जिद्द आणि यश | Jivan Ek Katha | Marathi Katha

जीवन एक कथा । मराठी कथा

जिद्द आणि यश


अरुण एक खूप छान व गोंडस बाळ. कुणालाही त्याला दोन मिनिटे जवळ घेऊन त्यांच्यासोबत खेळावं वाटत असे, एवढा गोड होता अरुण. नेहमी हसतमुख असणारा अरुण, कुणी कितीही ताण तणावाच्या परिस्थितीत असलं तरीही अरुण सोबत खेळत असताना आपलं दुःख दिवसभरात आलेला तणाव काही क्षणातच विसरून जात असे. अरुण एक खूप शांत मुलगा होता. 



अरुण चाणाक्ष बुद्धीचा होता. त्याला अवघ्या लहान वयातच कुठलीही गोष्ट फार लवकर अवगत होत असे.  पण अरुणच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यांचा परिवार फार मोठा नव्हता, आई-वडील , आजी-आजोबा , आणि एक मोठा भाऊ. आजी-आजोबा वृद्ध असल्याने ते गावी घरीच रहात असे. अरुणच गाव हे अतिशय दुर्गम्य व दुष्काळी भागातील असल्याने तेथे रोजगार फार कमी प्रमाणात उपलब्ध होत असे. 



त्यामुळे अरुणच्या आई-वडीलांना ही नेहमी या गावातून त्या गावात जावे लागत असे. कधी कधी तर त्यांना रोजगार मिळवण्यासाठी फार दूर जावे लागत असे. एकदा का कामासाठी दुर बाहेरगावी गेले तर एक ते दीड महिना घरी परतत नसे. अरुणही अतिशय लहान असल्यामुळे तो ही त्यांच्यासोबत जात असे. आई-वडील दिवसभर काम करत असत व अरुणपेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला त्याचा भाऊ अरुणचा सांभाळ करत असत.


Jivan Ek Katha हा Marathi Katha blog आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणी व नातेवाईकांना नक्की share करा .

 धन्यवाद


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रेम आणि मैत्री | Jivan Ek Katha | Marathi Katha

"ती" एक सन्मान | Jivan Ek Katha | Marathi Katha

प्रेम भंग | Jivan Ek Katha | Marathi Katha