गैरसमज | Jivan Ek Katha | Marathi Katha

जीवन एक कथा । मराठी कथा

गैरसमज


    जान्हवी महाविद्यालयात पदवीच शिक्षण घेत होती. तिथे तिला दोन चांगल्या मैत्रिणी ही भेटल्या. तस जान्हवी फार हुशार नव्हती. तिच्या मैत्रिणीही अभ्यासात बऱ्यापैकिच होत्या. तस बघीतले तर अभ्यासात त्यांना जास्त रुची नव्हती. फक्त परीक्षा पास होइल त्यासाठी लागेल तेवढाच अभ्यास करायचा. 

    महाविद्यालयात असल्यावर ही अभ्यासात त्यांच जास्त लक्ष नसे. बाकी महाविद्यालयीन आयुष्यात मौज मजा करणे एवढाच त्यांचा उद्देश होता. तशा तिघी खुप जिवलग मैत्रिणी होत्या. कुठेही जायच असल तरी त्या नेहमी सोबत असायच्या. महाविद्यालयात ही अगदी तसच. एकीनी सुट्टी मारली की बाकी दोघी ही सुट्टी मारत. आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या सर्व गोष्टी एकमेकींना सांगत असे. 

    महाविद्यालयात त्यांच्या इतर ही मैत्रिणी झाल्या होत्या पण बाकीच्या जास्त वेळ सोबत राहत नसे. तिन-चार महीने निघून गेले. आता हळूहळू मुलांसोबत ही त्या मैत्री करू लागल्या. त्यांना तो प्रत्येक क्षण जगायचा होता जो महाविद्यालयीन आयुष्यात जगायचा असतो. काही मुलांसोबत त्यांची चांगल्या प्रकारे मैत्री ही झाली. कधी काळी त्या तिघी मुलांसोबत ही बाहेर फिरन्यास जाऊ लागल्या. त्यांच आयुष्य त्या मनसोक्त पणे जगत होत्या. त्या मुलांसोबत ही आता त्यांची घट्ट मैत्री झाली होती.


    जान्हवीला मुलांसोबत मैत्री मधे जास्त रस नव्हता. ती मुलांसोबत मोजकच बोलत असे. जान्हवीच्या दोघी मैत्रिणी अतीउत्साही होत्या. त्या बिनधास्त पणे मुलांसोबत राहत होत्या. जान्हवी मुलांना जास्त वेळ देत नसे. पण त्या दोघी मैत्रिणी मुळे तिलाही त्या मुलांसोबत मैत्री ठेवावी लागली. ज्या मुलांसोबत त्यांची मैत्री झालेली होती ती मुले अती उनाड होती. आणी जान्हवीला उनाड मुले अजीबात आवडत नसे. पण मैत्रिणींमुळे तिचा नाईलाज होता. तस जर कधी जान्हवीला कुठली गरज पडली तर ती मुले नेहमी तयार असायची. 

    काही दिवसांनी जान्हवी तिच्या मैत्रिणी व मित्र महाविद्यालयात कमी व बाहेर जास्त फिरत असे. कधी पिक्चर बघायला तर कधी होटेल मध्ये पार्टी करण्यासाठी. त्यांच्यामधील कुणाचाही वाढदिवस असला तरी तो जोरात साजरा होत असे. जशा त्या तिघी जिवलग मैत्रिणी होत्या तसच मुले ही त्यांची जिवलग मित्र झाली होती. एकमेकांच्या सुख दुखात नेहमी सहभागी होत असत.

    हळूहळू जान्हवीच्या अतीउत्साही दोघी मैत्रिणींनी प्रेमात पडायच ठरवल. तस त्यानी जान्हवीला ही सांगीतल. महाविद्यालयात आलो आणी अजुन कुणावरच प्रेम नाही किंवा कुणी प्रियकर ही नाही ही बाब कुठ तरी कमी असल्यासारखी वाटली. पण जान्हवी सध्या कुणावर ही प्रेम करण्यास तयार नव्हती. तिला या भानगडीत पडायचेच नव्हते. तिने तिच्या मैत्रिणींना सांगितले माझा सध्या असा कुठलाही विचार नाही. 

    जान्हवीच्या मैत्रिणींना प्रियकर हवा होता. त्या दोघी प्रेमाच्या वाटेवर निघन्यास तयार झाल्या. इतर कुणाच्या प्रेमात पडन्यापेक्षा ज्या मुलांसोबत मैत्री आहे तेच मूल प्रियकर म्हणून स्विकारावे असे त्यांनी ठरवले. तस त्यांना कुणावर ही मनापासून प्रेम झालेले नव्हते. पण एक प्रियकर असावा. बाकीच्या मुली मिरवतात तस आपण ही मिरवाव हाच त्यांचा उद्देश होता. 

    त्या दोघींनी त्यांचेच मित्र असलेल्या मुलांना प्रियकर बनवण्याचे ठरवले. त्या दोघींनी कोणी कुणाला प्रियकर बनवायच हे आपापसात ठरवून घेतल. जान्हवीच्या दोघी मैत्रिणी प्रियकर बनवण्याचा प्रयत्न करू लागल्या. त्यांच्या सोबत असलेल्या मुलांना तशी जाणीव त्या करून देत होत्या. काही दिवस निघून गेले. त्या दोघींच्या बोलण्यावरून, वागन्यावरुन हळूहळू त्या मुलांना ही जाणवू लागल की या मुली आपल्या प्रेमात पडल्या असाव्यात. ती मुलही तशी उनाडच होती. त्यांना ही शिक्षणात फारसा रस नव्हता. मुली स्वतःहुन प्रेमात पडल्यात हे बघून त्यांनीही त्या दोघींना प्रेमाची मागणी घालायच ठरवल. 

    एक दिवस त्या मूलांनी त्या दोघी मुलींना प्रेमाची मागणी घातली. त्या दोघी या क्षणाची वाटच बघून होत्या. त्या दोघींनी लागलीच होकार ही देऊन टाकला. व अशाप्रकारे जान्हवीच्या मैत्रिणींची प्रेम कहानी सुरु झाली. 

    जान्हवी अजुन ही एकटीच होती. तिला कुणावर प्रेम झालच नव्ह्त. आणी जबरदस्तीच प्रेम ही तिला नको होत. आता पूर्वी सारख राहील नव्ह्त. आता जान्हवी व तिच्या मैत्रिणी केव्हा ही बाहेर जान्याच ठरवत त्यावेळी तिच्या मैत्रिणींचे प्रियकर ही नेहमी सोबत असत. जान्हवीला एकट एकट पडल्यासारखे वाटत होते.

    कधी काळी आपला ही एखादा प्रियकर असावा अस तिला वाटत होते. पण ती या दोघीं सारख प्रियकर शोधत नव्हती. तिला तिच्या आयुष्याचा खेळ मांडायचा नव्हता. तिला अगदी खर आणी मनापासून प्रेम करणारा मुलगा हवा होता. 

    जान्हवीच्या महाविद्यालयात आणखी एक मुलगा होता "सुधीर". सुधीर हा दिसायला खुप देखना व रुबाबदार होता. तसाच तो अभ्यासात ही हुशार होता. इतर सर्व गोष्टी मध्ये तो नेहमी पुढेच असायचा. महाविद्यालयातील शिक्षकांचा ही तो खुप लाडका होता. वर्गात कुनाशीही त्याच वैर नव्हते. नेहमी हसतमुख असायचा. नेहमी आनंदी असायचा. कुनाचही मन दुखवनार नाही असाच त्याचा स्वभाव होता. त्यामुळ वर्गात सर्वांशी त्याच चांगल जमत असे. 

    जान्हवी व तिच्या मैत्रिणी नियमित महाविद्यालयात जात नसे त्यामुळ सुधीरची व त्यांची जास्त मैत्री नव्हती. कधी काळी भेटले तर एकमेकांना बोलने वगैरे चालत असे. सुधीरला जान्हवीची एक मैत्रीण खुप मनापासून आवडत होती. सुधीर चांगलाच तिच्या प्रेमात पडला होता. पण त्या मुलीला एक प्रियकर आहे याची कल्पना सुधीरला नव्हती. सुधीरच एकतर्फी प्रेम सुरु झाले. तो निस्वार्थ प्रेम करू लागला. 

"धोकेबाज प्रेयसी" हा लेख वाचा..


    सुधीरच्या हरकती बघून जान्हवीच्या मैत्रिणीला सुधीर तिच्या प्रेमात असल्याचा संशय येवू लागला. तिने चार-पाच दिवस सारख सुधीरवर लक्ष ठेवले. आता जान्हविच्या मैत्रिणीला पूर्ण जाणीव झाली की सुधीर खरचं तिच्या प्रेमात पडलाय. क्षणाचाही विलंब न करता तिने याची कल्पना जान्हविला व दूसऱ्या मैत्रिणीला दिली.

    सुधीर असा मुलगा होता की कुणीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडेल. असा मुलगा स्वतःहुन प्रेमात पडल्यावर कुठली मुलगी सोडेल. जान्हवीच्या मैत्रीणीला आधीच एक प्रियकर असतानाही तिने सुधीरला प्रतीक्रीया देने सुरु केले. ती पुरेपुर सुधीरला जाणीव करून देत होती की तिलाही सुधीर मध्ये रस आहे. पहिला प्रियकर असतानाही तिची सुधीरला आपला प्रियकर बनवण्याची तयारी होती. कधीही महाविद्यालयात नियमित नसणारी मुलगी आता सुधीरसाठी नियमित येत असे. तिच्यासोबत जान्हवी व त्यांची दूसरी मैत्रीण ही नियमित येत असे. 

    सुधीर एक सभ्य मुलगा असल्याने तो तिला प्रेमाची मागणी घालण्यास घाबरत होता. महाविद्यालयातील शिक्षण संपन्यास अवघा एक महिना राहिला होता. एक महीन्यानंतर कधीही त्यांची भेट होणार नव्हती. काही केल्या सुधीरची तिला बोलण्याची हिम्मत होत नव्हती. शेवटी न रहावुन सुधीरने त्यांच्याच वर्गातील त्याच्या एका मैत्रिणी मार्फत तिला विचारण्याच ठरवल. तस त्याने तिच्या मैत्रिणीला सांगीतले. सुधीर एक चांगला मुलगा असल्याने त्याची मैत्रीण सुधीरची मदत करण्यास तयार झाली. 

    सुधीरची मैत्रीण जान्हविच्या मैत्रिणी सोबत मैत्री करू लागली. जान्हविच्या मैत्रिणीला एक प्रियकर आहे ही माहिती तिला मिळाली. तिने कसलाच विलंब न करता सुधीरला खरी परीस्थिती सांगितली. सुधीरचा यावर अजीबात विश्वास बसत नव्हता. एक दिवस तिने सुधीरला प्रत्यक्ष दाखवून दिले की तिचा प्रियकर आहे. 

    त्या दिवसापासून सुधीरने तिचा नाद टाकुन दिला.  महाविद्यालयातील त्यांची शेवटची परीक्षा सुरु झाली. सर्व पेपर झाल्यावर महाविद्यालय ही संपले. आता कुणाची कुणाशी भेट होणार नव्हती. संपर्क होणार होता तो फक्त फोनवर.

    महाविद्यालय संपुन दोन महीने उलटून गेलेत. एक दिवस काही कारनास्तव जान्हविने सुधीर सोबत फोनवर संपर्क केला. खुप दिवसानंतर संपर्क झाल्यामुळ भरपूर वेळ फोनवर बोलले जुन्या आठवणींवर चर्चा ही झाली.आता अधून मधून एकमेकांच फोन करन सुरु झाले.

     जान्हवीने पदवीचे शिक्षण पूर्ण करून शिक्षण थांबवले होते. तर सुधीरचे पुढील शिक्षण सुरु होते त्यासाठी तो दूसऱ्या शहरात गेला होता. महाविद्यालयात फक्त कामानिमित्त बोलणाऱ्या जान्हवी व सुधीरची आता खुप घट्ट मैत्री झाली होती. महाविद्यालयात उनाड मुलांसोबत मैत्री असलेली जान्हवीला सुधीर सारखा चांगला मित्र भेटला होता त्यामुळ ती खुप समाधानी होती. सुधीर शिक्षनासाठी तिकडे एकटाच रहात असल्याने जान्हवी नेहमी त्याची काळजी घेत असे. सुधीरची नेहमी चौकशी करत असे. यासर्व गोष्टीमुळे सुधीरला ही जान्हवी बद्दल आपुलकी वाटत होती. 

    जान्हवी आता दोन तिन दिवसातन एकदा रोज सुधीरला फोन करून त्याची नियमित चौकशी करत असे. यामुळ सुधीर खुप भारावून जात असे. आई-वडिलांन व्यतीरीक्त सुधीरची काळजी घेणारी जान्हवी एकमेव मुलगी होती. त्या दोघांना एकमेकांबद्दल खुप जिव्हाळा होता. याचच रूपांतर त्यांच प्रेमात झाल.

    एव्हाना दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडली होती. जान्हवीला ही जसा मुलगा प्रियकर म्हणून होता सुधीर अगदी तसाच मुलगा होता. सुधीर ही चांगलाच तिच्या प्रेमात पडला होता. पण अजुन त्या दोघांनी प्रेमाची कबुली दिली नव्हती.

   न रहावुन एक दिवस सुधीरने पुढाकार घेतला व "आपण तिच्या प्रेमात पडलो याची कल्पना दिली." जान्हविला ही सुधीर खुप मनापासून आवडत होता. सुधीर जनु तिच्या स्वप्नातला राजकुमारच होता. जानव्हीने ही सुधीर समोर आपल्या प्रेमाची कबुली दिली.



    बघता बघता दोघांची गाडी प्रेमाच्या रस्त्यावर येवून पोहचली. दोघेही एकमेकांवर आतोनात प्रेम करू लागली. जान्हवी व सुधीरचा स्वभाव ही खुप मीळता जूळता होता. कधीही त्यांच्यात वाद होत नसे. जनु त्यांची जोड़ी देवानेच बनविली होती. 

    जान्हवी खुप खुश होती. कारण तिला अगदी तिच्या मनासारखाच प्रियकर मीळाला होता. सुधीर नियमित जान्हवीला भेटायला येत असे. जान्हवी आता पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेवु लागली. जान्हवीच एवढ प्रेम जडले होते कि तिला सुधीर शिवाय श्वास घेणेही कठिण जात असे. जान्हवी इतर मुलींसारखी मुलगी नव्हती खरच मनापासून प्रेम करणारी मुलगी आहे याची जाणीव सुधीरला झाली होती.

    सुधीर ही तिला खुप जीव लावत असे. नेहमी तिची काळजी घेत असे. सुधीर अभ्यासू असल्याने त्याला जान्हविचे शिक्षण ही तेवढेच महत्त्वाचे वाटू लागले. त्याने जान्हवीला आणखी पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. जान्हवी ही सुधीरची कुठलीच गोष्ट टाळत नसे. सुधीरच्या प्रत्येक गोष्टीच पालन करत असे. कारण जान्हवीला माहित होते की सुधीर जे काही सांगेल ते तिच्या फायद्यासाठीच सांगेल. जान्हविचा सुधीरवर खुप विश्वास होता. त्यामुळ ती डोळे झाकून त्याच्यावर प्रेम करत असे. 

    तिला कुणी सुधीर बद्दल काही चुकीच सांगितले तरी तिचा त्यावर विश्वास बसत नव्हता. काही दिवसात जान्हवीचा वाढदिवस होता. पण सुधीरची तिकडे परीक्षा चालू असल्याने तो त्यादिवशी येवू शकत नव्हता. त्याने तस तिला वचन दिले की मी परीक्षा संपली की लागलीच तुला भेटायला येइल व मी आल्यावर तुझा वाढदिवस साजरा करेल. जान्हवी थोड़ी नाराज झाली. पण वाढदिवस साजरा करण्यापेक्षा सुधीरची परीक्षा जास्त महत्त्वाची आहे हे ती समजत होती. त्यामुळ तिची नाराजी तिने व्यक्त नाही केली.

    आज सुधीरचा शेवटचा पेपर होता. पेपर संपल्यावर त्याने तयारी केली व त्या रात्रीच तो जान्हवीला भेटण्यासाठी निघाला. त्याने जान्हवीला तशी कल्पना दिली होती. पहाटे चार वाजता घरी पोहचला. थोडा वेळ झोपला नऊ वाजेला उठला. घाई घाई सर्व आवरल. व जान्हवीला भेटण्यासाठी निघाला. 

    जान्हवी ही तिकडून निघाली. खुप दिवसानंतर भेट होणार होती. तिलाही खुप आतुरता होती भेटण्याची. जान्हवीचा वाढदिवस साजरा करण्याचा विचार त्याने आधीच करून ठेवला होता. ठरल्या जागेवर सुधीर जान्हविला घेण्यासाठी गेला. तेथून जान्हवी आणी सुधीर दूर फिरन्यासाठी गेले. हे सर्व सुधीरने आधीच ठरवलेले होते. 

    ते दोघ गेले त्या ठिकाणी मोठी नदी होती. त्या नदीत जहाज ही होती. सुधीरने जान्हविला जहाजीत बसवले. जहाजवाला जहाज नदीच्या मध्यावर घेवुन गेला. सुधीरने सोबत केक आणलेला होता. जहाजी मध्येच जान्हविला तो केक कापन्यास सांगीतला. जान्हवीचा असा वाढदिवस यापूर्वी कुणीच साजरा केला नव्हता. जान्हविला सुधीरची कल्पना खुप आवडली. घरी गेल्यावर तिने तिच्या इतर मैत्रिणींना हे सांगीतले. 

    जान्हविचा आनंद गगनात माव्ह्त नव्हता. जान्हवी आज सुधीरवर खुप खुश होती. जान्हविला सुधीर हा आयुष्यभर जोड़ीदार म्हणून हवा होता. तिने लागलीच सुधीरला लग्नाची मागणी घातली. क्षणाचा ही विलंब न करता सुधीरने लग्नासाठी होकार दिला.


    आयुष्यभर एकमेकांना साथ द्यायची व खुप खुप प्रेम करायच अस त्यांच्यात ठरल. सुधीर दोन तिन दिवस थांबुन परत गेला. नंतर आधून मधून एक दोन महिन्यात सुधीर जान्हविला भेटण्यासाठी येत असे. ते दोघ त्यांच्या आयुष्यात खुप सुखी होते.

    पण त्यांच्या या प्रेमाला कुणाची तरी द्रुष्ट लागली होती. सुधीर ज्या महाविद्यालयात शिकत होता तेथील एक मुलगी त्याच्या मागावर होती. ती ही सुधीरवर प्रेम करत होती. पण इकडे सुधीर जान्हवीच्या प्रेमात अडकला होता. व त्याने जान्हविला लग्नाच वचन ही दिलेल होत. त्यामुळ काही केल्या तो जान्हवीचा विश्वासघात करू शकत नव्हता. तस त्याने त्या मुलीला ही सांगीतले पण ती मुलगी सुधीरच्या प्रेमात पागल झाली होती.

   सुधीरच प्रेम मीळवन्यासाठी कुठल्याही ठरला जाण्याची तिची तयारी होती. पण सुधीर काही केल्या तिच्या प्रयत्नांना यश येवू देत नव्हता. तिने आता जान्हवीशी संपर्क साधुन सुधीर व तिच्या मध्ये भांडन लावण्याचा विचार केला होता.

    एक दिवस तिने जान्हवीचा नंबर मीळवला व जान्हविला खोट बोलली. "सुधीर व माझे प्रेमसंबंध आहे, तू आमच्या मध्ये पडू नकोस.", "सुधीर ही माझ्यावर खुप प्रेम करतो पण तो तुला सांगायला घाबरत आहे." हे ऐकून जान्हविला चांगलाच धक्का बसला. सुधीरला याबाबत काही एक कल्पना नव्हती. पण त्या मुलीच्या सांगन्यावरुन जान्हविला तीच बोलन खर वाटत होत. 

    सुधीर तिला धोका देतोय असा जान्हविचा गैरसमज झाला. तिने याबाबत सुधीरकड़े विचारना केली. सुधीरने आहे ती सत्य परिस्थीती जान्हविला सांगितली. पण जान्हविच्या डोक्यात राग एवढा शिरला होता की तिला सुधीरच काहीच खर वाटत नव्ह्त. सुधीर ने तिला फसवल तिचा विश्वासघात केला हेच तिच्या डोक्यात शिरल होत. 

    तिने सुधीरला इथून पुढे बोलू नकोस असे सांगीतले. तू तुझ्या प्रेयसी सोबत खुश रहा असे सांगीतले. सुधीरने खुप समजावण्याचा प्रयत्न केला. पण जान्हवीच्या डोक्यात गैरसमज चांगलाच पसरला होता. तिने सुधीरला बोलू नकोस सांगीतले व त्याचा फोन ठेवून दिला.

    त्या दिवसापासून तिने कधीच सुधीरचा कॉल घेतला नाही. व एका अनोळखी मुलीवर विश्वास ठेवून सुधीर सोबतचे प्रेमसंबंध संपवून टाकले. सुधीरने संदेश पाठवून भेटण्याचा अग्रह ही केला. पण ती सुधीरला भेटायला ही आली नाही व सुधीरला काय सांगायचय ते ऐकून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही.

    एवढे चांगले प्रेमसंबंध असताना एकमेकांवर विश्वास असतानाही. कुणाच्या तरी सांगन्यावरुन जान्हवी ने सुधीर सोबतच नात कायमच तोडून टाकले. 

    कधीही आपल्या मानसाच म्हणन एकदा तरी ऐकून घेण्याचा प्रयत्न केला तर चांगले संबंध कधीच संपुष्टात येणार नाही. कुणाच्याही सांगन्यावरुन गैरसमज न करणे हेच हिताचे. आज जान्हवी व सुधीर कायमचे एकमेकांपासून दूर झालेत. अजूनही ते एकमेकांना बोलत नाही भेटत नाही. कोण कुठे आहे याची एकमेकांना अजीबात कल्पना नाही.....

Jivan Ek Katha हा Marathi Katha blog आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना नक्की share करा .

 धन्यवाद


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेम आणि मैत्री | Jivan Ek Katha | Marathi Katha

"ती" एक सन्मान | Jivan Ek Katha | Marathi Katha

प्रेम भंग | Jivan Ek Katha | Marathi Katha