की पास होऊ ही आशा मनाशी बाळगली. व पुन्हा दहावीचा फॉर्म भरला. आणि यावेळी पुर्विपेक्षा आणखी जोमाने आभ्यास करण्यास सुरुवात केलि. 

    पूर्वी सर्व आभ्यास व्यवस्थित केल्याने यावेळी त्याला सर्व व्यवस्थित समजत होते. त्याने अभ्यास नियोजन बद्ध केला होता. यामुळ त्याचा आत्मविश्वास ही वाढत होता. पुढची परीक्षाही जवळ आली. त्याने सर्व आभ्यास चांगला केलेला असल्याने यावेळी पास होण्याची अपेक्षा होती. त्याची परीक्षा सुरु झाली. यावेळी ही एकही कॉपी न करता पेपर दिलेत. सर्व पेपर चांगले गेल्यामुळे तो खुप समाधानी होता. 

    तो आता निकालाची वाट बघू लागला. चांगला आभ्यास करून पेपर दिले होते. सकारात्मक निकाल लागेल हीच अपेक्षा त्याला होती. आज त्याचा तीसऱ्या वेळचा निकाल होता. तो शाळेत निकाल घेण्यासाठी गेला. निकाल घेतला. पण निकाल अपेक्षेप्रमाणे समाधानकारक नव्हता. यावेळी तो दोन विषयांत पास झाला होता व एक विषय अवघ्या पाच मार्कानी राहून गेला. 


    कधीही आभ्यास न करण्याची सवय त्याला चांगलीच नडत होती. पण त्याने जनु जिद्द उराशी बाळगली होती. दोन विषयात पास झालो. राहिलेला एक विषयही निघेल हेच त्याने ठरवले. व परत त्या एका विषयासाठी फॉर्म भरला. त्यासाठी त्याने परत शिकवणी लावली. 

    एकच विषय असल्याने दिवस रात्र त्याचाच अभ्यास करत होता. ही पेपर देण्याची त्याची चौथी वेळ होती. आभ्यासात पूर्ण शून्य असलेला दिनेश बऱ्यापैकी सुधरत होता. थोड़ी थोड़ी अभ्यासातली प्रगती पाहता त्याचा आत्मविश्वास वाढत राहिला. 

    त्याने यावेळी पेपर दिला पन यावेळी तो अवघ्या एका मर्काने राहून गेला. यावेळी खुपच नाराज झालेला दिनेश काय करव काही सुचत नव्ह्त. घरातील लोक ही आता त्याला वैतागले होते. 

    निकाल लागल्यावर पाच सहा दिवस असेच विचार करण्यात गेले. नेमक आपण कुठे चुकतोय याचा तो शोध घेत होता. तसा त्याने यावेळी ही फॉर्म भरलाच होता. दिनेशचे दोन वर्ष वाया गेले होते. पण त्याने दहावी पास होण्याचा हट्ट काही सोडला नाही. 

    आधीच दोन वर्ष वाया गेलेत. त्यात दहावी नापास मुलाला कोण चांगली नोकरी देणार हे घरच्याना ज्ञात होते. दोन वर्ष एवढे प्रयत्न करुनही दिनेश काही दाहावी सुटत नव्हता. दिनेशला कुठ चांगली नोकरी लागणार नाही म्हणून  गावाकडे शेती असल्याने त्याला आता गावाकडे पाठवण्यात आले. 

    दिनेश खुप दुखी होता. कारण त्याचे सर्व मित्र कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेत होते व दिनेश शेती करत होता. पण त्याने आभ्यास करायचे सोडले नाही. त्याला आभ्यास करण्याची चांगली सवय ही झाली होती. काहीही केले तरी यंदा दहावी पास व्हायचेच अस त्याने ठरवले. कारण यावेळी जर आपण पुन्हा नापास झालो तर आपल्याला फॉर्म भरू देणार नाहीत. आणि आयुष्य भर शेतीच करावी लागेल हे त्याला कळून चुकले होते. त्यामुळ तो खुप आभ्यास करू लागला. 

    परिक्षेच्या आठ दिवस पहिले तो घरी परतला. यावेळी माघील सर्व चूका लक्षात घेउन आभ्यास केलेला होता. त्यामुळ पेपर ही खुप छान लिहिला होता. पेपर संपल्यावर लागलीच दुसऱ्याच दिवशी गावी शेती करण्यासाठी परतला. निकाल लागायला वेळ होता. सर्व गोष्टी मनापासून करायची सवय लागल्यामुळे शेती मध्येही त्याने चांगले उत्त्पन्न काढले होते. 

    थोड्याच दिवसात दिनेशचा निकाल लागणार होता. पण फक्त निकाल बघण्यासाठी घरी जाने त्याला जमणार नव्हते. यावेळी फोन करुनच मित्राला निकाल बघायला सांगीतले. दहावी पास होण्याची जिद्द उराशी बाळगणाऱ्या दिनेशला यंदा यश प्राप्त झाले होते. शिवाय त्याला खुप चांगले मार्क ही मिळाले होते. दिनेशला त्याच्या मेहनतीच फळ भेटले होते. आणि आभ्यास कसा करायचा हे त्याच्या चांगलेच लक्षात आले होते. 

    दिनेश आता इथेच थांबणार नव्हता. त्याला खुप मोठ्ठ काहीतरी होउन दाखवायचे होते. पण त्याच्या घरच्याना त्याच्यावर अजीबात विशवास नव्हता. तो आकराविला प्रवेश घेण्यासाठी घरी येण्याचे सांगत होता. पण आधीच दहावी साठी एवढे वर्ष वाया घातले. कसाबसा दहावी पास झाला तो काय बारावी पास होइल आसा सर्वांचा समज होता. 

    आकरावी व बारावी गावाकडच कर अस त्याला सुचवण्यात आले. जर बारावी पहिल्या प्रयत्नात चांगला पास झाला तरच पुढील शिक्षनासाठी तुला इकडे बोलवू अस घरच्यानी सुचवले. तस अधून मधून तो घराकडे जात असे. ठरल्याप्रमाणे दिनेशने गावाकडच आकराविला कला क्षेत्रात प्रवेश घेतला. शेती करत करत कॉलेज करत असे. आता जे माघे घडले ते पुन्हा होऊ द्यायचे नाही म्हणून दिनेश नियमित कॉलेजला जात असे व नियमीत आभ्यास ही करत असे. 

    दिनेशच आकरावीच वर्ष निघून गेले. बारावीच वर्ष सुरु झाले. सुरुवातिपासुनच तो अभ्यासाला लागला होता. कुठेही कमी पडायचे नाही त्याने ठरवले होते. कॉलेज मध्ये जे शिकवत ते मन लाउन शिकत असे. नविन कॉलेज मध्ये दिनेशचे भरपूर मित्र मैत्रिणी ही झाल्या होत्या. दिनेश कॉलेजला नियमित जात असल्याने सर्व मूल त्याला चांगल ओळखत होते. 


    दिनेशचा आभ्यास जोरात चालू होता. रात्री उशिरापर्यंत आभ्यास करत असे. व सकाळी लवकर उठून परत अभ्यास करत असे. आणी दिवसभर कॉलेज आणी शेती करायचा. यावेळी आभ्यासात कुठलीही दिरंगाई तो करत नसे. 

    बारावी पहिल्याच प्रयत्नात चांगले मार्क घेउन उत्तीर्ण होण्याचा जनु चंगच त्याने बांधला होता. तेवढी तो मेहनत ही तो घेत असे. ज्या चूका दहावीला झाल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये त्याच प्रकारे तो अभ्यास करायचा. प्रश्न कसे येऊ शकता , त्याचे उत्तर कसे लिहावे याचा सर्व सराव तो नियमित करत असे. 

    बाराविचे पेपर जवळ आले होते दिनेश आणखी चांगला सराव करू लागला. दिवस रात्र फक्त अभ्यास करायचा. काही केल्या त्याला पहिल्या प्रयत्नात बारावी उत्तीर्ण व्हायचे होते.  दिनेश चे बाराविचे पेपर सुरु झाले. कॉपी न करण्याचा निश्चय त्याने आधीच केला होता. परीक्षेला जाईपर्यंत तो अभ्यास करत बसायचा. दिनेश पेपरला पूर्ण आभ्यास करुनच गेला होता. 

    परीक्षेला वर्गात बसल्यावर तेथे त्याचे इतर मित्र ही असत. त्यातील काही कॉपी ही करत असे. दिनेशची सर्वांसोबत चांगली मैत्री असल्याने त्याला त्याचे मित्र विचारत कुठली कॉपी पाहिजे तर सांग. आयुष्यात कधीच कॉपी न करण्याचा दृढ़ निश्चय त्याने केला होता. त्याला कुणी कॉपी साठी विचारना केल्यास तो सरळ नकार देत असे. आणी तसाही दिनेशचा पूर्ण आभ्यास झालेला होताच.

    एक एक करून सर्व पेपर त्याने प्रमाणिक पणे सोडवले. आता त्याचे सर्व पेपर संपले होते. तो उत्तीर्ण होइल याचा त्याला पूर्ण आत्मविश्वास होता. उन्हाळा असल्याने शेतात ही काहीच पीक नव्हते. त्यामुळ तो पेपर संपल्यावर घरी गेला. आणि आता शेती करायला यायचे नाही. बारावी पास होउन पुढील उच्च शिक्षण हे चांगल्या कॉलेज मधून पूर्ण करायचे त्याने ठरवले.

    आता दिनेश चांगला आभ्यासु झाला होता. त्याला मित्रांमध्ये ही जाण्याची लाज वाटत नसे. बारावी नंतर काय करावे. कुठल शिक्षण घ्यावे याची तो चौकशी करत असे. एव्हाना त्याचा निकाल लागलेला नव्हता पण तो पास होणारच हा विशवास त्याला होता.

    त्यात त्याला एका मित्राने सुचवले बारावी नंतर तू संगणक क्षेत्रात पदवी घेऊ शकतो. त्याची दिनेशने सर्वत्र चौकशी केली. त्यासाठी प्रवेश घेन्यापुर्वी एक परीक्षा द्यावी लागणार होती. दिनेशने ठरवले होते की पुढील शिक्षण संगणक क्षेत्रातच घ्यायचे. त्याने पूर्व परिक्षेची तयारी चालू केली. 

    आभ्यास करण्याची चांगली सवय झाली असल्याने तो चांगला आभ्यास करू लागला. त्याला त्याच्या घरच्यानी सुचवल की बाबा आधीच तू दहावी मध्ये नापास झाला होता. बारावी पास होशील का नाही सांगता येत नाही. त्यात तुला संगणक क्षेत्रात जायचय तिथे तर पूर्ण अभ्यास हा इंग्रजी आणि गणित मध्येच आहे तुझ्याकडून एवढ झेपेल का?. त्यावर दिनेश ने सांगितले मी लागेल तेवढी मेहनत करेल पण पुढील शिक्षण हे चांगलच घेइल. 

    दिनेशची जिद्द पाहता त्याला संगणक क्षेत्रात प्रवेश घेउन देण्यास त्याचे घरचे ही तयार झाले. दिनेशचा बारावीचा निकाल होता त्यासाठी तो गावी गेला. निकाल घेतला दिनेशची मेहनत पराकाष्टा कामात आली होती. त्याला त्याच्या मेह्नतिचे फळ भेटले होते. दिनेश चांगल्या मार्काने बारावी पास झाला.

    घरात सर्व आनंदी झाले. एक आळशी मुलगा जो कधीही अभ्यास करत नसे. तो आज पहिल्या प्रयत्नात बारावी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाला. त्याने लागलीच कॉलेज मधून पुढील शिक्षनासाठी लागणारे सर्व कागदपत्रे काढून घेतली. व परत घरी आला. 

    आता दिनेश माघे सरकनार नव्हता. मोठ काहीतरी होउन दाखवायचे हीच जिद्द उराशी बाळगली होती. घरी आल्यावर संगणक क्षेत्रात पदवी घेण्यासाठी सर्वोत्तम कॉलेज शोधू लागला. त्यासोबत तो पूर्व परिक्षेची चांगलीच तयारी करत होता.

    कुठल्या कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा तेहि निवडले. घरून जाने येने सोयीस्कर पडेल व शिक्षण ही उच्च प्रतीचे मिळेल असच कॉलेज त्याने निवडले होते. आता दिनेशला पूर्व परीक्षा द्यायची होती. पूर्व परीक्षेचा अभ्यास ही चांगला झालेला होता. 

     दिनेशने पूर्व परीक्षा दिली पुर्वीच खुप छान अभ्यास झाला असल्यामुळे त्यात त्याला अवघड अस काही वाटले नाही. तो आता निकाल लागण्याची वाट बघत होता. निकाल लागायला कमीत कमी पंधरा ते विस दिवस लागणार होते. तोपर्यंत तो मित्रांसोबत बाहेर फिरायला गेला व खुप मज्जा ही केली. 

    आज त्याचा पूर्व परीक्षेचा निकाल लागणार होता. तो निकाल बघायला जाण्याची तयारी करत होता. सोबत एक मित्र ही घेतला होता. तितक्यात त्याला ज्या कॉलेज ला प्रवेश घ्यायचा होता त्याच कॉलेज मधून फोन आला नंबर अनोळखी होता. त्याने फोन घेतला. त्यावर समोरून जे ऐकले ते ऐकून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. 

    "त्याला सांगण्यात आले की संगणक क्षेत्रात पदवी साठी तुझा नंबर लागलेला आहे आणि विशेष बाब म्हणजे त्याचा सर्व विद्यार्थ्यां मधून चौथा नंबर आला होता." चार वेळा दहावीचे पेपर देणार दिनेश आता खुप हुशार झाला होता. यश जनु त्याच्या उम्बरठयावरच येउन बसले होते. एवढा आनंद दिनेशला कधीच झाला नव्हता. 

    त्याला एक गोष्ट चांगल्या प्रकारे समजली होती. की मन लाउन चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर यश नक्की आपलच असत. 


    त्याने संगणक क्षेत्रात पदवी साठी प्रवेश घेतला. तिन वर्षाचा अभ्यासक्रम होता. प्रत्येक सहा महिन्यात परीक्षा असत अशा एकून सहा परीक्षा द्यायच्या होत्या. दिनेशला अभ्यास करण्याची चांगली सवय झाली होती. अभ्यास कसा करावा हे ही त्याला चांगले ज्ञात होते.

    दिनेशचे नाव आता हुशार मुलांमध्ये गनले जाऊ लागले. कुणालाही वाटत नसे की हा मुलगा दहावी मध्ये नापास झालेला असेल. त्याची जिद्द त्याच्या कामात येत होती. चांगले शिकून मोठ्ठ काही तरी होन्याच त्याच स्वप्न होत. व त्या स्वप्नाचा तो चांगल्या रित्या पाठलाग करत होता. त्याची आताची अभ्यासू वृत्ती बघून सर्व त्याला नावाजत होती. नातेवाईक ही त्याची चांगली प्रशंसा करू लागली. 

    दिनेश नियमित कॉलेज आणि अभ्यास करत असे. सर्व विषय त्यासाठी नविनच होते. त्यानी सर्व विषय नित समजुन घेतले. व नियमित अभ्यास आणि सराव करत असे . दिनेशची पहिली परीक्षा सुरु झाली. पूर्ण अभ्यास करुनच ठेवला होता त्यामुळ त्याला अवघड असे काहीच वाटत नव्हते. परीक्षा खुप सोप्पी गेली.

    दिनेश पहिली परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. यश पदरात पाडून घेण्याची जनु त्याला सवयच झाली होती. आता हार मानायची नाही व परत माघे फिरून बघायचे नाही हेच त्याने ठरवले होते. एक एक करून सर्व तिन वर्षाच्या परीक्षा तो देत गेला व सर्व परिक्षे मध्ये तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.

    तो इथेच थांबला नाही. त्याने पुढे आणखी शिकण्याचे ठरवले. पुढील शिक्षनासाठी त्याला पुण्याला जायचे होते. त्यासाठी ही पूर्व परीक्षा होती. ती परीक्षा ही त्याने दिली. विशेष म्हणजे या परीक्षेत दिनेशचा महाराष्ट्रातुन सातवा क्रमांक आला होता. त्याने पुढील शिक्षण पुण्यातील चांगल्या कॉलेज मधून सुरु केले. तेथेही तो सर्व परीक्षा प्रथम श्रेणीतुन उत्तीर्ण होऊ लागला. दिनेशचे शिक्षण संपले होते. तो चांगल्या नोकरीचा शोधू घेऊ लागला. 

    आज पुण्यातील नामांकित कंपनी मध्ये सॉफ्टवेयर इंजिनियर या पदावर कार्यरत आहे. त्याला तेथे पगार ही खुप चांगला मीळत आहे.

एकेकाळी अपयशी दिनेश आज चांगल्या हुद्यावर काम करत होता. त्याने जर जिद्द व चिकाटी उराशी बाळगली नसती तर आज त्याला शेती करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

    "यावरून एकच समजते तुम्ही आयुष्यात कितीही अपयशी असुद्या. पण एक वेळेस तुम्ही कुठली जिद्द मनाशी बाळगली . व ती पुर्न्त्वाला नेण्यासाठी खुप मेहनत केलि तर यश नक्की तुमचेच आहे. यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही".    


Jivan Ek Katha हा Marathi Katha blog आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना नक्की share करा .

 धन्यवाद


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेम आणि मैत्री | Jivan Ek Katha | Marathi Katha

"ती" एक सन्मान | Jivan Ek Katha | Marathi Katha

प्रेम भंग | Jivan Ek Katha | Marathi Katha